शासकीय आश्रमशाळा, वसतीगृहांना सर्व सोयी-सुविधा देणार - प्रा.डॉ.अशोक उईके


            मुंबई, (टाईम न्युजलाईन नेटवर्क): आदिवासी विकास विभागांतर्गत शासकीय आश्रमशाळा व वसतीगृहांना रस्तेवीजपाणीशौचालय व अन्य सोयी-सुविधा उपलब्ध करुन देणार असून याबाबतची पाहणी राज्यस्तरीय पथकामार्फत लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ.अशोक उईके यांनी दिली.
            जिल्हाधिकारी व प्रकल्प अधिकारी यांच्याशी आदिवासी उपाययोजनेंतर्गत विविध योजनांचे नियोजन व अंमलबजावणीबाबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित आढावा बैठकीत डॉ.उईके बोलत होते. या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगला अनुसूचित क्षेत्रातील 16 आदिवासी जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी व प्रकल्प अधिकारी उपस्थित होते. 
            डॉ.उईके म्हणालेशासकीय आश्रमशाळा व वसतीगृह दुरुस्तीच्या कामांना 31 जुलै पर्यंत मान्यता देऊन ती कामे 15 दिवसात सुरु करावी. सुवर्ण महोत्सवी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्तीचा लाभ विद्यार्थ्यांना मिळाला नाही, त्यांना 15 दिवसांच्या आत शिष्यवृत्ती देण्यात यावी व त्याचा अहवाल त्वरित सादर करावा. सर्व शासकीयअनुदानित व नामांकित शाळांची तपासणी जिल्ह्यातील महिला अधिकाऱ्यांमार्फत त्वरित करण्यात यावी.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget