यमुनानगरचा खंडीत वीजपुरवठ्याचा प्रश्न निकालीपिंपरी, (टाईम न्युजलाईन नेटवर्क)  - मागील सहा महिन्यांपासून निगडीतील यमुनानगरमधील रहिवाशी वीजपुरवठा खंडीत होण्याच्या समस्येचा सामना करत आहेत. परंतु महावितरण कंपनीकडे नगरसेवक प्रा. उत्तम केंदळे यांनी पाठपुरावा करून आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून हा प्रश्न निकाली काढला आहे. यमुनानगरसाठी स्वतंत्र वीजपुरवठा केबल टाकण्याचे काम सुरू झाले असून हा प्रश्न  कायमचा निकाली निघाला आहे.

प्रभाग क्रमांक १३ मधील निगडी,यमुनानगर,साईनाथनगर परिसरात चिंचवडमधून गंगानगर,आकुर्डी व बी जी कॉर्नर अशा लाइन नुसार सध्याचा वीजपुरवठा पुरविला जातो. पूर्ण भागात कुठेही वीज खंडित झाली असता पहिली यमुनानगर ची वीज खंडित होते कारण यमुनानगर चा भाग वीजपुरवठ्यासाठी शेवट वा सुरुवात असल्यामुळे उपलब्ध विजेच्या केबल, ट्रान्सफार्मर आणि इतर यंत्रणेवर अतिरिक्त ताण येतो. त्यासह दिवसेंदिवस महावितरणाच्या येथील सर्व यंत्रणेची क्षमता कमी होत आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडीत होण्याच्या समस्या वाढत असून त्याचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. या समस्येमुळे नागरिक हैराण होत असल्याने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण समितीचा सदस्य आणि या प्रभागातील नगरसेवक या नात्याने प्रा. उत्तम केंदळे यांनी पाठपुरावा केला. त्यामुळे आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून येथे केबल टाकण्यासाठी महावितरणाने मान्यता दिली.

चिंचवडच्या बिजलीनगरपासून भक्ती-शक्ती येथील अण्णाभाऊ साठे बस टर्मिनलपर्यंत 22 किलोव्हॅट वीज पुरवठा केबल टाकण्यात येत आहे. तेथे नविन होत असणारे ई-बस चार्जिंग स्टेशनला हा वीजपुरवठा केला जाईल. त्याच ठिकाणाहून यमुनानगरसाठी स्वतंत्र वीजपुरवठा केबल टाकण्यास महावितरणाने मंजुरी दिली असून त्याचे काम देखील सुरू झाले आहे. अधिकारी कार्यकारी अभियंता राहूल गवारे, मिलिंद चौधरी, संतोष झोडगे यांच्यामार्फत हे काम सुरू आहे. सद्यस्थितीत 70 टक्के काम पूर्णत्वास आले अूसन येत्या महिनाभरात हे काम पूर्म होणार असून येथील महावितरणाच्या वीजपुरवठा यंत्रणेची क्षमता वाढणार आहे. या कामामुळे यमुनानगरमधील वीजपुरवठा खंडीत होण्याची समस्या निकाली निघाल्याने परिसरातील नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
Labels:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget