पिरंगुटमध्ये भीषण अपघात :चार ठार

पिरंगुट(टाईमन्युजलाईन नेटवर्क): पिरंगुट घाटातून भरधाव आलेल्या ट्रकमुळे भीषण अपघात झाला आहे. अपघातात 3 जण जागेवरच मयत झाले तर 1 जण नंतर मयत होऊन इतर एक जण गंभीर असल्याचे प्रत्यक्षदर्शी आणि पोलिसांकडून समजले आहे.
       मयतामध्ये विप्रो कंपनीतील तरूणीचा समावेश असून गंभीर एकाला लवळे फाटा येथे मुळशी हॉस्पिटलला नेले होते, मात्र नंतर त्याला पुण्यात उपचारासाठी नेणार असल्याचे समजले. दुसरा गंभीर जखमीही आधिच पुण्यात नेले आहे. मात्र गणपती विसर्जनाच्या मिरवणूकांमुळे भुगाव, ता.मुळशी येथे वाहतुक जाम असल्याने वेळेत हॉस्पिटलला पोहोचेल की नाही सांगता येणे अवघड आहे. मयतांना पौड येथील शासकीय रूग्णालयात नेले असून नातेवाईंकाना संपर्क करणे चालू आहे.
पिरंगुट येथील अपघातात एकुण 4 जणांचा मृत्यू झाला असल्याचे पुढे आले आहे. पुजा बंडू पाटील (वय 17, रा पिरंगुट), नागेश अंकुश गव्हाणे (वय 21, सध्या रा. पिरंगुट मुळ कागलखेड, ता.आष्टि, जि.बीड), वैष्णवी सुनिल साेनवणे (वय 20 रा. पौड, ता.मुळशी, जि.पुणे), सुरज राठोड (पत्ता समजला नाही) या चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर पिरंगुट येथील विठ्ठल आनंदा भिलारे (वय 29) हा जखमी आहे. वैष्णवी सोनवणे ही हिंजवडीतील विप्रो कंपनीत नोकरी करत होती तर पुजा पाटील ही महाविद्यालयीन शिक्षण घेत होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पिरंगुट घाटातून खाली येताना तीव्र उतार आहे. तेथून आयशर ट्रक क्र. एम एच 15 जी व्ही 9011 हा भरधाव वेगाने खाली आला. हॉटेल रत्नाई येथे त्याने एक दुचाकी उडवली. तिथे दोन जणांना आपला जीव गमवावा लागला. तर लवळे फाटा पार केल्यानंतर वाईन शॉप समोर ट्रकने आणखी एक दुचाकी उडवली. तिथेही त्याने लोकांना उडवून पोबारा करण्याचा प्रयत्न केला. लोकांनी आरडाओरडा केल्यावर ड्युटीवर असलेल्या मयूर निंबाळकर या वाहतुक पोलिस व त्यांच्या सहकार्यांनी त्याला घोटवडे फाटा येथे पकडला. हा ड्रायव्हर अत्यंत मद्यधुंद अवस्थेत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मात्र त्याचे नाव पोलिसांकडून सांगण्यात आले नाही. ठाणे अंमलदारांशी वारंवार संपर्क करूनही संपर्क न झाल्याने दोषी आरोपीचे नाव समजलेले नाही.
Labels:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget