पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त यांची नार्को टेस्ट करा


                                                 पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये फेब्रुवारी सन २०१७ रोजी सार्वत्रिक निवडणूका झाल्या व भाजप पक्षाची सत्ता आली. त्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून             श्रावण हर्डीकरण यांची नियुक्ती करण्यात आली. श्री. श्रावण हर्डीकर यांनी आयुक्त पदाचा पदभार घेतल्यापासून कायमच वादाचा विषय झालेले आहेत. त्यांचे प्रत्येक निर्णय वादग्रस्त ठरलेले आहेत. त्याबाबत विरोधकांबरोबरच सत्ताधारी नगरसदस्यांनीही आवाज उठविला किंवा पत्र, निवेदने दिली तरी त्यांनी त्यावर खुलासा न करता केराची टोपली दाखविली आहे. त्यामुळे त्यांच्या कारभाराबाबत संशय निर्माण होत आहे. त्यामुळे त्यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी नगरसेवक मयूर कलाटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
शहरातील जनतेला मूलभूत सोई सुविधा देण्याबाबतही ते अपयशी ठरले आहेत. त्यांचे प्रशासनावर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण राहिलेले नाही त्यामुळे अधिकारी त्यांच्या मनमर्जीप्रमाणे वागत आहेत व त्याचा त्रास शहरातील जनतेला होत आहे. त्यांनी घेतलेल्या निर्णयावर विरोधकांनी तसेच सत्ताधा-यांनीही भष्ट्राचाराचे आरोप केले आहेत. ते  आरोप त्यांनी खोडून न काढता कुठल्याही प्रकारचा समाधानकारक खुलासा आजतागायत  दिलेला नाही. त्यामुळे विरोधकांनी केलेल्या आरोपात तथ्य असल्याचे सिध्द होते. व त्यामुळे महापालिकेचे करोडो रुपयांचे नुकसान झालेले आहे. असे प्रथम दर्शनी दिसून येते.

          त्यामुळे  आयुक्त, श्रावण हर्डीकरण यांची नार्को टेस्ट करण्यात यावी. तसेच त्यांनी पदभार घेतल्यापासून जे आर्थिक निर्णय घेतलेले आहेत, त्याबाबत सक्षम समिती नेमून सखोल चौकशी करण्यात यावी. अशी मागणी केली

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget