वडगाव मावळ (टाईम न्युजलाईन नेटवर्क)
भाजपात होत असलेल्या मेगाभरतीमुळे आम्हीच पक्षातून बाहेर ढकलले जाऊ की काय अशी भीती वाटते आहे, असे विधान केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केले आहे.
पक्षात माणसं कमी नाहीत उलट दुसऱ्या पक्षातील नेते इकडे येत असताना आम्ही जीव मुठीत घेऊन बसलो होतो, अशा शब्दांत दानवे यांनी मेगाभरतीवर मिश्किल शब्दांत टिपण्णी केली. वडगाव मावळ येथे विजयी संकल्प मेळाव्यात ते बोलत होते.
दानवे म्हणाले, “मेगाभरतीमुळे भाजपाच्या जुन्या नेत्यांवर त्याचा परिणाम होईल इतकं ते सोपं नाही. एक काळ असा होता ज्यावेळी एक कार्यकर्ता तयार करायला दहा वर्षे लागायची, त्यानंतर तो ३० वर्षे पक्षाचं काम करायचा. मात्र, आता परिस्थिती बदलली असून काही मतदारसंघात पुढील निवडणुकीला कार्यकर्ता कामाला येईल की नाही हे सांगू शकत नाही.”
जे कार्यकर्ते पक्ष बदलून आपल्या पक्षात आले आहेत. ते सहज आलेले नाहीत, विचार करून आले आहेत. भाजपात गेल्यावर जमेल का? तिथे आपल्याला सांभाळून घेतले जाईल का? अशा प्रश्नांमुळे त्यांना रात्रभर झोपच येत नव्हती. पण त्यांनी हिंमत केली आणि भाजपात दाखल झाले. जुन्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, त्यांनी नवीन कार्यकर्त्याना बैलासारखे शिंग मारु नये त्यांना सांभाळून घ्यावे, अशा शब्दांत दानवेंनी कार्यकर्त्यांना सबुरीचा सल्ला दिला.
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.