लोणावळा (टाईमन्युजलाईन नेटवृर्क) लोणावळा नगरपरिषदेच्या सभेत फेरीवाला धोरण २००९ ला सर्वानुमते चर्चेनंतर मंजूर करण्यात आले. यावेळी तीन विषय तहकूब ठेवून छत्तीस विषय पावणेतीन तासांत मंजुर करण्यात आले.
एन.यु.एल.एम अंतर्गत फेरीवाला धोरण २००९ च्या अंमलबजावणीस मान्यता देण्यात आली, तसेच नगरपरिषदेच्या मालकीचा माहीमतुरा पोहण्याचा तलाव दुरूस्ती करून नुतनीकरणासाठी एजन्सी नेमण्याचाही महत्वाचा विषय मंजूर झाला.
सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव होत्या.यावेळी उपनगराध्यक्ष श्रीधर , मुख्याधिकारी सचिन पवार , विरोधी पक्षनेत्या शादान , शिक्षण व क्रीडा समिती सभापती भरत हारपुडे, भाजपचे गटनेते व पाणीपुरवठा समिती सभापती देविदास कडू , बांधकाम समिती सभापती संजय घोणे, तसेच नगरसेवक नगरसेविका आणि विविध विभागात काम करणारे अभियंते ,कर्मचारी उपस्थित होते. एकोणचाळीस विषयापैकी तीन विषाय सर्वानुमते तहकूब ठेवण्यात आले.
छत्तीस विषय फारशी चर्चा न करता मंजुर झाले. फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी कशी करावयाची याबाबतीत नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव, नगरसेवक नितीन आगरवाल ,भरत हारपुडे व मुख्याधिकारी सचिन पवार यांनी चर्चेत भाग घेतला .श्री पवार यांनी विस्तृत माहिती सभागृहात सांगून सर्वांचे समाधान केले.
फेरिवाला धोरण २००९ अंतर्गत लोणावळा शहरातील फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करणे , पथारीवाले (पथविक्रेते ) यांना ओळखपञ देणे व विक्री प्रमाणपत्र देणे , लोणावळा शहरातील फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करणे, पथविक्रेता क्षेत्र तयार करणे, शहर पथविक्रेता आराखडा तयार करणे , त्यासाठी पायाभूत सुविधा देणे फेरीवाल्यांना विविध शुल्क व कालावधी निश्चित करणे, फेरीवाल्यांना कौशल्य प्रशिक्षण देणे , त्यांचे आर्थिक व सामाजिक समावेशन करणे आदी कामांकरीता एजन्सी नेमण्याचा ठराव मंजुर करण्यात आला.
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.