तंत्रज्ञान भारतात आणण्यासाठी राजीव गांधी यांचा पुढाकार : रत्नाकर महाजन

 दुर्गादेवी टेकडीवर वृक्षारोपण
पिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क
) : आपल्या कुटुंबावर असणा-या सार्वजनिक कामाच्या जबाबदारीबाबत पंतप्रधान राजीव गांधी यांना आस्था होती. सुहृदय, सौजन्यशील व सालस व्यक्तीमत्व असणारे पंतप्रधान राजीव गांधी हे पायलट म्हणून नोकरी करीत असताना जगभर कामानिमित्त फिरत होते त्या वेळी प्रगत देशामधील नवनवीन तंत्रज्ञान त्यांनी समजून घेतले. पंतप्रधान झाल्यावर ते तंत्रज्ञान भारतात आणण्यासाठी पुढाकार घेतला, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते रत्नाकर महाजन यांनी केले.
स्व. पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त निगडी प्राधिकरण येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, माजी महापौर कविचंद भाट, ज्येष्ठ नेते सुदाम ढोरे, सेवादलाचे राष्ट्रीय सहसचिव संग्राम तावडे, महाराष्ट्र प्रदेश महिला कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा शामला सोनवणे, अल्पसंख्यांक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रसिंह वालिया, महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस सरचिटणीस मयूर जैयस्वाल, ब्लॉक अध्यक्ष विष्णूपंत नेवाळे, परशुराम गुंजाळ, बाळासाहेब साळुंखे, ओबीसी सेलचे शहराध्यक्ष किशोर कळसकर, शहर उपाध्यक्ष दिलीप पांढारकर, असंघटीत कॉंग्रेस शहराध्यक्ष सुंदर कांबळे, असंघटीत कॉंग्रेसच्या महिला शहराध्यक्षा शीतल कोतवाल, मकर यादव, एन्‌एसयुआयचे माजी शहराध्यक्ष विशाल कसबे, ज्येष्ठ नेते तानाजी काटे, भास्कर नारखेडे, संदेश नवले, आबा खराडे, मेहताब इनामदार, ॲड. राजेंद्र काळभोर, हिरामण खवळे, विवेक जगताप, नितीन पटेकर, आशाताई शहाणे, अलका काळे, वंदना आराख, उमा शेख, सुभाष भूसणे, दीपक जाधव, चंदा ओव्हाळ, अरूणा कांबळे, अनिरूद्ध कांबळे आदी उपस्थित होते.
रत्नाकर महाजन म्हणाले की, नेहरू-गांधींबद्दल अनुद्‌गार काढणे ही फॅशन झाली आहे. मात्र, मोतीलाल नेहरू ते इंदिरा गांधींपर्यंत या कुटुंबातील 12 लोकांनी तुरुंगवास भोगला आहे. तर स्वातंत्र्यापूर्वी शामाप्रसाद मुखर्जी यांनी मुस्लिमलीग बरोबर पश्चिम बंगालमध्ये सरकार स्थापन केले होते. 1942चा लढा चिरडण्यासाठी ब्रिटिशांना मदत करण्याची भूमिका मुखर्जी यांनी घेतली होती. हेच मुखर्जी पुढे जनसंघाचे संस्थापक झाले. भाजपाने निवडणुक आयोग, आयकर विभाग, ईडी, सीबीआय, यूजीसी, सर्वोच्च न्यायालय आदि स्वायत्त संस्था स्वत:च्या ताब्यात ठेवल्या आहेत. यातूनही मार्ग काढत आपल्याला सनदशीर, लोकशाही मार्गाने लोकांसमोर जायचे आहे. ज्याप्रमाणे आणीबाणीनंतर तसेच 1984च्यानंतर निवडणुकीत कॉंग्रेसने पराभव पाहिलेला आहे. त्यानंतरच्या निवडणुकीत कॉंग्रेस पुन्हा सत्तेवर आली आहे हे कार्यकर्त्यांनी ध्यानात घ्यावे असेही महाजन म्हणाले.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget