भोसरीचे प्रश्न जैसे थे, फसव्या जाहिराती करुन जनतेला ‘नो उल्लू बनाविंग’ – विरोधी पक्षनेते दत्ताकाका साने यांची टीकापिंपरी ( टाईम न्युजलाईन नेटवर्क) –   
भोसरी विधानसभा मतदारसंघात गेल्या पाच वर्षात नुसती आश्वासनं अन् पाठपुरावाच सुरु आहे. ‘भय अन् भ्रष्टाचाराने’ भोसरीतील जनता त्रस्त आहे. मागील 2014 पंचवार्षिक निवडणुकीत जनतेनं विश्वास ठेवून जो बदल घडविला. त्यातून स्वताचे घर भरण्यापलिकडे कोणताच बदल घडलेला नाही. आजही अनधिकृत बांधकामांचा प्रश्न, रेडझोन, शास्तीकर, मोशीचा कचरा डेपो, औद्योगिक स्थलांतरण, प्राधिकरणाचा परतावा, झोपडपट्टी पुर्नवसन, अवैध धंदे, तरुणांची बेरोजगारी आदी जनतेचे प्रश्न जैसे थे आहेत. त्यामुळे आता आश्वासन नको, फसव्या जाहिरातीचा भडिमार नको, जनतेला कृती हवी असून ‘नो उल्लू बनाविंग’ अशी टीका माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली आहे.   
साने यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकांत म्हटले आहे की, भोसरी विधानसभा मतदारसंघात 2014 मध्ये जनतेने मोठ्या अपेक्षाने बदल घडविला होता. सामाविष्ट गावातील जनतेला रस्ते, पाणी, ड्रेनेज या मुलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करण्याऐवजी त्याच्याच जमिनीवर डोळा ठेवून भाव-भावकीत संतुष्ट निर्माण करण्याचे काम विद्यमान लोकप्रतिनिधींने केले आहे. त्याशिवाय तेव्हा मोशी परिसरातील कचरा डेपो हटविण्याची भाषा बोलणारे आता वेस्ट टू एनर्जी प्रकल्पात भागिदारी झाले आहेत. भोसरी, चाकण औद्योगिक पट्ट्यात बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक उद्योजक स्थलांतरीत होवू लागले असून तरुणांचा हाताला काम मिळत नाही. त्या तरुणांना हातगाडी, टपरी टाकण्यास प्रवृत्त केले जात आहे. तर औद्योगिक वसाहतीत ‘स्वाभिमानी’च्या नावावर स्क्रपसह लेबर कंत्राट मिऴवून तरुणांचा बेरोजगार ठेवले जात आहे.
तसेच मोशी, च-होली, चिखली, डूडुळगाव, तळवळे आणि दिघी गावातील जनतेच्या जागेवर डोळा ठेवून त्या लाटण्याचा उद्योग काही मंडळीना हाताशी करुन केला आहे. भाव-भावकीत भांडणे लावून मोक्याच्या जमिनी कवडीमोल दराने हाडप केल्याने सर्वसामान्य शेतक-यांना प्रचंड रोष आहे. त्या लोकांचा तळतळाट लागल्याशिवाय राहणार नाही. झोपडपट्टी पुर्नवसन कित्येक दिवसापासून प्रलंबित आहे. उड्डाणपूल, नाट्यगृह, क्रिडानगरी, शाळा, रस्ते, जलकुंभ या सर्व गोष्टी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून बांधत आहे. त्यासाठी कष्ट घेणार नगरसेवक, पैसा खर्च होणार सर्वसामान्य करदात्या जनतेचा, आणि श्रेय फक्त विद्यमान आमदार लाटत आहेत. त्यामुळे स्वतःच्या आमदार फंडातून तुम्ही किती कामे केली. त्या कामाचे त्यांनी श्रेय घ्यायला हवे. केवळ महापालिकेची कामे दाखवून ती मीच केल्याच्या भास आमदारांनी अविरभावात राहून नये, असा टोलाही साने यांनी यावेळी लगावला आहे.

... तेव्हा कुठे गेल होता ‘पॉलिटिक्स वुईथ रिस्पेक्ट’  
भोसरी विधानसभा मतदारसंघात जनतेचा ‘मास लीडर’ असल्याचे भासवून भय आणि भ्रष्टाचाराने केवळ स्वताचा विकास केला आहे. 2014 मध्ये तत्कालीन आमदारांवर खालच्या पातळीवर टीका करुन आरे-तुरे ची भाषा वापरली होती. तुझ्या कर्तुत्वाने मी मोठा झालेलो नाही बाळा, अशा शब्दांत टीका केली होती. तेव्हा कुठे गेल होता ‘पॉलिटिक्स वुईथ रिस्पेक्ट’ असा प्रश्न जनतेला पडला आहे. त्यामुळे जैसी करणी, वैसी भरणी... अशा शब्दांत दत्ताकाका साने यांनी टीका केली आहे.


Labels:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget