ओतूर,(टाईमन्युजलाईन नेटवर्क)
ओतूर ( ता.जुन्नर ) येथील नगर- कल्याण महामार्गावरील स्वामी हाईट्स मधील पहिल्या मजल्यावरील बंद सदनिकेचे लॉक तोडुन अज्ञात चोरट्यांनी सुमारे बारा तोळे सोने लंपास केल्याची घटना रविवारी दुपारी एक ते दिड वाजण्याच्या सुमारास घडली.
चोरीबाबत जितेंद्र जनार्दन ढोबळे रा.ओतूर,ता.जुन्नर यांनी ओतूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत ओतूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक परशुराम कांबळे हे अधिक माहिती देताना म्हणाले की जितेंद्र जनार्दन ढोबळे यांचे ओतूर बारपेठेत शुभम ड्रेसेस नावाचे रेडिमेड कापड दुकान असुन रविवारी दि.२९ रोजी ढोबळे हे स्वामी हाईट्स सोसायटितील ते रहात असलेल्या सदनिकेतुन जेवन करून, सदनिका बंद करून दुकानात गेले. त्यानंतर ते परत दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घरी आल्यावर त्यांना त्यांच्या सदनिकेचा दरवाजा उघडा दिसला.त्यांनी आत जाऊन पाहिले असता घरातील लोखंडी कपाट उघडे दिसले आणि कपाटातील साहित्य चोरट्यांनी इतरत्र स्थितीत टाकल्याचे दिसुन आले.त्यानंतर कपाटातील साडे आठ तोळ्याचे सोन्याचे गंठण व पैडन,एक तोळे वजनाची सोन्याची चैन,दिड तोळ्याचे गंठण,अर्धा तोळ्या एक टॉप जोड, अर्धा,अर्धा तोळ्याचे दोन वेगवेगळे टॉप जोड असे एकुण बारा तोळे वजनाचे ६७ हजाराची सोन्याच्या दागीन्यांची चोरी झाल्याचे त्याच्या निदर्शनास आले.
प्रत्येक सोसायट्यांनी सिसीटिव्ही कँमेरे बसवणे गरजेचे
-- प्रत्येक सोसायट्यांनी सिसीटिव्ही कँमेरे बसवणे गरजेचे आहे.तसेच सोसायट्या व दुकानांसाठी वॉचमेन ठेवावेत,मौल्यवान वस्तु, सोने व मोठी रक्कम घरामध्ये ठेवू नये.आनोळखी व्यक्ती दिसून आल्यास किंवा संशयित व्यक्ती आढळल्यास तात्काळ पोलीसांना संपर्क करावा.असे अवाहन ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक परशुराम कांबळे यांनी नागरिकांना केले आहे.
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.