...अबबबब ऐनवेळी ८० विषय स्थायीत मंजुर: ३३० कोटीची कामे


पिंपरी (टाईमन्युजलाईन नेटवर्क): विधानसभेची अचारसंहिता लागेल या भितीने स्थायी समितीमध्ये  ऐनवेळी ३२३ कोटींचे ८० विषय मंजुर करण्यात आले. सभेच्या अध्यक्षस्थानी विलास मडिगेरी होते.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या सदस्यांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या अचारसंहितेचा धसका घेत. दोन विशेष सभा स्थायी समितीने घेतल्या आहे.विषय पत्रिकेवरील १० विषयांना मंजुरी दिली आहे. तर क्रिडा विभागाचे विषय ८ आठवड्यासाठी तहकूब करण्यात आले आहे. आजच्या सभेत ३३० कोटी ९५ लाख ६० हजार रुपयांच्या ९२ विषयांना मंजुरी दिली आहे.
विधानसभेची अचारसंहिता कधीही सुरु होऊ शकती. या भितीने करोडोंचे विषय मंजुर करण्यात आले. ऐनवेळचे विषय घ्यायचे नाही असा पवित्रा भाजपाने महापालिकेच्या सत्तेत येताच घेतला होता. मात्र, आजच्या सभेत सर्वच विक्रम मोडून ऐनवेळच्या ८० विषयांना मंजुरी देण्यात आली.

कोणाच्या भल्यासाठी नदीसुधार प्रकल्पातील पहिल्या टप्याला मंजुरी  देता
शहरातील नाले नदीत सोडले जातात. नाल्यातील पाणी शुद्ध करण्यासाठी नदीजवळ नदीतून पाईपलाईन टाकून एसटीपी प्रकल्पा उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी लागणाऱ्या परवानग्या नसताना याची निविदा काढली कशी असा सवाल राष्ट्रवादीचे नगरसेवक मयुर कलाटे यांनी उपस्थित केला. त्यावेळी भाजपाचे नगरसेवक राजेंद्र गावडे यांनी हस्तक्षेप करून नदी सुधारणा प्रकल्प होणे अवश्यक असल्याचे सांगितले. यावरून भाजपा आणि राष्ट्रवादी कॉग्रेसच्या नगरसेवकांची शाब्दीक बाचाबाची झाली. त्यावेळी याप्रकल्पाला आमचा विरोध नसून चुकीच्या पद्धतीने निविदा काढण्यात आल्या असल्याचा आरोप कलाटे यांनी केला. यावर आयुक्त श्रावण हर्डींकर यांनी ही पाईपलाईन टाकण्यासाठी परवानग्याची अवश्यकता नाही ही लाईन जमिनीच्या खालून जाणार असल्याचा खुलासा केला. या चर्चेत राहुल कलाटे, पंकज भालेकर, राजेंद्र गावडे, शितल शिंदे, मयुर कलाटे यांनी सहभाग घेतला. 
Labels:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget