व्यायामशाळा चालविण्यासाठी देण्यात येणारे सेवाशुल्क होणार बंद – तुषार हिंगे



पिंपरी,(टाईम न्युजलाईन नेटवर्क) :  : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे शहरातील विविध भागांत तब्बल 82 व्यायामशाळा आहेत. त्या स्थानिक मंडळांना चालविण्यासाठी दिला जात असून, त्यापोटी पालिका दरमहा दरमहा 2 हजार रूपये सेवाशुल्क देते. मात्र, संबंधित मंडळांबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने सेवाशुल्क देण्याची पद्धत बंद करण्याचा निर्णय क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीने सोमवारी (दि.16) झालेल्या सभेत घेतला आहे, अशी माहिती समिती सभापती तुषार हिंगे यांनी दिली. या निर्णयामुळे पालिकेचे दरवर्षी तब्बल 20 लाख रूपयांची बचत होणार असून, वीज बिल संबंधित मंडळांतर्फे दरमहा भरले जाणार आहे. 
समिती अध्यक्ष तुषार हिंगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेला समिती सदस्य विकास डोळस, बाबा त्रिभुवन, सागर गवळी, राजू मिसाळ, अपर्णा डोके, सहायक आयुक्त अण्णा बोदडे आदी उपस्थित होते.
तुषार हिंगे यांनी सांगितले की, पालिकेच्या शहरात एकूण 82 व्यायामशाळा आहे. त्या सार्वजनिक मंडळ, स्वयंसेवी संस्था, प्रतिष्ठान आणि संस्थांना दरमहा 2 हजार रूपये सेवाशुल्क तत्वावर देण्यात येतात. तसेच, पालिका व्यायामशाळेसाठी साहित्य पुरविते. अनेक मंडळे व संस्था व्यायामशाळा व्यवस्थितपणे चालवित नाहीत. काही व्यायामशाळा बंदच असतात.अनेक ठिकाणी व्यायामाचे साहित्य चोरीला गेले आहे. व्यायामशाळाची दुरवस्था झाली आहे. संबंधितांकडून वीजेचे बिल दरमहा भरले जात नाही. या प्रकाराच्या अनेक तक्रारी क्रीडा विभागास प्राप्त झाल्या आहेत. त्याची दखल घेऊन क्रीडा समितीने त्या मंडळांना दरमहा सेवाशुल्क देणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधितांना दरमहा वीज बिल भरून ते क्रीडा विभागात सादर करणे सक्तीचे केले आहे. या निर्णयामुळे पालिकेचे दरमहा तब्बल 20 लाख रूपयांची बचत होणार आहे. त्याचा परिणाम म्हणून व्यायामशाळा चांगल्या संस्थामार्फत चालविल्या जातील आणि त्याचा लाभ स्थानिक नागरिकांना घेता येईल, असा विश्‍वास हिंगे यांनी व्यक्त केला.
Labels:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget