पिरंगुट,(टाईम न्युजलाईन नेटवर्क) - हिंदवी स्वराज्याचं रायरेश्वर, तोरण असलेला तोरणा, स्वराज्याची राजधानी असलेला राजगड सारखा किल्ला भोर विधानसभेत असतानाही येथे भगवा फडकत नाही, ही शरमेची बाब असून युती असो अथवा नसो कॉग्रेसच्या तावडीतून भोर विधानसभा मुक्त करण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज राहण्याचे आवाहन शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर यांनी केले.
सहसंपर्कप्रमुख बाळासाहेब चांदेरे यांनी आयोजीत केलेल्या शिवसेना मेळाव्यात घोटावडे फाटा ( ता. मुळशी ) येथे मिर्लेकर बोलत होते. यावेळी बारामती मतदारसंघांचे संपर्कप्रमुख सत्यवान उभे, जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, विधानसभा संपर्कप्रमुख मिलिंद हांडे, सहसंपर्कप्रमुख कुलदीप कोंडे, बाळा कदम, दत्तात्रय टेमघरे, आत्माराम कलाटे, युवासेना जिल्हाधिकारी अविनाश बलकवडे, बारामती लोकसभा संपर्कप्रमुख शालिनी देशपांडे, महिला जिल्हासंघटीका संगीता पवळे, स्वाती ढमाले, ज्योती चांदेरे, जिल्हा परिषद सदस्य सागर काटकर, मुळशीप्रमुख संतोष मोहोळ, भोरप्रमुख ज्ञानेश्वर शिंदे, वेल्हाप्रमुख शैलेंद्र वालगुडे, उपतालुकाप्रमुख संतोष रेणुसे, बबनराव दगडे, सचिन साठे, युवासेनेचे युवराज जेधे, केदार देशपांडे, राम गायकवाड, प्रकाश भेगडे, संतोष तोंडे, नामदेव टेमघरे यांच्यासह शिवसैनिक व महिला उपस्थित होत्या.
शिवसेनेमध्ये प्रामाणिक काम करणाऱ्या शिवसैनिकाला न्याय देण्याचे काम पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करत असून सामाजीतील वंचित घटकांचे अश्रू पुसण्याचे काम फक्त शिवसेनाच करू शकते. धनुष्यबाण हाच उमेदवार समजून भोरमध्ये बदल करण्याचे आवाहन सहसंपर्कप्रमुख कुलदीप कोंडे यांनी केले. तर बाळासाहेब चांदेरे यांनी गेल्या १० वर्षात एकही आमसभा घेतली नसल्याचा आरोप आमदार संग्राम थोपटे यांचे नाव न घेता टीका केली. यावेळी कॉंग्रेसच्या महिला अध्यक्षा कांता पांढरेसह शेकडो कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला असून त्यांचा मिर्लेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. स्वाती ढमाले यांनी महिला आरक्षणनुसार उमेदवारी मागितल्याने सर्वाच्या भुवया उंचावल्या.
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.