पवना धरण दुसऱ्यांदा ओव्हर फ्लो


पिंपरी:(टाईमन्युजलाईन नेटवर्क)
पिंपरी-चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणारे पवना धरण हे यंदा दुसऱ्यांदा ओव्हर फ्लो झाले आहे. धरणातून १२ हजार ६०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग पवना नदीत करण्यात येत आहे. गेल्या २४ तासात तब्बल १०६ मी.मीटर पाऊस धरण क्षेत्रात झाला असून पवना धरण यावर्षी दुसऱ्यांदा शंभर टक्के भरले आहे. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण ओव्हर फ्लो झाले आहे. धरण परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे धरण शंभर टक्के भरले असून १२ हजार ६०० क्यूसेक पाण्याच्या विसर्ग करण्यात येत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पावसाचे प्रमाण जास्त आहे. गेल्यावर्षी ३१७९ मी.मीटर एवढा पाऊस झाला होता. तर यावर्षी ३३३७ मी.मीटर पाऊस झाला आहे. धरणाच्या खालील भागातील नदीकाठची गावे, वाड्या वस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी सुरक्षेच्या कारणास्तव नदी पात्रात प्रवेश करू नये. वीजेवरील मोटरी, इंजिने, शेती अवजारे अथवा तत्सम साहित्य तसेच पशुधन यांचेही सुरक्षिततेची काळजी घेऊन कोणत्याही प्रकारे जीवितहानी वा वित्तहानी होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले.
Labels:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget