उत्तर प्रदेशातून विमानाने येवून चोरी करणारा सराईत गुन्हेगार अटक:वाकड पोलिसांची कारवाई


पिंपरी (टाईमन्युजलाईन नेटवर्क):
उत्तर प्रदेशातून विमानाने येऊन नामांकित हॉटेलमध्ये वास्तव्य करून चोरी करणाऱ्यास वाकड पोलिसांनी जेरबदं केले. त्याच्या आठ लाख रुपयांचा ऐवज हस्तगत केला. अनिल मिश्री राजभर (वय 36, रा. ग्राम पोस्ट बोदरी, थाना चन्दवक, तहसील केरावत, जि. जौनपूर, उत्तरप्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत 22 जुलै रोजी अक्षय रवींद्र मिश्रा (रा. माऊली रेसिडन्सी, वाकड) यांच्या घरी चोरी झाली. चोरट्याने घरातील नऊ तोळ्याचे सोन्याचे दागिने आणि लॅपटॉप चोरून नेला. त्यानंतर 25 जुलै रोजी मनिषा गणेश बन्ने (रा. मिडोज सोसायटी, थेरगाव) यांच्याही घरी चोरी झाली. चोरट्याने त्यांच्या घरातील 13.7 तोळे वजनाची सोन्याचे दागिने चोरून नेले. या दोन्ही चोऱ्या कडी कोयंडा उचकटून झाल्या.या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी तीन पथके तयार केली.
यापैकी पोलिस कर्मचारी विक्रात जगदाळे, प्रशांत गिलबिले, नितीन गेंगजे, आणि तात्यासाहेब शिंदे हे सीसीटिव्हीची तपासणी करीत असतना त्यांना आरोपींबाबत माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी उत्तरप्रदेशात जाऊन आरोपीला अटक केली. न्यायालयाने त्याला दहा दिवसांची पोलिस कोठडी दिली. त्यामध्ये त्याने दोन ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली. त्यानुसार आरोपीकडून 25 तोळे वजनाचे दागिने आणि लॅपटॉप असा एकूण आठ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला.

आरोपी अनिल हा उत्तर प्रदेशातून घरफोडी करण्यासाठी विमानाने येत असे. शहरातील नामांकित हॉटेलमध्ये तीन ते चार दिवस वास्तव्य करून बंद असलेल्या फ्लॅटमध्ये घरीफोडी करीत असे. चोरलेला मालाची शहरातच विल्हेवाट लावून पुन्हा तो उत्तरप्रदेशात विमानाने जात होता. त्याच्यावर यापूर्वी मुंबईत चार घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.

पोलीस आयुक्‍त आर. के. पद्‌मनाभन, अतिरिक्‍त आयुक्‍त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्‍त सुधीर हिरेमठ, सहायक आयुक्‍त श्रीकांत मोहिते, वरिष्ठ निरीक्षक सतीश माने, उपनिरीक्षक हरीश माने, सिद्धनाथ बाबर, कर्मचारी विक्रम जगदाळे, प्रशांत गिलबिले, नितीन गेंगजे, तात्यासाहेब शिंदे, बापूसाहेब धुमाळ, विभिषण कन्हेरकर, नितीन ढोरजे, जावेद पठाण, दीपक भोसले, प्रमोद भांडवलकर, भैरोबा यादव, विजय गंभीरे, शाम बाबा, विक्रम कुदळ , प्रमोद कदम, सुरेश भोसले, नुतन कोंडे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

Labels:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget