कोकणातील विद्यार्थी पुढे जाण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे-भंडारी

कोकणातील विद्यार्थी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेपर्यंत राज्यामध्ये पुढे आहेत मात्र त्या पुढच्या शिक्षणासाठी आणि व्यवसायासाठी त्यांचा प्रयत्न अपुरा पडतो त्याकरिता आपण सर्वांनी प्रयत्न  करणे गरजेचे
आहे.असे मत भाजपाचे महादेव भंडारी यांनी व्यक्त केले

सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळ पिंपरी-चिंचवड पुणे मंडळाचा वार्षिक स्नेहमेळावा नुकताच संत तुकाराम नगर आचार्य अत्रे रंगमंदिर येथे मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश मुख्य प्रवक्ते
महादेव भंडारी त्याचप्रमाणे प्राधिकरण अध्यक्ष श्री, सदाशिव खाडे महापौर, श्री राऊल जाधव सत्तारूढ पक्ष नेते,एकनाथ पवार, मंडळाचे अध्यक्ष अजय पाताडे, रामकृष्ण राणे, अरविंद पालव,प्रमोद राणे, अंकुशराव साईल, परशुराम प्रभु हे मान्यवर उपस्थित होते, मंडळातील कलाकारांचा स्पर्धात्मक सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला याचे परीक्षण श्री तुषार रिठे, सौ अर्चना काटे, सौ मेघा साईल यांनी केले,नाट्य सिंधूच्या वतीने "विठाबाईचा कावळा"ही एकांकिका सादर करण्यात आली यावेळी एकूण १८० विद्यार्थांचा गुण गौरव करण्यात आला, दरवर्षीप्रमाणे ज्यांनी या मंडळाची मुहूर्तमेढ रोवली ते श्री लहू प्रभु याना सिंधुदुर्ग जिल्हा भूषण पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात आले, तसेच श्री राजेंद्र माधव भाये,श्री रामचंद्र कृष्णा गावडे,श्री अशोक जगन्नाथ राणे, श्री आत्माराम तुकाराम गावडे, श्री उदय सदाशिव घाडीगावकर या पाच व्यक्तींना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
    यावेळी बोलताना माधव भंडारी म्हणाले  देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील भविष्यातला भारत देश हा सुजलाम-सुफलाम होण्याकरिता देशाच्या कानाकोपऱ्यात प्रत्येक ठिकाणी मिळत असलेल्या नैसर्गिक देणगीतून त्या त्या भागातील उत्पादन निर्मिती व्हावी  याकरिता आवश्यक असलेली अत्याधुनिक यंत्रणा उभी करून स्थानिकांना यामध्यामातून रोजगार उपलब्ध होईल पुढील काळामध्ये कोकण वासियानी याचा फायदा घेऊन कोकणातील नैसर्गिक कोकणी मेवा व मच्छीमार यांनी याचा फायदा घ्यावा.. आणि पंतप्रधान आवास योजना ही ग्रामीण भागासाठीही लागू करण्यात आली आहे त्याचा हि लाभ घ्यावा.. कोकणातील विद्यार्थी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेपर्यंत राज्यामध्ये पुढे आहेत मात्र त्या पुढच्या शिक्षणासाठी आणि व्यवसायासाठी त्यांचा प्रयत्न अपुरा पडतो त्याकरिता आपण सर्वांनी प्रयत्न  करणे गरजेचे आहे.
  शहराचे महापौर राहुल जाधव यांनी मंडळाच्या कार्याचे कौतुक केले  मंडळ सर्व स्तरांमध्ये उत्तम कार्य करत आहे, मंडळाचे कार्य जिल्ह्यापुरते मर्यादित न ठेवता शहरांमधील जडणघडणीत मध्ये मंडळाचा मोठा सहभाग दिसून येतो म्हणून मंडळाच्या कार्यकर्त्याचे अभिनंदन केले.
  सूत्रसंचालन संतोष साटम यांनी केले प्रस्ताविक मंडळाचे अध्यक्ष अजय पाताडे यांनी केले तर आभार एडवोकेट, चंद्रकांत गायकवाड यांनी मानले.
  अरुण दळवी, धर्मराज सावंत, चंद्रकांत साळसकर, प्रकाश साहील,नंदकिशोर सावंत, राजेश कांडर,चंद्रकांत नाईक, अशोक राणे, विवेक मेस्त्री,  संजय सावंत, बाळा गुरव, वसंत आरेकर, शरद कवठणकर, दीपक राणे,नरेंद्र धुरी, प्रकाश परब,सुरेश वेंगुर्लेकर, महादेव बागवे, संतोष गावडे,संतोष धुरी, यशवंत गावडे, विष्णु भुते, बाळकृष्ण नाईक, सुनील गायकवाड, शंकर दळवी, मयूर राणे, भिवा परब, मोरेश्वर पवार, कृष्णा गवस, रामकृष्ण पताडे, सुरज पताडे, सौ शोभा नाईक, सौ शितल गवस, सौ दिपा सावंत,  सौ श्रद्धा साटम, कु मनाली पाताडे, कु समिधा पताडे, सौ मृणाली राणे, नैना धुरी, सौ प्रतिक्षा गावडे, सौ स्वाती गावडे, सौ सोनाली कांडर, सौ कविता नाईक,  सौ शोभा गायकवाड, सौ दीप्ती नाईक , सौ विद्या मेस्री इत्यादींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
Labels:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget