पाणी कपातीवरून महासभेत आयुक्तांवर सर्वपक्षीय नगरसेवकांचा हल्लाबोल


पिंपरी(टाईमन्युजलाईन नेटवर्क): पवना धरण शंभर टक्के भरले असूनही पिंपरी-चिंचवड महापालिकेने एक दिवस पाणी कपात केली आहे. तर शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. सर्वपक्षीय नगरसेवकांनी आयुक्त श्रावण हार्डींकर व पाणी पुरवठा विभागाला धारेवर धरत हल्लाबोल केला.
पिंपरी-चिंचवड शहरात पाणी पुरवठा विस्कळीत झाला असल्याची व्यथा नगरसेवकांनी मांडली. पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी पाणी वेळेवर सोडत नाहीत. तर पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर परिसरात अधिकारी मिनिरल वॉटर कंपनीला पाणी देवून खाबुगिरीचे कुराण तयार केले असल्याचा आरोप भाजपाचे नगरसेवक अंबरनाथ कांबळे यांनी केली. आयुक्तांचा प्रशासनावर पकड नाही. आनागोंदी कारभार सुरु आहे. मिळत आहे ते पाणी समान पद्धतीने वाटप केले पाहिजे. सल्लागारांचा तर महापालिकेत पेव फुटला आहे. पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी सल्लागार नियुक्त करा परंतु, पाणी पुरवठा सुरळीत करा. अशा संतप्त प्रतिकिया नगरसेवकांनी व्यक्त केल्या.
पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी ठेकेदारांना पोसण्याचे काम करीत आहे. पाणी टंचाई करून नागरिकांना वेठीस धरले जात आहे. नागरिकांच्या रोषाला आम्हाला सामोरे जावे लागत असल्याचे नगरसेवकांनी सांगितले. महापौरांनी जलपुजण केले आणि जल हरविले असल्याचा आरोप शिवसेनेचे नगरसेवक प्रमोद कुटे यांनी केला. पंपीग स्टेशन बंद पडते हे महापालिकेचे अपयश आहे. तुमचा आमचा बांधाला बांध नाही. तरी ही पाणी टंचाई होत आहे. भाजपाची सत्ता आली म्हणून पाणी गेले नाही. तर राष्ट्रवादीने पाण्याचे नियोजन केले नाही. मागच्या राज्यकर्त्यांच्या चुका झाल्या त्या आपल्याकडून होता कामा नये. पाण्याची साठवणूक कशी होईल याचे नियोजन केले पाहिजे. पाणी पुरवठा विभागातील अधिकारी काम करीत नसेल त्यांना घरी बसवा किंवा निलंबित करा. असे आवाहन नगरसेवकांनी केले.
 अधिकारी व नगरसेवकांना मानधन घेतो ते नागरिकांच्या करातूनच. प्रशासनाच्या या चुका आहे. आम्हाला मोर्चे काढावे लागले नाही पाहिजे. आशा भावना शितल शिंदे यांनी व्यक्त केल्या. दोन ते तीन वर्षात मुलभूत सुविधा नागरिकांना देता येत नाही. 
Labels:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget