मोशीत साकारणार आंतरराष्ट्रीय दर्जाचा ‘सफारी पार्क’


पिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):
पिंपरी-चिंचवडच्या लौकिकात भर घालणारा आंतरराष्ट्रीय दर्जाचा ‘सफारी पार्क’ मोशी येथे साकारण्यात येणार आहे. या परिसरातील जागेची मागणी पुणे महापालिका कचरा डेपोसाठी करीत आहे. त्याला आमचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे राज्याच्या पर्यटन विकास विभागाच्या पुढाकाराने ‘सफारी पार्क’ सारखा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लावण्यात यावा, अशी आग्रही मागणी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.
विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबईत सुरू आहे. त्यादरम्यान पर्यटन विकास मंत्री जयकुमार रावल यांची भेट आमदार महेश लांडगे यांनी घेतली. त्यावेळी ‘सफारी पार्क’ प्रकल्पाबाबत निवेदन देण्यात आले.
विशेष म्हणजे, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ‘सफारी पार्क’ प्रकल्पाबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. संबंधित विभागाचे मंत्री आणि महापालिका व पर्यटन विकास विभागाचे अधिकारी यांची बैठक आठवडाभरात होणार आहे. त्यामध्ये या प्रकल्पाला चालना देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाणार आहे.
‘औद्योगिकनगरी’ असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये परदेशातील ‘सफारी पार्क’च्या धर्तीवर  भारतातील पहिला प्रकल्प मोशी परिसरात नियोजित आहे. त्यासाठी लागणारा कोट्यवधी रुपयांचा खर्च महापालिका प्रशासनाने करण्यापेक्षा महापालिका आणि राज्य शासनाचा पर्यटन विकास विभागाने एकत्रितपणे हाती घ्यावा, अशी मागणी आमदार लांडगे यांनी केली आहे. त्यादृष्टीने पाठपुरावा सुरू करण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडील मंजूर विकास आराखड्यातील मौजे मोशी येथील गट नं. ६४६ या सरकारी गायरान जमिनीवर सुमारे ३३.७२ हेक्टर क्षेत्र आ. क्र ०१/ २०७ सफारी पार्क म्हणून आरक्षित करण्यात आले आहे.
Labels:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget