रस्त्यातील खड्डामुळे आयटीयन्सचा जीव धोक्यात


पिंपरी(टाईमन्युजलाईन नेटवर्क): भुमकार चौक ते लक्ष्मीचौक दरम्यान असलेल्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणत खड्डे पडले असून, त्यामुळे सकाळी-संध्याकाळी येथे मोठी वाहतूककोंडी होते. जुलैच्या अखेरीस व ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीच्या काळात झालेल्या अतिवृष्टीमुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणत पाणी वाहत होते. यामुळे मोठ्या प्रमाणत खड्डे पडल्याचे निदर्शनास आले. मात्र या अतिमहत्वाच्या रस्त्यावर पाऊस उघडल्यावरही मागील आठवड्याभरात डागडुजी करण्याचे कोणतेही काम करण्यात आलं आले नसल्यामुळे आयटीयन्स मध्ये नाराजी आहे.  
       हा रस्ता लक्ष्मी चौक ते भुमकारवस्तीकडे जातो, त्यामुळे पिंपरी-चिंचवडला जोडला जातो. तर संत तुकाराम मागाल कार्यालय मार्गे ईण्डेन पेट्रोलपंप मार्गे हा रास्ता पुणे-बंगलोर महामार्गाला जोडला जातो. त्यामुळे पुण्याकडे जाण्यासाठीदेखील या मार्गाचा वापर केला जातो. मात्र मागील काही दिवसांपासून पडलेल्या खड्ड्यांमुळे येथील वाहतूक संथ गतील सुरु असते. यामुळे वाहतूकसाचे व्यवस्थापन हि मोठी कसरत ठरत आहे. मेट्रोच्या कामाची सुरुवात झाली असून,त्यासाठी वाहतुकीत बदल केले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच हिंजवडी येथील शिवाजी चौकातूनही वाहतूक कमी करण्याचा प्रशासनाचे प्रयत्न आहे. त्यामुळे हा रस्ता महत्वाचा आहे. तरीही या रस्त्याच्या कामासाठी विलंब होत आहे. पालिका व एमआयडीसीने लवकरात लवकर याची दुरुस्ती करावी अशी नागरिकांची मागणी आहे.
Labels:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget