आयुक्तांनी भाजप मंत्र्यांसाठी खानावळ सुरू करावी:साने

पिंपरी(टाईमन्युजलाईन नेटवर्क):

 पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर सुरुवातीपासून भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते व घरगडी असल्यासारखे  वागत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा जिल्ह्याचे पालकमंत्री  चंद्रकांत पाटील बैठकीसाठी आले असताना त्यांच्या भोजनव्यवस्थेसाठी महानगरपालिका आणि आयुक्तांच्या दालनाचे खानावळीत रुपांतर करण्यात आले. हा प्रकार शहराच्या दृष्टीने निदंनीय असून खानावळीसाठी भाजप नेते, मंत्री, पदाधिका-यांना जेवणासाठी आयुक्तांनी स्वत:च्या घरी घेऊन जावे किंवा त्यांच्यासाठी खानावळ सुरू करावी, असी बोचरी टिका माजी विरोधी पक्षनेते दत्ता काका साने यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक प्रश्नाबाबत शुक्रवारी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवनात बैठक आयोजित केली. भाजपचे मंत्री, खासदार आणि आमदार या बैठकीला हजर होते. शहरातील प्रलंबित प्रश्नांच्या दृष्टीने ही बैठक निष्पळ ठरली. परंतु, ही बैठक होण्यापूर्वी पालकमंत्री महोदयांसाठी  स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडला. हे स्नेहभोजन खाजगी हॉटेल किंवा भाजपच्या पक्ष कार्यालयात झाला असता, तर काहीही वावगे ठरले नसते. परंतु, पिंपरी-चिंचवड मनपाचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मंत्री महोदय आणि भाजपचे नेते, पदाधिका-यांच्या जेवणावळीसाठी महानगरपालिकेचे दालन खुले केले.

या प्रकारामुळे ऐरवी शहर नियोजन आणि नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी कामे येणा-या आयुक्त दालनाचे खानावळीत रुपांतर झाल्याचे पाहायला मिळाले. मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या वागणुकीमुळे त्यांच्यावर नेहमीच भाजपचे घरगडी आणि प्रवक्ते असल्याचे आरोप झाले. परंतु, त्यामुळे आयुक्त साहेबांनीही काही सुधारणा केलेली नाही. उलट भाजपच्या मंत्री, नेते, पदाधिकारी यांच्यापुढे ते आणखी पायघड्या घालत आहेत.

हा सगळा प्रकार पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची प्रतिमा जनमानसात मलीन करणारा आहे. मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर यांना हे शोभत नाही. त्यांना भाजपचे मंत्री, नेते, पदाधिकारी यांना जेवणावळी देण्याची हौस असेल, तर त्यांनी जेवणासाठी स्वत:च्या घरी घेऊन जावे किंवा स्वतंत्र खानावळ सुरू करावी, त्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका भवनाचा उपयोग करू नये. या प्रकाराच्या निषेधार्थ आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक देखील आयुक्त कार्यालयात जेवणावळ करून आंदोलन करणार असल्याचा इशारा दत्ता काका साने यांनी दिला आहे.

Labels:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget