सरपण विकणाऱ्या तरुणाचा खून


पिंपरी (टाईमन्युजलाईन नेटवर्क)
देहूगावमधील झेंडेमळा सरपण विकण्याच्या वादातून दोघांनी मिळून एकाचा खून केला. दोन्ही आरोपींना देहूरोड पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना मंगळवारी (दि. 20) येथे घडली.

रामदास मेंगळे (रा. झेंडेमळा, देहूगाव) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी  बबन मेंगळे आणि गणपत मेंगळे यांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शाम मेंगळे त्यांच्या कुटुंबासह झेंडेमळा येथे शेतात राहतात. मंगळवारी दुपारी त्यांची पत्नी जिजा आणि भाऊ रामदास यांच्यामध्ये सरपण विकण्यावरून वाद झाला. या वादातून जिजा हिने भाऊ बबन मेंगळे याला फोन करून हा प्रकार सांगितला. रात्री साडेसातच्या सुमारास बबन मेंगळे हा त्याचा चुलत भाऊ गणपत याला घेऊन आला. दोघांनी रामदास यांना लाकडी दांडक्याने आणि लोखंडी पाईपमारहाण केली.घटनेनंतर रामदास बेशुद्ध पडले. रामदास झोपी गेल्याचे समजून काही वेळ शाम यांनी त्यांना उठवले नाही. रात्री दहाच्या सुमारास त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला असता ते उठले नाहीत. शाम यांनी शेजा-यांच्या मदतीने रामदास यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच रामदास यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.पुढील तपास देहुरोड पोलीस करीत आहेत.
Labels:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget