बावधनमध्ये महिलेचा रस्त्यावर राडा


पिंपरी (टाईमन्युजलाईन नेटवर्क):
पुण्यातील बावधनमध्ये एका महिलेने पोलिसांसमोर थेट कपडे काडून अश्लीश शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला आहे. त्यापूर्वी या महिलेने स्वतःच्या गाडीने ठोकर देत एका गाडीचा ही चक्काचूर केला. 20 ऑगस्टच्या पहाटेची ही घटना सीसीटीव्हीत ही कैद झाली. तर पोलिसांना धमकी देतानाचा व्हिडीओ ही समोर आला.
स्वाती मिश्रा असे या महिलेचं नाव आहे. स्वातीने तिच्या डस्टर गाडी ने  नॅनो गाडीला पुढून, मागून अन उजव्या बाजूने असे निदान 15 वेळा ठोकर दिली. बावधनच्या रामनगर कॉलनीत हा प्रकार घडला. दर्श चावला यांनी विहार सोसायटीच्या समोर त्यांची गाडी पार्क केलेली होती. तेंव्हा स्वातीने पहाटेच्या वेळी अचानक पणे ठोकर दिली. सुरुवातीला अनावधानाने हा अपघात घडला असावा असा अंदाज उपस्थितांनी बांधला. म्हणून दोघे गाडी जवळ गेले, पण ठोकर देण्याचं सत्र सुरूच राहिलं. स्वातीने एकामागे एक असे 8 ठोकर नॅनो गाडीला समोरून दिले. नॅनो गाडी झाडाला टेकली, मग स्वातीने गाडी फिरवून घेतली आणि मागील बाजूनं ठोकर द्यायला सुरुवात केली. गाडी दुसऱ्या झाडाला येऊन धडकली, तिथं ही स्वाती थांबली नाही. नंतर तिने उजव्या बाजूला गाडी ठोकली. तिला काहींनी रोखण्याचा प्रयत्न केला पण तिने उपस्थितांना शिवीगाळ केली. नॅनो गाडीच्या आधी तिथून काही अंतरावर आणखी एका गाडीला स्वातीने ठोकर दिल्याच ही बोललं जातंय. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून स्वातीला अद्याप अटक झालेली नाही.
पोलीस चौकशीसाठी तिच्यापर्यंत पोहचले तेंव्हा, स्वातीने पोलिसांनाच धमकावले. आज गाडी ठोकली उद्या लोकांना उडवणार, पुरुष माझे नको तसे व्हिडीओ बनवतात. मग पोलिसांनी आमची मदत करायला हवी. मग मला त्रास देणारे कोण याचा शोध लावा. पण फिर्यादीने माझी गाडी का ठोकली असा प्रश्न विचारला असता, प्रतिउत्तरात माझ्या जे गुन्हे दाखल करायचे ते करा. पुरुष जात शोषण करणारी आहे, आता तुमच्यासमोर कपडे काढू का? महिलांचा आदर करायला शिका असा उलट उपदेश तिने दिला. पुढे काही अघटित घडू नये म्हणून शेवटी पोलिसांनी ही तिथून काढता पाय घेतला.

Labels:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget