पुणे(टाईम न्युजलाईन नेटवर्क) : गणेशोत्सव शांततेत व उत्साहात साजरा व्हावा यासाठी प्रशासनाने योग्य दक्षता घेतली आहे. याकाळात वाहतूक व्यवस्था सुरळीत रहावी, यासाठी पोलिसांनी नियोजन करावे. गणेशोत्सव शांततेने चांगल्या प्रकारे साजरा व्हावा यासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज येथे केले.
गणेशोत्सवानिमित्त जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था संदर्भात तसेच पुणे येथील व्यवस्थेबाबतची आढावा बैठक जिल्हाधिकारी राम यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील, पिंपरी चिंचवड पोलिस उपायुक्त सुधीर हिरेमठ,अपर पोलिस आयुक्त श्रीकांत तरवडे,निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी राम म्हणाले, पुणे जिल्हयात अतिशय चांगल्या प्रकारे गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. यंदाही शांततेत व चांगल्या प्रकारे हा उत्सव साजरा करावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ, जिल्हा आरोग्य विभाग,एनडीआरएफ, राज्य उत्पादन शुल्क,पाटबंधारे विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आदीसोबतच विविध विभागांच्या माध्यमातून गणेशोत्सवाबाबत सुरू असलेल्या तयारीचा आढावा घेतला.
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.