त्या' महिलेचा आणखी एक व्हिडिओ समोर आला


पिंपरी(टाईम न्युजलाईन नेटवर्क):
चौकशीला आलेल्या पोलिसांना शिवीगाळ करत अश्लील चाळे करणाऱ्या 'त्या' महिलेचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हीडीओत तर तिने थेट लष्कराची गाडी अडवत शिवीगाळ केल्याचं दिसतं यााहे.
 पुण्याच्या बावधन येथे नॅनो कारचा चक्काचूर करण्यापूर्वीचा हा व्हिडीओ असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सध्या या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू असून, तिच्या पतीने त्यांची सर्व वाहनं मित्रांच्या घरी पार्क केली आहे. 20 ऑगस्टच्या पहाटे या महिलेने तीन वाहनांना स्वतःच्या वाहनाने धडका दिल्या. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. त्यानंतर हिंजवडी पोलीस चौकशीसाठी पोहचले, तेंव्हा शिवीगाळ करतच त्यांचं स्वागत केलं. कपडे उतरवण्याची धमकी ही दिली. तर आज गाडया उडवल्या उद्या माणसांना उडवणार असा इशारा दिला. मग चौकशीसाठी पोलीस स्टेशनला बोलावलं तेंव्हा ही ती थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून गेल्याचं बोललं गेले. त्यातच आता या व्हिडिओत थेट लष्कराच्या गाडी समोर स्वतःची गाडी उभी केल्याचा आणि त्यांना शिवीगाळ केल्याच्या व्हिडिओने खळबळ उडाली आहे. सध्या तिच्यावर उपचार सुरू असले तरी त्यानंतर ही ती असे कृत्य करणार नाही. याची खात्री कोण घेणार, कारण तिने लोकांना उडवण्याचा इशारा दिला आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget