भोसरी मतदारसंघातील वाहतूक कोंडी सुटणारपिंपरी(टाईम न्युजलाईन नेटवर्क) -  भोसरी विधानसभा मतदारसंघातील वाहतूक कोंडी सुटणार आहे. मतदारसंघातील काही भागात 'नो-पार्किंग' झोन जाहीर करण्यात आला आहे. तसेच वाहतूक कोंडीबाबत पोलीस कर्मचा-यांना सक्त सूचना देण्याचे निर्देश आमदार महेश लांडगे यांनी वरिष्ठ पोलीस अधिका-यांना दिले आहेत.

आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकारातून मागील आठवड्यात मतदारसंघातील नागरिकांचा मोशीत पोलिसांसोबत परिसंवाद झाला होता. या परिसंवादात नागरिकांनी वाहतूक कोंडीकडे पोलिसांचे लक्ष वेधले होते. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होत असल्याचे पोलिसांना सांगितले. काही भागात नो-पार्किंग झोन जाहीर करण्याची मागणी केली होती.

या सूचनांची दखल घेत आमदार महेश लांडगे यांनी पोलिसांनी नागरिकांसोबत जाऊन जागेची पाहणी करावी.  वाहतूक कोंडी होणा-या ठिकाणी 'नो-पार्किंग' झोन जाहीर करण्याच्या सूचना वाहतूक विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त निलिमा जाधव यांना दिल्या होत्या.  त्यानुसार पोलिसांनी 'नोटीफिकेशन' जाहीर केले आहे.

जुन्या आरटीओच्या पाठीमागील भाग 'नो-पार्किंग' झोन

महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 11 मधील पुर्णानगर येथील जुन्या आरटीओच्या पाठीमागील भाग 'नो-पार्किंग' झोन जाहीर करण्यात आला आहे.  पूर्णानगर येथे बेकायदेशीरपणे वाहने उभी केली जात होती. त्याचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. स्थानिक नागरिकांना नो-पार्किंग झोन जाहीर करण्याची मागणी आमदार महेश लांडगे यांच्याकडे केली होती. आमदार लांडगे यांच्या सुचनेनुसार पोलिसांनी  नो-पार्किंग झोन जाहीर केला आहे. यापूर्वीचे पार्किंग निर्बंध रद्द केले आहेत. याबाबतचे परिपत्रक पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे यांनी काढले आहे. त्यामुळे नागरिकांनी आनंद व्यक्त केला  आहे.

तळवडेतील वाहतूक कोंडी सुटणार !

कोलोसुस ग्रीन सिटी, जाधववाडी, चिखली परिसरातील रस्त्यावर  अस्ताव्यस्त व गैरसोईचे पार्किंग  केले जाते.  त्यामुळे नागरिकांवा वाहने चालविताना त्रास होतो. स्थानिक नागरिकांनी त्यासंदर्भात सातत्याने तक्रारी केल्या आहेत. आमदार महेश लांडगे यांनी केलेल्या सूचनेनुसार तळवडे वाहतूक विभागाने डायमंड चौक ते कुदळवाडी, स्पाईनरोड या ठिकाणी नो-पार्किंग झोनचे नोटीफिकेशन करुन घेतले आहे.

त्या अनुषंगाने महापालिकेच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्र दिले आहे. डायमंड चौक ते कुदळवाडी,  स्पाईनरोड व तळवडे गावठाण चौक ते त्रिवेनीनगर चौक या रोडच्या दोन्ही बाजूस प्रत्येकी 50 मीटरवर नो-पार्किंग बोर्ड बसविण्याबाबत महापालिकेला कळविण्यात आले आहे. त्यामुळे तळवडेतील वाहतूक कोंडी सुटणार आहे.
Labels:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget