मँरेथॉन रन स्पर्धेत गौरव शिरवळकर व महिलांमध्ये हेतल ठक्कर प्रथम क्रमांकाचे मानकरी .


लोणावळा (टाईम न्युजलाईन नेटवर्क):
लोणावळा ते राजमाची या मँरेथॉन ट्रेल रन  स्पर्धेत  एकवीस किलोमीटर अंतराच्या स्पर्धेत गौरव शिरवळकर व महिलांमध्ये हेतल ठक्कर  यांनी प्रथम क्रमांक पटकावला.

लोणावळा राजमाची ट्रेल रन  ,  या नावाने 
शिवदुर्ग मित्र, लोणावळा व रन बर्न मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ह्या मॅरेथॉन चे आयोजन करण्यात आले होते. 
    स्पर्धेचे मुख्य प्रायोजक डेला अॅडव्हेचर   यांच्या अॅडव्हेचर पार्क मध्ये सगळे स्पर्धक सकाळी जमले 
   लोणावळा नगरपालिकाचे मुख्याधिकारी श्री सचिन पवार व शिवदुर्गचे अध्यक्ष अशोक मते  यांनी झेंडा दाखवून स्पर्धा डेला अॅडव्हेचर मधूनच सुरु झाली .व तिथेच परत येऊन स्पर्धा संपेली. 
5 किमी, 10 किमी पुरुष स्री , 21 किमी पुरुष स्री अशा गटात  स्पर्धा झाली. पावसाळ्यात निसर्गरम्य राजमाची हेच स्पर्धेचे मुख्य आकर्षण होते. 
   
  काही नामांकित स्पर्धक यामध्ये सहभागी झाले होते. 
  शिबानी गुलाठी , योगेश यादव, यश शेकटकर, अभिजीत चंदनकर
या स्पर्धेमध्ये सामील झाले होते, त्यानी त्यांचे मनोगत व्यक्त केले, अनेक अनुभवी खेळाडूनी मार्गदर्शन केले. 
स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे .प्रथम क्रमांक गौरव शिरवळकर ,द्वितीय क्रमांक श्री.ए.माने, आणि तिसरा क्रमांक श्री.आशीश यांनी पटकावला .
महिलांमध्ये प्रथम क्रमांक हेथल ठक्कर ,द्वितीय क्रमांक सारीका जैन आणि तिसरा क्रमांक हीना महेश हिने पटकावला .
१० किलोमीटर मँरेथॉन स्पर्धेत प्रथम क्रमांक स्वप्निल मून , दुसरा क्रमांक अभिजीत नेने आणि तिसरा क्रमांक आनंद लिमये यांनी पटकावला .
महिलांमध्ये प्रथम क्रमांक  अनुष्का पाटील ,द्वितीय क्रमांक शकुंतला वाघ आणि तृतीय क्रमांक जईता सेन यांनी पटकावला .

5  किमी मँरेथॉन स्पर्धेत  हिमांशू 
  साळवे यांनी पटकावला .
       शिवदुर्गचे सर्वेसर्वा अॅड संजय वांद्रे, डेला अॅडव्हेचरचे जनरल मॅनेजर इरफान सर यांच्या हस्ते बक्षीस समारंभ पार पडला. 
   यावेळी  सर्वांना   नाष्टा ठेवला होता, पावसात भिजत काही स्पर्धकांनी आनंद घेतला. 
   लोणावळा राजमाची ट्रेल रनचे मुख्य प्रायोजक डेला अॅडव्हेचर, व फास्ट अॅण्ड अप व सर्व सहभागी खेळाडू यांचे शिवदुर्ग मित्र, लोणावळा व रनबर्न मुंबई कडून हार्दिक आभार मानले . 

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget