पुणे पोलिसांची दिल्ली विद्यापीठातील प्राध्यापकाच्या घरी छापेमारी


पुणे (टाईम न्युजलाईन नेटवर्क)
भीमा- कोरेगांव हिंसाचार प्रकरणी पुणे आणि नोएडा पोलिसांच्या संयुक्त पथकाने दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक हनी बाबू यांच्या घरी मंगळवारी छापा मारला. नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे.  २०१८ मध्ये भीमा कोरेगांव येथे मोठ्याप्रमाणत हिंसाचार उफाळला होता. पोलिसांना संशय आहे की हा हिंसाचार भडकवण्यामागे नक्षलवाद्यांचा हात होता.भीमा कोरेगांव हिंसाचार प्रकरणात मानविधकार कार्यकर्त्या सुधा भारद्वाज, व्हनरेन गोन्सालविस, पी वरवरा राव, अरूण फरेरा आणि पत्रकार गौतम नवलाखा यांचा समवावेश आहे. या सर्वांची पोलिसांनी चौकशी केलेली आहे व यातील बरेचजण तुरूंगातही आहेत. सुधा भारद्वाज वर्षभरापासून तुरूंगातच आहेत. मागील आठवड्यात ६ सप्टेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयात त्यांच्या वकिलाकडून पोलिस सुधा भारद्वाज यांच्याविरोधात कोणतेही विश्वसनीय पुरावे सादर करू शकले नसल्याचे सांगत युक्तीवाद करण्यात आला होता. भारद्वाज यांच्याकडून उच्च न्यायालयात जामीन अर्ज करण्यात आला आहे.
१ जानेवारी २०१८ रोजी पुणे जिल्ह्यातल्या शिरुर तालुक्यातील भिमा नदीच्या काठी वसलेल्या कोरेगांव गावात हिंसाचाराची घटना घडली होती. १ जानेवारी रोजी येथे असलेल्या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आंबेडकरी जनता लाखोंच्या संख्येने येथे हजेरी लावते. वर्षानुवर्षे शांततेत पार पडणाऱ्या या सोहळ्याला मागीलवर्षी मात्र काही समाजकंटकांच्या विशुद्ध हेतूमुळे गालबोट लागले होते. या घटनेचा निषेध म्हणून  भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. शिवप्रतिष्ठान संघटनेचे संभाजी भिडे आणि हिंदुत्ववादी नेते मिलिंद एकबोटे यांच्यावर ही दंगल घडवून आणल्याचा आरोप काही दलित संघटनांनी केला होता. दरम्यान, पुणे पोलिसांनी याप्रकरणी काही डाव्या विचारांच्या कार्यकर्त्यांना अटक केली आहे.
Labels:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget