मोरबे धरण : प्रकल्पग्रस्तांना मोबदला द्यावा - सुभाष देशमुख


मुंबई,(टाईम न्युजलाईन नेटवर्क) : रायगड जिल्ह्यातील पातळ गंगा नदीची उपनदी असलेल्या धावरी नदीवर खानापूर तालुक्यातील मोरबे धरण तयार करण्यात आले आहे. या प्रकल्पग्रस्तांना मोबदला दिला नाही त्यांना नियमानुसार जी मदत करायला पाहिजे ती मदत तत्काळ  करण्यात यावी असे आदेश मदत व पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख यांनी आज येथे दिले.
 मोरबे धरण प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांसंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला मदत व पुनर्वसन सचिव किशोर राजे निंबाळकर,राज्य पुर्नवसन प्राधिकरणाचे उपाध्यक्ष माधव भंडारी तसेच सिडकोचे अधिकारीनवी मुंबई महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी आदी उपस्थित होते.
या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या अडचणी काय आहेत यासंदर्भात सिडको आणि नवी मुंबई महानगरपालिका यांनी गावकऱ्यांसोबत संयुक्त बैठक घ्यावी आणि या शेतकऱ्यांना तत्काळ मदत करावीतसेच सिडकोच्या नियमाप्रमाणे जी  साडेबारा टक्के मोबदला म्हणून जमीन देता येथे याचा ही विचार करावा यासाठी  धरणाच्या अति धोक्याच्या पातळीच्या पुढे जर अतिरिक्त जमीन उपलब्ध असेल तर ती जमीन शेतकऱ्यांना परत देता येते का याचाही अभ्यास करावा आणि या शेतकऱ्यांचे पुनर्वसन करण्यासाठी सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना मदत करावीअसेही श्री.देशमुख यांनी यावेळी सांगितले.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget