माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप प्रवेश निर्णयावर शिक्कामोर्तब


पुणे (टाईम न्युजलाईन नेटवर्क):राज्यातील कॉंग्रेसचे ज्येष्ठ व दिग्गज नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप प्रवेश निर्णयावर शिक्कामोर्तब झाले आहे. हर्षवर्धन पाटील यांचा मुंबईत बुधवारी (दि.11) दुपारी 3 .00 वाजता होणार भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. इंदापूर विधानसभेच्या जागा वाटपावरून हर्षवर्धन पाटील हे नाराज होते.इंदापुरातील मेळाव्यात भाजप प्रवेशाची मागणी कार्यकर्त्यांच्या केली होती. इंदापूर विधानसभेची जागा हर्षवर्धन पाटील हे भाजपकडून लढविण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व भाजपच्या मान्यवर नेत्यांच्या उपस्थित हा प्रवेश सोहळा होणार आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप प्रवेशाने राज्यातील कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला मोठा धक्का बसणार आहे. हर्षवर्धन पाटील हे राज्यातील सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते म्हणून ओळखले जातात.
इंदापूर विधानसभा मतदार संघांचे त्यांनी सलग 4 वेळा आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले आहे. यामध्ये सलग 3 वेळा अपक्ष आमदार म्हणून निवडून येण्याचा राज्यात विक्रम हर्षवर्धन पाटील यांनी केलेला आहे.त्यांनी मुख्यमंत्री मनोहर जोशी व उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या युती शासनात 5 वर्षे व त्यानंतर आघाडी शासनात सलग 14 वर्षे मंत्री म्हणून उत्कृष्ठपणे काम केले आहे, त्यांनी एकूण 6 मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम केले आहे. राज्यातील ज्येष्ठ नेते म्हणून यांची ओळख आहे.
Labels:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget