पिंपरी (टाईमन्युजलाईन नेटवर्क):पिंपळे गुरव येथे
हॉर्न वाजवला म्हणून पिंपरी चिंचवडमध्ये डेंटिस्ट डॉक्टरला एका इसमाने मारहाण केली. या मारहाणीत डाव्या कानाच्या पडद्याला छेद पडल्याचा आरोप जखमी डॉक्टरांनी केला. पिंपळे गुरव येथील कल्पतरू सोसायटीच्या गेट वरील ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली.
आदित्य पतकराव असं जखमी डॉक्टरांचं नाव असून मनोज मोरया असं मारहाण करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी सांगवी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आदित्य आणि मनोज हे दोघे ही कल्पतरू सोसायटीमध्येच राहतात. सोमवारी चारचाकीतुन आलेल्या मनोज यांचा सोसायटीच्या गेट समोर सुरक्षा रक्षकांसोबत वाद सुरू होता. मागून दुचाकीवर आलेले डॉक्टर आदित्य यांना सोसायटीत जायचं असल्याने त्यांनी हॉर्न वाजवला आणि मनोज संतापले. त्यांनी तिथंच आदित्य यांच्या कानशिलात लगावली. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय तर वैद्यकीय चाचणीत डाव्या कानाच्या पडद्याला छेद पडल्याचा आरोप आदित्य यांनी केला. याप्रकरणी सांगवी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.