पिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):
अकार्यक्षम, कामचुकार, अधिका-यांमुळे व ठेकेदारांमुळे पाणी असून पाण्याचे नियोजन कोलमडले आहे. महापालिकेतील भाजपाचे अनेक पदाधिकारी प्रत्येक्ष अप्रत्येक्ष ठेकेदारीत गुंग असल्यामुळे त्यांचे या मुलभूत प्रश्नांकडे लक्ष नाही. हि पाणी कपात कृत्रिम असून यामध्ये पदाधिकारी, अधिका-यांचे आर्थिक हितसंबंध गुंतलेले आहे. अशा प्रकारची पाणी टंचाई निर्माण करुन त्या आडून टँकर लॉबी पोसण्याचा धंदा सत्ताधारी चालवीत आहेत. त्यांच्या कामाची चौकशी करावी अशी मागणी आज मुख्यमंत्री फड़नवीस यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे
पवना धरणाची पातळी खाली आली म्हणून पिंपरी चिंचवड शहरात दिवसाआड पाणी करण्यात आले. आता पवना धरण १००% भरल्याने आणि नदीला पुर आल्याने पाणी वाहून जात होते. त्याची दखल घेऊन पुन्हा नियमित पाणी सोडण्याचा निर्णय झाला. मात्र महापालिकेच्या पदाधिकारी, अधिका-यांनी ऐन पावसाळ्यात पुन्हा आठवड्यातुन एक दिवस पाणी बंद असा निर्णय घेण्यात आला आहे.

पवना धरणात मुलबल पाणीसाठा असताना देखील अपुरा व कमी दाबाने पाणी पुरवठा केला जातो. महापालिकेने समान पाणीपुरवठ्यासाठी स्काडा आणि २४ बाय ७ पाणीपुरवठा योजना राबविली. दरवर्षी पाणीपुरवठ्यासाठी करोडो रुपये महापालिका तिजोरीतून खर्ची पडतात. तरीही शहरवाशींयांना पुरेशा दाबाने पाणी मिळत नाही. यामध्ये महिला माता-भगिंनीना खुप त्रास सहन करावा लागतो. हे सर्व पदाधिकारी, अधिका-यांच्या खाबुगिरीमुळेच होत असून संपुर्ण पाणी पुरवठा विभाग व मागील तीन वर्षात सर्व निर्णयांची उच्च स्थरीय चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करावी.अशी मागणी केली आहे
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.