पुणे, (टाईम न्युजलाईन नेटवर्क): शासकीय अधिकारी व अशासकीय सदस्य यांच्या संवाद आणि समन्वयातून ग्राहक कल्याण साधले जावे, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी व्यक्त केली. पुणे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड उपस्थित होते.
जिल्हाधिकारी राम म्हणाले, प्रत्येक व्यक्ती ग्राहक असतो, त्यामुळे शासकीय अधिका-यांनीही आपली जबाबदारी पार पाडतांना आपणही ग्राहकाच्या संज्ञेत येतो, हे लक्षात घ्यावे. बैठकीत पुरवठा विभाग, आरोग्य विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण, अन्न व औषध विभाग आदी विभागांच्या प्रश्नांवर चर्चा झाली. जिल्ह्यातील रस्त्यावरील गतीरोधकांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार व गतीरोधकांसाठी असलेल्या निकषानुसार कार्यवाही व्हावी, 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेबाबत दिलेल्या निर्देशांनुसार अंमलबजावणी होते की नाही, याचा आढावा घ्यावा, धर्मादाय आयुक्तांच्या आदेशानुसार खाजगी रुग्णालयांमध्ये आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांसाठी राखीव जागा ठेवण्याबाबत पाठपुरावा करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी राम यांनी दिले. यावेळी शासकीय अधिकारी व अशासकीय सदस्य उपस्थित होते.
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.