चिंचवड मतदारसंघात 2009 आणि 2014 साली सर्वाधिक मतदार


मुंबई, (टाईम न्युजलाईन नेटवर्क) : 2009 आणि 2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या वेळी 288 मतदारसंघांपैकी चिंचवड मतदारसंघात अनुक्रमे 3 लाख 91 हजार 857 आणि 4 लाख 84 हजार 362 मतदारांची नोंदणी झाली होती.
2009 सालच्या विधानसभा निवडणुकीत चिंचवड नंतर दुसऱ्या क्रमांकावर चांदिवली मतदारसंघात 3 लाख 68 हजार 233 मतदारांची नोंद होती. तर वडगाव (शेरी) या मतदारसंघात एकूण 3 लाख 65 हजार 861 मतदारांची नोंद करण्यात आली. हडपसर या मतदारसंघात 3 लाख 63 हजार 007 मतदार तर खडकवासला या मतदारसंघात 3 लाख 56 हजार 137 मतदारांची नोंद होती.
2014 सालच्या विधानसभा निवडणुकीत चिंचवडनंतर खडकवासला मतदारसंघात 4 लाख 28 हजार 239 मतदारांची नोंद होती. तर पनवेल या मतदारसंघात एकूण 4 लाख 23 हजार 716 मतदारांची नोंद करण्यात आली. चांदिवली या मतदारसंघात 4 लाख 17 हजार 700 मतदार तर हडपसर या मतदारसंघात 4 लाख 16 हजार 800 मतदारांची नोंद होती.
विशेष म्हणजे चिंचवडखडकवासलाचांदिवली आणि हडपसर या चार मतदारसंघात 2009 आणि 2014 साली अधिक मतदार संख्या असल्याची नोंद आहे.
तिरोडा आणि वडाळ्यामध्ये सर्वांत कमी मतदार
2009 सालच्या विधानसभा निवडणुकीत तिरोडा मतदारसंघात 1 लाख 91 हजार 149 मतदारांची नोंद होती. तर 2014 सालच्या विधानसभा निवडणुकीत वडाळा मतदारसंघात 1 लाख 96 हजार 951 मतदारांची नोंद होती.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget