बारामती (टाईम न्युजलाईन नेटवर्क) :- बारामती तालुक्यातील ग्रामीण भागातील खेळाडूंना योग्य प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळाल्यास गुणवंत खेळाडू तयार होऊन तालुक्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर पोहोचेल. व याकरीता क्रीडा शिक्षकांचे योगदान महत्वाचे आहे, असे प्रतिपादन तहसिलदार विजय पाटील यांनी केले.
पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,पुणे व बारामती तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय व बारामती तालुका शिक्षक संघटनेच्या संयुक्त विद्यमाने माळेगाव येथील तालुका क्रीडा संकुलामध्ये सन 2019-20 मधील शालेय तालुका स्तरीय फुटबॉल व तायक्वोंदो स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये 14,17 व 19 वर्षे या वयोगटातील मुला-मुलींचा तर फुटबॉल स्पर्धेमध्ये एकूण 27 संघ तर तायक्वोदों स्पर्धेमध्ये 118 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता.
या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी पंचायत समिती,बारामतीचे सभापती संजय भोसले, माळेगाव सह.साखर कारखान्याचे संचालक प्रकाशराव सोरटे, सरपंच जयदिप तावरे, अजित ताटे, ॲड,राहूल तावरे, दिपकबापू तावरे, विश्वास मांढरे,सुनिलराव आटोळे, रविंद्र बनसोडे, बारामती तालुका क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र खोमणे, पदाधिकारी लक्ष्मण मेटकरी,जाधव, होळकर आदी मान्यवर उपस्थिदत होते. यावेळी या स्पर्धाच्या निमित्ताने परिसरामध्ये मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र खोमणे यांनी केले तर स्पर्धेच्या नियमांबाबत तालुका क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी मार्गदर्शन केले. फुटबॉल स्पर्धेकरीता पंच म्हणून निलेश दरेकर,ओंकार लोंढे,शिवाजी जाधव,प्रा.लक्ष्मण मेटकरी यांनी केले. तायक्वोंदो स्पर्धेकरीता पंच म्हणून हेमंत इंगळे, विशाल कुमथे यांनी काम पाहिले. सूत्रसंचालक चंद्रकांत जाधव यांनी तर आभार संजय होळकर यांनी मानले.
0 0 0 0
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.