सातारा (टाईमन्युजलाईन नेटवर्क)
सातारा लोकसभा पोटनिवडणुकीची तारीख जाहीर झाली असून विधानसभेसोबत २१ ऑक्टोबरलाच मतदान होणार असल्याची घोषणा झाली आहे. उदयनराजे यांच्याविरोधात कोणता उमेदवार उभा राहणार अशी चर्चा सुरु असताना खुद्द उदयनराजे भोसले यांनी शरद पवार निवडणुकीला उभे राहिले तर माघार घेईन असं म्हटलं आहे. साताऱ्यात उदयनराजे भोसले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शरद पवारांबद्दल बोलताना उदयनराजे भावूक झाले होते.
“सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी शरद पवार उभे राहिले तर आपण निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेऊ,” असे उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे. “शरद पवार निवडणुकीला उभे राहिले तर मी अर्ज भरणार नाही. मला केवळ दिल्लीतील बंगला आणि गाडी द्यावी,” असेही यावेळी त्यांनी सांगितले.
वडिलांनंतर शरद पवार यांनीच मला आधार दिला
भाजपात प्रवेश करण्यावरुन होणाऱ्या टीकेबद्दल बोलताना उदयनराजे भोसले यांनी हे सर्व एकदाचे खलास करून टाका असं म्हणत आपला संताप व्यक्त केला. तसंच शरद पवारांबद्दल आपल्या मनात अजूनही तितकाच आदर असून वडिलांनंतर शरद पवार यांनीच मला आधार दिला. ते पोटनिवडणुकीसाठी उभे राहिले तर बरं होईल, म्हणजे मी बोंबलत फिरायला मोकळा होईन असं उदयनराजेंनी म्हटलं आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.