पुणे व पिंपरी-चिचवड महानगरपालिकेच्या हद्दीत गुरे पाळण्याकरीता लायसन्स परवाना बंधनकारक


            पुणे (टाईम न्युजलाईन नेटवर्क)-पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील सर्व गोठेधारकांना कळविणेत येते कीं, महाराष्ट्र शासन, गुरे नियंत्रण कायदा-1976 च्या कलम 13 अन्वये महानगरपालीका हद्दीतील गुरे पाळणे व त्याची ने आण करणे करिता लायसन्स/परवाना घेणे व त्याचे दरवर्षि नुतनीकरण करणे बंधनकारक असुन विना परवाना गुरे पाळणे व त्याचे ने आण करणे हा कायद्याने गुन्हा आहे, अशी ‍ माहिती जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधीकारी प्रविण परब यांनी दिली आहे.

            कायदा पुणे व पिंपरी-चिचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील गोठेधारकांसाठी सन-2004 पासून लागू करणेत आलेला आहे. याबाबत वारंवार नोटीसा तसेच वृत्तपत्रातून निवेदन देवून त्याचप्रमाणे आकाशवाणी,पुणे यांचेमार्फत वारंवार आवाहन करुन लायसन्स घेणेबाबत कळविणेत आलेले आहे.

            जे गोठेधारक परवाना घेणार नाहीत, तसेच घेतलेल्या परवान्याचे नुतनीकरण करणार नाहीत अशा गोठेधारकांवर महाराष्ट्र गुरे नियंत्रण कायदा-1976 मधील कलम क्र. (3) व (7) नुसार पोलीस कारवाई केली जात आहे.

            ज्या गोठेधारकांनी अद्याप परवाना घेतलेला नाही त्यांनी जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी,पुणे यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा. दुरध्वनी क्र. 020-25812890 असा आहे.

            नविन अनुज्ञाप्तीसाठी खालील प्रमाणे कागदपत्रे सोबत आणावीत.

        गोठेधारकांचा फोटो, रेशनकार्डाची झेरॉक्स प्रत,कोर्ट फी स्टॅप रु.5 तसेच ज्यांनी यापूर्वी अनुज्ञाप्ती घेतलेली आहे त्यांनी सन 2019-20 पर्यंत अनुज्ञाप्ती नुतनीकरणाकरिता संपर्क साधावा. अन्यथा वरील कलमांन्वये कारवाई केली जाईल, याची नोंद घ्यावी. तसेच या परवान्याचे नुतनीकरण करणार नाहीत अशा गोठेधारकांवर शासनाची थकबाकी म्हणून घोषित करण्यांत येणार आहे, असेही श्री.परब यांनी पत्रकान्वये कळविले आहे.


Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget