July 2019पिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):

वाढदिवसावर होणारा अनावश्यक खर्च टाळून आमदार महेश लांडगे यांनी अनाथ मुलांसाठी काम करणा-या ‘आधार’ या संस्थेला आर्थिक मदत केली. तसेच, आमदार कन्या साक्षी लांडगे हिने ‘बेटी बचाओ’चा संदेश देवून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आदर्श पद्धतीने साजरा केला आहे.

          राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस (दि.२२ जुलै) विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. ‘माझ्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून सामाजिक उपक्रम राबवावेत’, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले होते. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत आमदार लांडगे यांचे चिरंजीव मल्हार लांडगे यांनी दुष्काळग्रस्त शेतक-यांच्या चारा छावणीला भेट दिली.  तेथील गुरांना मोफत चारा वाटप करण्यात आले.

          दरम्यान, आमदार लांडगे यांच्या सौभाग्यवती पूजा लांडगे आणि कन्या साक्षी लांडगे यांनी अनाथ मुलांसाठ काम करणा-या ‘आधार’ या संस्थेला आर्थिक मदत केली.  पुणे जिल्ह्यात सुमारे २८ वर्षांपासून ही संस्था अनाथ मुलांसाठी काम करीत आहे. आधार ॲडॉपशन सेंटरच्या अध्यक्षा अंजली जोशी यांच्याकडे मदतीचा धनादेश सोपवण्यात आला. पुण्यातील प्रसिद्ध वैद्य खाडीलकर यांनी या संस्थेची स्थापना केली आहे.


       मुंबई(टाईम न्युजलाईन नेटवर्क):     पश्चिमवाहिनी नदी खोऱ्यातून गोदावरी खोऱ्यातील मराठवाड्यात पाणी वळविण्यासाठी प्रस्तावित नदी जोड प्रकल्पाबाबत जलसंपदा विभागाने मंत्रिमंडळासमोर आज सादरीकरण केले. या प्रकल्पाबाबत तसेच जलसंपदा विभागाने मांडलेल्या प्रस्तावाबाबत चर्चेअंती मुख्यमंत्र्यांनी पुढील कार्यवाही करण्यास तत्त्वत: मान्यता दिली आहे.
            आंतरराज्यीय दमणगंगा-पिंजाळ नदीजोड प्रकल्प व राज्यांतर्गत नार-पार-गिरणापार गोदावरीदमणगंगा-वैतरणा-गोदावरी व दमणगंगा-एकदरे-गोदावरी हे नदीजोड प्रकल्प राष्ट्रीय प्रकल्प म्हणून न घेता राज्यांतर्गत प्रकल्प म्हणून राज्याच्या निधीतून त्वरित हाती घेण्यात यावेत. या नदीजोड प्रकल्पांमुळे मुंबई शहरासाठी 31.60 अब्ज घनफूटगोदावरी खोऱ्यातील मराठवाडा भागात 25.60 अब्ज घनफूट व तापी खोऱ्यासाठी 10.76 अब्ज घनफूट पाणी कोकणातून उपलब्ध होईल.
            पश्चिमवाहिनी नदीखोऱ्यातील (कोकण) उल्हासवैतरणानार-पार व दमणगंगा खोऱ्यात एकूण 360 अब्ज घनफूट अतिरिक्त पाणी उपलब्ध आहे.  हे अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात वळविणे शक्य आहे. त्यासाठी नवीन नदीजोड योजनांचे सविस्तर सर्वेक्षण व अन्वेषण त्वरित हाती घेऊन व्यवहार्य योजनांचे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येणार आहेत. अशा एकूण 140 अब्ज घनफूट पाणी वळविण्यासाठीच्या योजनांची निवड जलसंपदा विभागाने प्रस्तावित केली आहे.
            मराठवाडा हा अत्यंत अवर्षणप्रवण व सातत्याने दुष्काळी प्रदेश आहे. पाण्याची नैसर्गिक उपलब्धता कमी असल्याने कोकणातील अतिरिक्त पाणी वळवून मराठवाड्यासाठी उपलब्ध करुन देणे हाच पर्याय उपलब्ध आहे. त्यासाठी सविस्तर सर्वेक्षणाअंती आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य ठरणाऱ्या योजनांना मान्यता देऊन त्यांची कामे सुरु करण्यात येतील. कोकणातील नार-पारदमणगंगाउल्हास व वैतरणा या खोऱ्यांलगत असलेल्या मराठवाड्यातील गोदावरी नदी खोऱ्यातील पुणेगंगापूरवाघाडकरंजवणभंडारदरामुळाकडवामुखणेभावली इत्यादी धरणांच्या पाणलोट खोऱ्यात हे पाणी वळवता येईल. त्यामार्गे पुढे मराठवाड्यातील जायकवाडी धरणापर्यंत पाणी पोहोचू शकेल. तहानलेल्या दुष्काळग्रस्त मराठवाड्यास हा मोठा दिलासा ठरणार आहे.
            पूर्व विदर्भात वैनगंगा खोऱ्यात अतिरिक्त पाणी उपलब्ध आहे. या खोऱ्यातील 100 अब्ज घनफूट पाणी नागपूरवर्धाअमरावतीयवतमाळअकोला व बुलढाणा जिल्ह्यांसाठी वळविण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी वैनगंगा-नळगंगा नदीजोड योजनेचा अभ्यास करुन सविस्तर प्रकल्प अहवाल राष्ट्रीय जलविकास अभिकरणाने तयार केला आहे.  त्यानुसार गोसीखुर्द प्रकल्पातून स्थानिक नियोजनाला बाधा न आणता वैनगंगेचे अतिरिक्त वाहून जाणारे 63 अब्ज घनफूट पाणीअवर्षणप्रवण क्षेत्रात 427 किमी लांबीच्या जोड कालव्याद्वारे प्रवाही पद्धतीने 40 मार्गस्थ साठे भरले जाणार आहेत. त्यासाठी एकूण 6 उपसा स्थळांतून 155.25 मीटर उंचीपर्यंत उपसा करणे प्रस्तावित आहे. या प्रकल्पामुळे पूर्व व पश्चिम विदर्भातील पाण्याचे दुर्भीक्ष्य कमी होण्यास मदत होईल आणि आर्थिक व सामाजिक विकासास गती मिळेल. या योजनेतील जोड-कालव्यासाठीचे भूसंपादन टाळण्यासाठी कालव्याऐवजी नलिका किंवा बोगदा प्रस्तावित करुन त्यासाठी सविस्तर सर्वेक्षण अथवा तांत्रिक अन्वेषनाचे काम त्वरित हाती घेण्यास त्याचप्रमाणे प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या प्रस्तावास मुख्यमंत्र्यांनी तत्वत: मान्यता दिली आहे.
            दमणगंगा-पिंजाळनार-पार-गिरणा, पार-गोदावरीदमणगंगा-वैतरणा-गोदावरी व दमणगंगा-एकदरे-गोदावरी या नदीजोड प्रकल्पांचे कार्यक्षत्र तीन महामंडळात विभागले आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या अंमलबजावणीत समन्वय व एकसूत्रीपणा राखण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात. ही शक्यता लक्षात घेता या नदीजोड प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र मुख्य अभियंता कार्यालय स्थापन करणे आवश्यक होते. त्यामुळे मुख्य अभियंता (नदीजोड प्रकल्प) पदाची पदनिर्मिती करुन हे प्रकल्प हाती घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. यामुळे प्रकल्पांची मिशन मोडवर गतिमान अंमलबजावणी करणे शक्य होईल


         मुंबई (टाईम न्युजलाईन नेटवर्क):   मुंबई-पुणे हायपरलूप प्रकल्पास पायाभूत सुविधा प्रकल्प म्हणून घोषित करण्यास तसेच डीपी वर्ल्ड एफझेडई व हायपरलूप टेक्नोलॉजीज्‌आयएनसी यांच्या भागीदारी समुहास मूळ प्रकल्प सूचक म्हणून घोषित करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
            मुंबई-पुणे हायपरलूप प्रकल्प हा मुंबई व पुणे या दोन महानगरांना हायपरलूप तंत्रज्ञानाद्वारे जोडणारा प्रस्तावित अत्याधुनिक वाहतूक प्रकल्प आहे. हा प्रकल्प मुंबई-पुणे (कुर्ला बीकेसी ते वाकड) दरम्यान 117.50 कि.मी. अंतरासाठी राबविला जाणार आहे. सुमारे 70 हजार कोटी रुपयांची थेट परकीय गुंतवणूक यामध्ये होणार असून एवढ्या मोठ्या प्रमाणात अशी गुंतवणूक होणारा हा देशातील पहिलाच प्रकल्प आहे. विशेष म्हणजेअतिवेगवान प्रवास साध्य करणारा हा जगातील पहिलाच हायपरलूप प्रकल्प ठरणार आहे. या प्रकल्पामध्ये प्रस्तावित गती 496 किमी प्रतितास अपेक्षित असून त्यामुळे पुणे ते मुंबई यामधील प्रवासाचा कालावधी फक्त 23 मिनिटांचा होणार आहे.
            प्रारंभीपहिल्या टप्प्यात जवळपास पाच हजार कोटी खर्च होणार असून या टप्प्यात 11.80 कि.मी. लांबीचा पथदर्शी प्रकल्प म्हणून पुणे महानगर प्रदेशामध्ये  बांधकाम करण्यात येणार आहे. पथदर्शी प्रकल्प हा दोन ते अडीच वर्षात राबविण्यात येणार आहे. त्यानंतर उर्वरित प्रकल्प पूर्ण करण्यात येईल. संपूर्ण प्रकल्प 6 ते 7 वर्षांत पूर्ण करण्यात येईल.
            पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या पुणे मुंबई हायपरलूप प्रकल्पास पायाभूत सुविधा प्रकल्प म्हणून घोषित करण्यास व डीपी वर्ल्ड एफझेडई व हायपरलूप टेक्नॉलॉजीज्आयएनसी (DP World FZE & Hyperloop Technologies, Inc.) यांच्या भागीदारी समुहास मूळ प्रकल्प सूचक (Original Project Proponent) म्हणून घोषित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्पासाठी नीती आयोगाने पुढाकार घेतला आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर देशाच्या परिवहन क्षेत्रात एक क्रांतिकारक पर्व सुरु होणार आहे.


मुंबई (टाईम न्युजलाईन नेटवर्क): महाराष्ट्र पुलिस की प्रतिमा देश में अच्छी है. यह प्रतिमा अधिक ऊंची करने के और उसके लौकिकता में बढ़त करना है. इसके लिए सरकार पुलिस विभाग के साथ हमेशा पूर्ण ताकद के साथ हैऐसा  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने आज यहां कहा. विगत पांच साल में  महाराष्ट्र पुलिस की कामगिरी उत्कृष्ट रही हैऐसा गौरवोद्गार भी उन्होंने निकाला. राज्य के पुलिस मुख्यालय में वरिष्ठ पुलिस अधिकारियों की दो दिवसीय परिषद के उद्घाटन अवसर पर वे बोल रहे थे.
इस अवसर पर गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकरगृह राज्यमंत्री (शहर) डॉ. रणजित पाटिलमुख्य सचिव अजोय मेहतागृह विभाग के अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमारपुलिस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल मंच पर उपस्थित थे.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस ने कहाराज्य पुलिस दल बड़ी क्षमतायुक्त देश का एकमात्र दल है. इसलिए पिछले कई सालों  के अनुभव को देखते हुए  इस दल ने अपनी सतर्कता और सजगता से कई अप्रिय घटनाओं को टालने में बड़ा कार्य किया है. संवाद के जरिये कई बातों को हासिल किया जा सकता हैयह साबित किया है. कानून और सुव्यवस्था रखना और सेवा देने का कर्तव्य पूरा करना पड़ता है. इसलिए शासक नहीं बल्कि सेवक के रूप में काम करना होगा. यह बदलाव स्वीकार कर लोकाभिमुखता बढ़ानी होगी. नागरिक,जनप्रतिनिधियों के साथ संवाद साधकर कई मुद्दों को साध्य किया जा सकता हैयह ध्यान में लेना होगा. 
अपराध सिद्धी का प्रमाण बढ़ने की बात को बताते हुए मुख्यमंत्री ने कहा किअपराध सिद्धी का प्रमाण बढ़ रहा है. लेकिन मामूली अपराधों में पकड़े गए माल को वापस दिलाने के लिए कार्यपद्धति निर्माण करनी होगी. इससे आम नागरिकों में विश्वास निर्माण होगा.  किसी भी स्थिति में पुलिस की प्रतिमा मलीन न हो इसके लिए प्रयास करने होंगे. इसके लिए ही तकनीकी का  आग्रह किया जा रहा है. तकनीकी के कारण पारदर्शकता आती है और विश्वासार्हता बढ़ती है.
आगामी समय में त्यौहारउत्सव और चुनाव के दौरान कुछ बुरी ताकते बुरी घटनाओं को अंजाम देने का प्रयास करती है. उनपर शिकंजा कसा जाए. त्यौहारउत्सव शांतिपूर्ण वातावरण में पूर्ण होने के लिए सुसंवाद बढ़ाएलोगों में सुरक्षा के उपायों के बारे में विश्वास निर्माण करने का प्रयास करने के निर्देश भी मुख्यमंत्री श्री. फडणवीस ने दिए. उन्होंने कहा किपुलिस कल्याण की कई योजनाएं  चलाई जा रही है. विपरीत परिस्थिति में काम करनेवाले और चुनौतियों का सामना करनेवाले पुलिस के साथ सरकार हमेशा खड़ी है. इसलिए पुलिस दल में सुधार और कल्याण की योजनाओं के प्रस्तावों पर तत्काल और  सकारात्मक निर्णय समय समय पर लिए गए है. इसके लिए अधिकाधिक निधि भी उपलब्ध करवाया जाएगा. 
ड्रग्ज के खिलाफ जीरो टॉलरन्स..
परिषद के उद्घाटनपर भाषण में मुख्यमंत्री श्री. फडणवीस  के पुलिस को ड्रग्ज के खिलाफ गंभीरता के साथ कार्रवाई करने के निर्देश दिए है. उन्होंने कहा ड्रग्ज के कारण भावी पीढ़ी बर्बाद हो सकती है. इसलिए इसके बारे में गंभीरता के साथ विचार करने का समय है. इसके लिए आतंकवाद,नक्सलवाद के खिलाफ जितने तीव्रता के साथ कार्रवाई की जाती है उतनीही तीव्रता से ड्रग्ज के खिलाफ कार्रवाई की जानी होगी.  ड्रग्ज के खिलाफ जीरो टॉलरन्स की भूमिका से इस संबंध में कार्रवाई की जाए. इसके लिए आवश्यक होनेपर और प्रभावी नीति तैयार की जाए और कार्रवाई के लिए अलाव यंत्रणा निरमा की जाएऐसे निर्देश भी उन्होंने दिए.
गृह राज्यमंत्री श्री. केसरकर ने कहा, 'पुलिस दल के लिए निधि की कमी न होने के लिए प्रयास किया गया है.  पुलिस अधिकारियों में आर्थिक अधिकारों का विकेंद्रीकरण करने की भूमिका ली गई है. पुलिस के लिए जिला नियोजन मंडल की निधि से  आधुनिकीकरण के लिए साधनसामग्री उपलब्ध करने का प्रावधान किया गया है.


पिंपरी(ताई
भाजपा आणि शिवसेना पक्षात सध्या जोरदार इनकमिंग सुरु आहे. राष्ट्रवादी आमदार व पदाधिकारी भाजपा व शिवसेना पक्षात केलेल्या प्रवेशामुळे सर्वांनाच मोठा आश्चर्याचा धक्का बसला असताना आता पुणे पिंपरी-चिंचवड राजकीय भूकंप झाला आहे.  दरम्यान यावरुन पिंपरीत पोस्टर लावत टोलेबाजी करण्यात आली आहे.

अनोळखी व्यक्तीकडून हे पोस्टर लावण्यात आले असून नोकरीची जाहिरात असल्याप्रमाणे भाजपा प्रवेश देणे आहे असा उल्लेख या पोस्टरवर करण्यात आला आहे. इतकंच नाही तर यासोबत नियम व अटीही देण्यात आल्या आहेत. ईडी व इन्कम टॅक्स नोटीस आलेल्यांना प्राधान्य, भ्रष्टाचाराचा अनुभव असल्यास पहिली पसंती आणि सहकार क्षेत्र बुडवल्याचा अनुभव अशा प्रमुख अटी असल्याची खिल्ली पोस्टरमध्ये उडवण्यात आली आहे.
या पोस्टरमध्ये टीपही देण्यात आली आहे. विचारधारेची कुठलीही अट नाही असं सांगताना आमच्याकडी जागा फुल झाल्यास मित्रपक्षात प्रवेश करता येईल असा टोला लगावण्यात आला आहे. कारण भाजपासोबत शिवसेनेतही काही नेत्यांनी प्रवेश केले आहेत.या पोस्टरबाजीमुळे  पिंपरी-चिंचवड शहरात बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात झाली असून महापालिकेच्या वर्तुळात हा चर्चेचा विषय बनला आहे. 


ताडोबात सर्वाधिक वाघनागपूरचे टायगर कॅपीटल म्हणून वाढते नाव
चंद्रपूर (टाईम न्युजलाईन नेटवर्क) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज देशांमध्ये 2 हजार 967 वाघ असल्याचे जाहीर केले आहे. आज जागतिक व्याघ्र दिनाला वन्यजीववनांवर प्रेम करणाऱ्या निसर्ग प्रेमींच्या साक्षीने पराक्रमाच्या गाथा लिहिणाऱ्या महाराष्ट्राची ओळख पराक्रमी वाघांचा प्रदेश म्हणून व्हावी यासाठी प्रयत्न करूयाअसे आवाहन राज्याचे वन राज्यमंत्री परिणय फुके यांनी आज येथे केले. वन्यजीववृक्ष लागवडव्याघ्र संवर्धन करणाऱ्या दिग्गजांच्या उपस्थित  वनविभागाच्या विविध पुरस्कार मान्यवरांना बहाल करताना ते बोलत होते.
चंद्रपूर येथील प्रियदर्शिनी सभागृहांमध्ये आज जागतिक व्याघ्र दिनाच्या निमित्ताने अभिमान महाराष्ट्राचा हा शानदार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यामध्ये राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. ताडोबा राज्यांमध्ये सर्वाधिक वाघांचा प्रदेश व या प्रदेशात आलेल्या महाराष्ट्रातील विविध भागातील वनावर प्रेम करणाऱ्या मान्यवरांना यावेळी वन राज्यमंत्री परिणय फुके यांनी संबोधित केले. राज्याचे वित्त,नियोजन व वनेमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही.
आजच्या कार्यक्रमांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार 2017 व संत तुकाराम वनग्राम योजनेअंतर्गत उत्कृष्ट गावांना देखील पुरस्कार देण्यात आला. याशिवाय वन विभागातर्फे आयोजित विविध पुरस्कारांचे देखील वितरण करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेलआमदार नानाभाऊ शामकुळेपंढरपूरचे आमदार प्रशांत परिचारकजिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे,महापौर अंजलीताई घोटेकरवनविभागाचे प्रधान सचिव विकास खारगेप्रधान मुख्य वन संरक्षक यु.के. अग्रवालप्रधान मुख्य वनसंरक्षक अनुराग चौधरीवनविभागाचे व्यवस्थापकीय संचालक रामबाबूप्रधान मुख्य वनसंरक्षक अनिल काकोडकरप्रधान मुख्य वनसंरक्षक प्रवीण श्रीवास्तवप्रधान मुख्य वनसंरक्षक साईप्रकाश,अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक शैलेश टेंभुर्णीकर,चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक  एस. वि.रामाराव,जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनारजिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डीजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले आदींची उपस्थिती होती.
यावेळी संबोधित करताना परिणय फुके यांनी विसाव्या शतकाच्या सुरुवातीला व्याघ्र संवर्धन संदर्भात सुरू झालेल्या अभियानाला भारतात उत्तम प्रतिसाद मिळत असून यासाठी भारताचे कौतुक जागतिक स्तरावर होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देखील व्याघ्र संवर्धन संदर्भात महाराष्ट्र करत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले असून महाराष्ट्रात आजमितीला 312 वाघ आहेत. भारतात ही संख्या 2967 आहे. सर्वाधिक नागपूर परिसरात वाघ असून देशाचे टायगर कॅपिटल म्हणून नागपूरला यापुढे नाव लौकिक मिळावाअसे काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
पिंपरी, (टाईम न्युजलाईन नेटवर्क)
– आगामी विधानसभा निवडणुकीत पिंपरी-चिंचवडमधील तीन आणि पुणे जिल्हा ग्रामीणमधील १० अशा एकूण १३ विधानसभा मतदारसंघात कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व आमदार सुरेश हाळवणकर यांनी सोमवारी (दि. २९) केले. तसेच सहकारमंत्री व पुणे जिल्हा ग्रामीणचे प्रभारी सुभाष देशमुख यांनी यंदा विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला पुणे जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले.

वाल्हेकरवाडी येथील आहेर गार्डनमध्ये पिंपरी-चिंचवड शहर आणि पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शक्तीकेंद्र प्रमुखांचा मेळावा झाला. त्यावेळी हाळवणकर आणि देशमुख बोलत होते. यावेळी कामगार राज्यमंत्री व पिंपरी-चिंचवडचे प्रभारी बाळा भेगडे, भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, आमदार बाबुराव पाचर्णे, राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्ष सचिन पटवर्धन, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, महिला आघाडीच्या प्रदेश सचिव उमा खापरे, शहर संघटन सरचिटणीस प्रमोद निसळ, सरचिटणीस अमोल थोरात यांच्यासह पिंपरी-चिंचवडमधील २४० आणि पुणे जिल्हा ग्रामीणचे ७० शक्तीकेंद्र प्रमुख उपस्थित होते.

भाजपचे प्रदेश सरचिटणीस सुरेश हाळवणकर यांनी एक तास संघटनात्मक बैठक घेतली. त्यांनी सदस्य नोंदणीचा आढावा घेतला. तत्पूर्वी त्यांनी सर्व कार्यकर्ते आणि शक्तीकेंद्र प्रमुखांचे म्हणणे ऐकून घेतले. या सर्वांनी केलेल्या सूचनांचा पक्ष पातळीवर निश्चित विचार करण्याचे आश्वासन दिले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने जास्तीत जास्त पक्ष सदस्य नोंदणी करण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. पिंपरी-चिंचवडमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना किमान तीन लाख राख्या पाठवण्याचे आवाहनही त्यांनी केले. विधानसभा निवडणुकीच्या कामांसाठी त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला. पिंपरी-चिंचवडमधील तीन आणि पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील १० अशा एकूण १३ विधानसभा मतदारसंघात कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवण्याचा चंग बांधूनच जोमाने कामाला लागण्यास त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.

सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी शक्तीकेंद्र प्रमुखांना मार्गदर्शन करताना आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला पुणे जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आवाहन केले. विधानसभा निवडणुकीत २२० जागांवर विजय मिळवायचा आहे. परंतु, कार्यकर्त्यांनी सर्व २८८ विधानसभा मतदारसंघात विजय मिळवण्याच्या जिद्दीने कामाला लागावे. येणारा काळ हा भाजपचा सुवर्ण काळ असणार आहे. त्यामुळे निवडणुकीपर्यंत पक्षाने आखून दिलेले कार्यक्रम कार्यकर्त्यांनी राबवावेत. जनतेत मिसळून काम केल्यास निवडणुकीत आपला विजय नक्की असल्याचा विश्वास देशमुख यांनी व्यक्त केला.

भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी प्रास्ताविक करताना पिंपरी-चिंचवडमधील तीनही विधानसभा मतदारसंघात ताकदीने निवडणूक लढवून विजय मिळवण्याचा विश्वास व्यक्त केला. भाजप सरकारने गेल्या पाच वर्षांत केंद्र व राज्यातील विविध योजना सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून आखल्या. त्याचा लाभ लाखो गरजूंना आजपर्यंत मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले. स्वच्छ प्रतिमा असलेले देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी आम्ही कामाला सुरूवात केली आहे. सामान्य माणसाला विकासाच्या प्रवाहात आणणाऱ्या भाजपच्या पाठीशी पिंपरी-चिंचवडमधील जनता असल्याचे ते म्हणाले.


Mumbai (timenewsline netwotk)
Late night on Sunday, a 27-year-old youth was killed by his friends while celebrating his birthday. As per reports, the group had gone to a park in Mumbai’s Pant Nagar area for the celebration.
Nitesh Sawant’s friends brutally attacked him with a sharp weapon and fled the spot.
After the incident with the help of police, he was taken to Rajawadi Hospital where he succumbed to his injuries. Police Inspector Pratap Bhosle said, “Prima facie, the deceased had an altercation with some people 4 to 5 days ago and he was killed in connection with that.
Police further said although Nitesh’s birthday was on Saturday, the celebration was again planned for Sunday. At present police has registered a case of murder against the culprits and investigation is on.
2-3 people have been taken into custody for questioning in this matter.


मुंबई(टाईम न्युजलाईन नेटवर्क) : मुलूंड येथील कालीदास नाट्यमंदीर येथे अस्तित्वात असलेल्या ट्रस्टच्या धर्तीवर राज्यातील सर्व महानगरपालिका व नगरपालिकामधील नाट्यगृहांची दुरुस्ती व देखभालीसाठी ट्रस्टची स्थापना करावी. असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले.
महाराष्ट्रातील सिने कलावंतनाट्य व लोककलावंत यांना शासनाकडून पुरविण्यात येणाऱ्या सोयी सुविधा याविषयासंदर्भात विधानभवनात बैठक पार पडली. त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी नाटयगृहातील सोयी सुविधा चांगल्या दर्जाच्या उपलब्ध करुन देण्यासाठी अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन नाटयगृहाची पाहणी करावी. सर्व नाटयगृहातील स्वच्छतागृहात पाण्याची सोय करणे,नाटयगृहातील  खिडक्याजाळयादारेफर्शी दुरुस्ती कचरापेटी उपलब्ध आहे कीनाही इत्यादी बाबींची पाहणी करुन याबाबतचा अहवाल शासनास सादर करण्याचे आदेश यावेळी डॉ.गोऱ्हे यांनी आज अधिकाऱ्यांना दिले. तसेच नाटयगृहात आपत्तकालीन स्थितीत अधिकाऱ्यांचा दुरध्वनी क्रमांक नाटयगृहात दर्शनी भागात लावावा. असेही डॉ.गोऱ्हे यांनी सूचित केले.
यावेळी सांस्कृतिक कार्य संचालनालयाने कलाकारांसाठी शासनाकडून पुरविण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची माहिती सादर केली.
यावेळी नाट्यकलावंत आदेश बांदेकरअखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले,कार्यवाह सुशांत शेलारमहानगरपालिका औरंगाबाद चे सहायक आयुक्त पंकज पाटीलठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त समिर उनाळे तसेच  संबंधित अधिकारी उपस्थित होते.


खासदार विनायक राऊत, सुनिल तटकरे समितीचे सदस्य

नवी (टाईम न्युजलाईन नेटवर्क) : खासदार गिरीष बापट यांची संसदेच्या अंदाज समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून खासदार विनायक राऊत आणि सुनिल तटकरे यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
            लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी 30 सदस्यीय अंदाज समितीची स्थापना केली आहे. 24 जुलै 2019 ते 30 एप्रिल 2020 या कालावधीसाठी ही समिती नियुक्त करण्यात आली आहे.  विविध विषयांचा अभ्यास करण्यासाठी वेळो वेळी या समितीच्या सदस्यांचा समावेश असलेल्या उप समित्या,गट  स्थापन करण्यात येणार आहे.
अशी कार्य करते अंदाज समिती
            या समितीसमोर येणा-या विषयांचे सखोल परिक्षण किंवा अभ्यास करण्यासाठी आवश्यकतेनुसार लोकसभा अध्यक्षांच्या परवानगीने समितीचे पूर्ण सदस्य किंवा निवडक सदस्य प्रत्यक्ष प्रकल्प किंवा आस्थापनेला भेट देवू शकतात. या भेटीपूर्वीच संबंधीत आस्थापना किंवा संस्थेचा आगावू कार्य अहवाल ही समिती मागवते. या भेटी दरम्यान समिती फक्त निरीक्षण करते. मात्रभेटीवेळी कोणत्याही प्रकारची नोंद करण्यात येत नाही. स्थळ भेटीनंतर संबंधित मंत्रालय किंवा विभागांच्या  प्रतिनिधींसोबत अनौपचारीक चर्चा करते. या संदर्भातील संपूर्ण माहिती गोपनीय ठेवण्यात येते व यातील माहिती प्रसिध्दी माध्यमांना न देण्याचा दंडक पाळला जातो.
            अंतिम टप्प्यात संबंधित विषयांबाबत संसदेत अनौपचारीक बैठक बोलाविण्यात येते. त्यातसंबंधीत मंत्रालयअधिकारी व अन्य स्त्रोतांकडून प्राप्त माहिती आणि प्रत्यक्षदर्शी यांच्यासोबत चर्चा पार पडते. यानंतर अंतिमत: या समितीचे निरिक्षण आणि सूचनांचा समावेश असणारा अहवाल लोकसभेत ठेवण्यात येतो.
            या समितीच्या वतीने लोकसभेत मांडण्यात आलेल्या अहवालाच्या आधारे संबंधित मंत्रालय किंवा विभागाने  सहा महिन्याच्या आत कार्यवाही करणे गरजेचे असते. अहवालावरील उत्तराचे समिती परिक्षण करते आणि त्यानंतर कृतीआराखडा लोकसभेत मांडला जातो यातील सूचनांचा सभागृहातील कामकाजात  नोंद होते.
अंदाज समितीचे 1 हजार 121 अहवाल
            वर्ष 1950 पासून आतापर्यंत संसदेच्या अंदाज समितींनी केंद्र शासनाच्या सर्वच मंत्रालय व विभागांबाबत  1 हजार 121 अहवाल सादर केले आहेत. या कडी मध्ये 13 डिसेंबर 2018 रोजी  शेवटचा अहवाल मांडण्यात आला आहे.


सौर उर्जेवर आणण्याचे शासनाचे धोरण                                                                                                                                         
                पुणे, (टाईम न्युजलाईन नेटवर्क) : यावर्षी एक लाख शेतकऱ्यांना सौर पंप देण्याची शासनाची योजना असून पुढच्या पाच वर्षात राज्यातील 44 लाख शेतकऱ्यांचे शेती पंप सौर ऊर्जेवर आणण्याचे शासनाचे धोरण असल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिली.
           येथील अल्पबचत भवनच्या सभागृहात महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा)चा 35 वा वर्धापनदिन ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी  जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, महाजनकोचे (माईंनिग) सल्लागार व संचालक पुरुषोत्तम जाधव, महाऊर्जाचे महासंचालक कांतीलाल उमाप उपस्थित होते.
            श्री. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, देशातील सर्वात जास्त अपारंपरिक ऊर्जा निर्मिती महाराष्ट्र करतो. सन 2024 पर्यंत 175 गिगा वॉट अपारंपरिक ऊर्जा निर्मिती करण्याचे उद्दिष्ट प्रधानमंत्र्यांनी देशा समोर ठेवले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यात महाराष्ट्र अग्रेसर राहील. गेल्या पाच वर्षात शासनाने राज्यातील वीज नसलेल्या 19 लाख कुटूंबियांना वीज देण्याचे काम केले आहे.
           राज्यासह देशाची प्रगती ही ऊर्जा निर्मितीवर अवलंबून असते. जे राज्य प्रतिमाणसी अधिक उर्जेचा वापर करते, ते राज्य प्रगत म्हणून ओळखले जाते. आपल्याला महाराष्ट्राला सर्वात अग्रेसर ठेवायचे आहे. त्यासाठी महाऊर्जा राज्याला अपारंपरिक ऊर्जा निर्मितीमध्ये स्वयंपूर्ण बनविण्यासाठी प्रयत्नशील असून त्या दृष्टीने शासनाने धोरण तयार कले आहे. त्याच बरोबर स्वस्त वीज निर्मिती करण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
              

राज्यात आता विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. येत्या काही दिवसांमध्ये राज्यात निवडणुकांचे बिगुलही वाजेल. अशातच आता आश्वासनांचा पाऊसही पडण्यास सुरूवात झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये आघाडी सरकार सत्तेत आल्यास भूमिपुत्रांना नोकऱ्यांमध्ये 75 टक्के आरक्षण देणार असल्याचे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. सोलापुरात बोलताना त्यांनी ही घोषणा केली.
लवकरच विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजणार असून सर्वच पक्ष आता तयारीला लागले आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू आहेत. त्या निमित्त अजित पवार शुक्रवारी सोलापुरात आले होते. यापूर्वी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जमनमोहन रेड्डी यांनी काही दिवसांपूर्वी आंध्र प्रदेशात स्थानिकांना खासगी नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना 75 टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर महाराष्ट्रातही स्थानिकांना खासगी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याची मागणी जोर धरू लागली होती. याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी आघाडी सरकार सत्तेत आल्यास भूमीपुत्रांना खासगी नोकऱ्यांमध्ये 75 टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली. तसेच यासाठी कायदाही केला जाईल, असे ते म्हणाले

पुणे(टाईम न्युजलाईन नेटवर्क):ऑलिंपिक स्पर्धेत प्रत्येक स्पर्धकाला मोठ्या प्रमाणावर तणावाला सामोरे जावे लागत आहे. अशा तणावातून खेळाडूला बाहेर पडण्यासाठी प्रत्यक्ष खेळ खेळलेल्या व मानसोपचार तज्ज्ञ अशा प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाची आज गरज आहे. मात्र, आपल्या देशात नेमबाजी खेळलेला मानसोपचार तज्ज्ञ नाही, अशी खंत नेमबाज राही सरनोबत हिने व्यक्त केली.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने राही सरनोबतशी वार्तालाप या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ती बोलत होती. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी यांची उपस्थित होते.
यावेळी राही म्हणाली की, ऑलिंपिकमध्ये जाणे वेगळाच अनुभव असतो. सध्या मी सकाळी ७.३० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सराव करत आहे. यंदा या स्पर्धेत निश्चित यश मिळेल, असा विश्वासही तिने व्यक्त केला. तसेच टोकिओ ऑलिंपिक स्पर्धा माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. यासाठी मी १५ नोव्हेंबर २०१७ पासून तयारीला सुरूवात केली आहे. आता ही तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. सध्या मी जर्मनीच्या मुंखाबायर दुर्जसरेन यांच्याकडून नेमबाजीचे प्रशिक्षण घेत असल्याचे तिने सांगितले.
तसेच, परदेशी प्रशिक्षक घेण्याचे कारण म्हणजे यंदा मी २५ मीटर नेमबाजी प्रकारात ऑलिंपिकमध्ये सहभागी होणार आहे. या प्रकारात सहभागी होणारी मी भारतातील पहिली महिला असून या प्रकाराची माहिती असलेला आपल्याकडे एकही प्रशिक्षक नाही. त्यामुळेच आम्हाला परदेशी प्रशिक्षकाशिवाय पर्याय नाही. मात्र, आता आम्ही त्यांच्याकडून प्रशिक्षण घेऊन खेळाडूंना प्रशिक्षण देऊ शकतो किंवा आम्हालादेखील बाहेरून प्रशिक्षणासाठी बोलावतील. सध्या आपल्या देशात सोयी-सुविधा भरपूर आहेत. परंतु या सुविधा वापरणार्‍यांचा वानवा असल्याचे तिने सांगितले


Mumbai, (timenewsline network): A Workshop was conducted on Irrigation Sector Improvements in Maharashtra on 26July 2019 at the Sahyadri Guest House in Mumbai. The workshop was organized by the Water Resources Department (WRD), Government of Maharashtra (GoM), the World Bank and 2030 Water Resources Group (WRG). Hon’able Chief Secretary, Shri Ajoy Mehta, IAS delivered the keynote address to the gathering. The workshop was attended by delegates and representatives from the public sector, private sector and civil societies.
Senior functionaries from the Govt. of Maharashtra from the Water Resources Dept, MWRRA, and senior officials from the World Bank and 2030 WRG presented an overview of the irrigation sector in Maharashtra, and evolution of the regulatory landscape in water, the need for public private participation and need for improving the timeliness and efficiency of the existing subsidy driven models and also new innovative ways of private sector financing.
Shri KP Bakshi, IAS (Retd.), Chairman, Maharashtra Water Resource Regulatory Authority emphasized the efforts required to accelerate technology adoption, to create strong delivery systems and to leverage the global expertise of the World Bank to address these challenges. Mr. IJsbrand H de Jong, Lead Water Resource Specialist of the Water Global Practice, World Bank presented opportunities for the private sector to be more involved in the irrigation sector and showcased examples of models that have been successful in other countries such and Morocco and France.
The workshop included panel discussions on ‘Financing Gaps and Maximising Financing through the Private sector’ and ‘Promoting Water use efficiency in water for Agriculture’. The panelists deliberated the opportunity for pubic and private finance to be collectively deployed and the need to incentivize farmers, suppliers and operators to accelerate the adoption of new technologies. 
Hon’able Chief Secretary, Shri Ajoy Mehta, IAS urged the participants to be innovative in their approach to efficient use of water in irrigation, and emphasized the need to revaluate the fundamentals on how the water sector is understood and managed including water pricing, water usage and water recycling and reuse. He stressed the need for appropriate pricing for water for different uses to optimize the use of natural resources for economic growth while protecting the economically weaker sections and the environment.
The workshop concluded with a call to action on increasing public private participation in improving irrigation efficiencies and innovative financing mechanisms for sustainable and scalable growth of the irrigation sector in the state.


पिंपरी,(टाईम न्युजलाईन नेटवर्क)  - पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या वतीने २६ जुलै हा दिवस कारगिल दिवस म्हणून शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्याचप्रमाणे शहरातील पाच चित्रपटगृहांमध्ये शासनाच्या वतीने “उरी द सर्जिकल स्ट्राइक” हा चित्रपट मोफत दाखवण्यात आला. चित्रपट सुरू होण्यापूर्वी चिंचवड येथील बिग सिनेमा चित्रपटगृहात कारगिल युद्धात सहभागी असलेले युद्धवीर निवृत्त जवान विजय मतकर यांचा भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
भारतीय सैन्याने कारगिल युद्धात मिळवलेला विजय देशवासीयांच्या कायम स्मरणात राहावा यासाठी २६ जुलै हा दिवश विजय दिन म्हणून साजरा केला जातो. या युद्धात वीरमरण आलेल्या जवानांच्या आठवणी आणि तरूणांमध्ये देशाभिमान जागृत करण्याच्या उद्देशाने यंदाच्या वर्षी २६ जुलै रोजी राज्यातील सर्व चित्रपटांमध्ये “उरी द सर्जिकल स्ट्राइक” हा देशभक्तीपर हिंदी चित्रपट मोफत दाखवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. त्यानुसार पिंपरीतीलअशोक टॉकिजजयश्री चित्रपटगृहविशाल -स्क्वेअरआकुर्डीतील जय गणेश फेम आणि चिंचवडमधील बिगसिनेमा या पाच चित्रपटगृहांमध्ये शुक्रवारी सकाळी दहा वाजता “उरी द सर्जिकल स्ट्राइक” हा चित्रपट मोफत दाखवण्यात आलाहा देशभक्तीपर चित्रपट पाहण्यासाठी शहरातील तरुणांनी आणि माजी सैनिकांनी मोठी गर्दी केली होती. तरुणाईत देशभक्तीचा उत्साह पाहायला मिळाला.
चित्रपट सुरु होण्यापूर्वी चिंचवड येथील बिग सिनेमा चित्रपटगृहात कारगिल युद्धात सहभागी युद्धवीर निवृत्त जवान विजय मतकर यांचा आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, भाजप महिला आघाडी प्रदेश सचिव उमा खापरे, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा शैला मोळक, शहर संघटन सरचिटणीस अमोल थोरात, युवा मोर्चा शहराध्यक्ष रवि लांडगे, नगरसेवक राजेंद्र गावडे, मोरेश्वर शेडगे, महेंद्र बाविस्कर, सारिका पवार, आशा काळे, रामकृष्ण राणे, प्रदीप बेंद्रे, अजय पाताडे आदी उपस्थित होते.
यावेळी आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले, “भारतात दहशतवाद पसरवणाऱ्या पाकिस्तानला आपल्या देशाच्या जवानांनी कारगिल युद्धात चोख प्रत्युत्तर दिले होते. या युद्धात भारतीय सैन्याने पाकिस्तानला धुळ चारून एक इतिहास रचला. या युद्धाचा शेवट २६ जुलै १९९९ रोजी झाला. आपण सर्व भारतीय हा दिवस विजय दिन म्हणून साजरा करतो. कारगिल युद्धाच्या विजयाला २० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त राज्यातील तरूणांमध्ये देशाभिमान जागृत करण्याच्या उद्देशाने त्यांना एक देशभक्तीपर चित्रपट मोफत दाखवण्याचा भाजप सरकारने निर्णय घेतला. “उरी द सर्जिकल स्ट्राइक” हा एक केवळ चित्रपट नसून आपल्या सैन्याचे सामर्थ्य दाखवणारा चित्रपट आहे. देशातील प्रत्येक नागरिकांमध्ये आपल्या जवानांच्या प्रती अभिमानाने ऊर भरून येईल, असा हा चित्रपट आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर आजच्या तरुणांनी आपल्या जवानांचे कष्ट आणि ते देशासाठी करत असलेली लढाई यांविषयी अभिमान बाळगावा, असे आवाहन जगताप यांनी केले.” पिंपरी, (टाईम न्युजलाईन नेटवर्क) - भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांच्या वतीने कारगिल दिनानिमित्त शहीद जवान सौरभ फराटे यांच्या कुटुंबियांना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. ५० हजार रुपयांचा धनादेश शहीद सौरभ फराटे यांच्या मातोश्री मंगल नंदकुमार फराटे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला.   माजी सैनिक संघ भोसरी , महेशदादा स्पोर्टस फाऊंडेशनच्या वतीने कारगिल दिनानिमित्त शहीदांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

भोसरीतील गावजत्रा मैदान येथे कारगिल दिनानिमित्त शहीदांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. कारगिल दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमातून कारगिल युद्धाच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. सर्व उपस्थितांनी सर्व जवानांच्या शौर्याला सलाम केला. यावेळी भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी, कर्नल एस. पी. शुक्ला, प्रल्हाद जगताप, नवनाथ मोरे, बाबासाहेब तारडे, मेजर रवी सैनिक, ऑडनरी कॅप्टन भोसले, सुभेदार बी.एस. माने, महापौर राहूल जाधव, स्थायी समितीचे सभापती विलास मडिगेरी, माजी महापौर नितीन काळजे, शिक्षण मंडळाच्या सभापती सोनाली गव्हाणे आदी उपस्थित होते.

माधव भंडारी म्हणाले,  आमदार महेश लांडगे यांच्या प्रयत्नातून वायू सेना दलाची भरती प्रकिया सुरु आहे. त्यांच्या प्रेरणेतून प्रामाणिकपणे कष्ट करणारे उमेदवार वायुदलात यशस्वी होतील. ही भरती सगळ्यांच्या दृष्टीने आयुष्यातला मोठा क्षण आहे. आमदार महेश लांडगे यांच्या सहकार्यातून तरुणांना वायू दलात भरती होऊन देशसेवेच्या माध्यमातून आयुष्य घडविण्याची मोठी संधी मिळत आहे. यातून भरतीसाठी आलेल्या सर्व उमेदवारांना चांगला अनुभव मिळणार आहे.


मुंबई, (टाईमन्युजलाईन नेेेटवर्क): मौजे तळेगाव दाभाडे येथील शेतक-यांच्या जमीनी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) प्रकल्पासाठी संपादित करण्यात आल्या होत्या. डीआरडीओ प्रकल्पबाधीतांना पुनर्वसनाची ११ कोटी २७ लाख ५० हजार रक्कम व्याजासह देण्यासाठीचा प्रस्ताव सादर करा,असे निर्देश कामगार तथा मदत व पुनर्वसन राज्यमंत्री संजय भेगडे यांनी दिले.
आज मंत्रालयात मौजे तळेगांव दाभाडे येथील डीआरडीओ प्रकल्पासाठी संपादित जमीनीच्या शेतक-यांना पुनर्वसन सानुग्रह अनुदानासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी राज्यमंत्री श्री.भेगडे बोलत होते.
भूमी संपादन कायद्यान्वये २००४ साली विशेष भूमी संपादन अधिका-यांच्या निर्णयानुसार देण्यात येणारी नुकसान भरपाई ही बाजारभावापेक्षा कमी असल्याने वाढीव रक्कम मिळणेसाठी प्रकल्पबाधित शेतक-यांनी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केले आहेत.
दरम्यानकेंद्र शासनाच्या संरक्षण मंत्रालयाने २००७ साली स्पेशल पॅकेज डील अंतर्गत्‍ संपादित क्षेत्राच्या जमीन मालकांसाठी विशेष पुनर्वसन सानुग्रह अनुदान देण्याचे निश्चित केले. मात्रशेतक-यांनी न्यायालयातील खटले मागे घेण्याची अट ठेवण्यात आली असल्याची माहिती उपस्थित प्रकल्पबाधित शेतक-यांनी दिली.
श्री. भेगडे म्हणालेशेतकऱ्यांनी डीआरडीओ प्रकल्पाअंतर्गत संपादित झालेल्या जमीनीच्या नुकसानभरपाईची रक्कम वाढीव मिळण्यासाठी दाखल केलेले खटले मागे घेण्याची अट शिथील करावी. बाधीत शेतकऱ्यांच्या १९० हेक्टर जमीनीसाठी विशेष पुनर्वसन सानुग्रह अनुदान प्रति हेक्टरी ५ लाख ५० हजार  म्हणजेच  ११ कोटी २७ लाख ५०हजार रूपये रक्कम व्याजासह या शेतकऱ्यांना अदा करण्यात यावी यासाठीही राज्य शासनाकडून प्रस्ताव डीआरडीओ यांना सादर करावा असेही श्री. भेगडे यांनी सांगितले.
या बैठकीसमदत व पुनर्वसन विभागाचे सचिव श्री निंबाळकरभूसंपादन विभागाचे सहसचिव सु.कि.गावडे,पुण्याचे उपजिल्हाधिकारी सारंग कोडोलकरडीआरडीओचे अधिकारी आनंद खोब्रागडेप्रकल्पबाधीत शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह शंकर शेलारउद्धव शेलार आदी उपस्थित होते

राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने पिंपरी चिंचवड़ पोलिसांना फटकारले
पिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क ) : सागर जाधव यांच्या कुटुंबियांना वारसा हक्काने मिळालेल्या रावेत येथील जमिनीचा जबरदस्तीने कायद्याचे उल्लंघन करीत ताबा मिळविला आहे. पोलिस कर्मचारी व अधिकारी गुन्हा नोंद करून घेण्याऐवजी जमिन बळकावणा-या स्थानिक गुंडांनाच पाठीशी घालत असल्याची तक्रार रावेत येथील सागर अंकुश जाधव यांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे केली होती. याबाबत झालेल्या सुनावणीस पुणे जिल्हाधिकारी व पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त उपस्थित राहिले नाहीत. त्याऐवजी पुणे जिल्हाधिकारी प्रतिनिधी म्हणून नायब तहसीलदार विकी परदेशी आणि पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून पोलिस उपायुक्त विनायक ढाकणे उपस्थित राहिले. त्यामुळे आयोगाने त्यांच्यावर ताशेरे ओढले. आता पुढील सुनावणीसाठी 7 ऑगस्टला राज्य पोलिस महासंचालक आणि जिल्हाधिकारी यांनी उपस्थित राहण्याचे आदेशही आयोगाने दिले आहेत. त्याच बरोबर तक्रारदार सागर जाधव यांना पोलिस संरक्षण द्यावे. सागर जाधव यांची तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ करणा-या पोलिसांविरुध्द कारवाई करण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत. तसेच त्यांच्या जमिनीमधून पोलिस बंदोबस्त काढण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती तक्रारदार सागर जाधव यांनी प्रसिध्दीस दिली आहे. 
सागर जाधव यांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य डॉ. स्वारज विद्‌वान यांना 6 मे 2019 रोजी पत्र दिले होते. या पत्रात जाधव म्हणतात की, स.नं. 72/73 ही वतनाची जमिन मु. पो. रावेत, ता. हवेली जिल्हा पुणे येथे वारसा हक्काने आम्हाला मिळाली आहे. मात्र 2 मार्च 2019 रोजी काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी त्यांच्या वॉचमनला मारहाण, शिवीगाळ करत तेथील झोपड्या तोडल्या. यानंतर आम्ही संबंधित पोलिस ठाण्यात तक्रार करण्यास गेलो असता पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिला. दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिवशी त्यांना अभिवादन करण्यासाठी आमच्या कुटुंबियांसह आम्ही या ठिकाणी एकत्र येत असतो. या वर्षी जयंतीच्या दिवशी पोलिसांनी तेथे येऊन जोर जबरदस्ती करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हटविण्यास सांगितले. परंतू ही जमीन वतनाची असल्याचे (सन 2013 मधील 14/30/पुणे 2013 ईएसडब्ल्यू) राष्ट्रीय अनूसूचित जाती आयोग यांच्या सुनावनीत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्या जागेवर आम्हा जाधव कुटुंबियांचा  हक्क आहे. तरीदेखील पोलिसांनी जोरजबरदस्तीने आमचे हक्क डावलून आमच्या झोपड्या तोडल्या व दिवसभर त्याठिकाणी  पोलिसांना तैनात केले आहे. त्यामुळे आम्ही याठिकाणी आमच्या कुटुंब चरितार्थासाठी शेती करू शकत नाही. तरी आम्हाला  राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती जाधव यांनी आयोगाकडे केली होती.  
     या तक्रारीची दखल घेऊन राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य डॉ. स्वारज विद्‌वान यांनी पुणे जिल्हाधिकारी व पिंपरी  चिंचवड पोलिस आयुक्त यांना नोटिस बजावली होती व त्यानुसार सुनावणी घेतली होती. आता पुढील सुनावणीस 7 ऑगस्टला राज्य पोलिस महासंचालक आणि जिल्हाधिकारी यांनी उपस्थित राहण्याचे आदेशही आयोगाने 17 जुलै 2019 रोजी दिले आहेत.मुंबई, (टाईम न्युजलाईन नेटवर्क): गणपती उत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना आता एकाचवेळी जातानाचे व येतानाचे आरक्षण करणे शक्य होणार आहे. एसटीने त्यासाठी प्रायोगिक तत्वावर प्रवाशांना 60 दिवस अगोदर आरक्षण करण्याची सुविधा प्राप्त करून दिल्याची घोषणा परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिली. याचा लाभ महाराष्ट्रातील लाखो प्रवाशांना देखील होणार आहे. 
एसटी महामंडळाने यंदा मुंबई उपनगरातून कोकणात गणपती उत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी नियमित बसेस व्यतिरिक्त 2200 जादा  बसेसची सोय केली आहे. या बसचे आरक्षण दि.27 जुलै (26 जुलैच्या मध्यरात्रीपासून) सुरु होणार आहे. यंदा पहिल्यांदाच प्रवाशांना जाता-येताना चे एकत्रित आरक्षण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळाने 60 दिवस अगोदर आरक्षण करण्याची सुविधा प्राप्त करून दिली आहे. (यापूर्वी ती 30 दिवस होती) साहजिकच कोकणात जाणाऱ्या चाकरमान्याला परतीच्या आरक्षणासाठी तिथल्या बसस्थानकावर ताटकळत उभे  राहण्याची आवश्यकता राहणार नाही. दि.27 तारखेपासून सुरु होणाऱ्या या आरक्षण सुविधेमुळे जाण्याबरोबर परतीचे आरक्षण सुद्धा मिळाल्यामुळे त्यांचा गणपती उत्सवाचा आनंद द्विगुणित होणार आहे.
हे  तांत्रिक बदल संगणकाच्या ऑनलाईन प्रक्रियेमध्ये  करण्यासाठी आरक्षण प्रक्रिया 26 जुलै रोजी संध्याकाळी 4:00 ते मध्यरात्री 00:30 पर्यंत बंद राहणार आहे. या कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारचे आरक्षण तिकिट काढणे अथवा रद्द करणे हि प्रक्रिया करता येणार नाही. 26  तारखेच्या मध्यरात्रीपासून सुधारित आरक्षण प्रणाली आरक्षणासाठी उपलब्ध असणार आहे. तरी या बदलाची प्रवाशांनी नोंद घ्यावीअसे आवाहन एसटी महामंडळामार्फत करण्यात आले  आहे.


मुंबई,(टाईम न्युजलाईन नेटवर्क): कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ-शिरगाव औद्योगिक वसाहतमधील युरोटेक्स इंडस्ट्रीज अॅन्ड एक्सपोर्ट लि. कंपनीतील 1200 कामगारांच्या सोबत राज्य सरकार खंबीरपणे उभे असून कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नसल्याची ग्वाही कामगार राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांनी आज येथे दिली.
मंत्रालयातील परिषद सभागृहात आज गोकुळ-शिरगाव औद्योगिक वसाहतमधील युरोटेक्स इंडस्ट्रीजच्या कामगारांच्या समस्यांबाबत झालेल्या बैठकीत श्री.भेगडे बोलत होते.
श्री.भेगडे यांनी सांगितले कीराज्य सरकार पूर्णपणे कामगारांच्या बाजूने असून कंपनी प्रशासनकामगार विभाग आणि कामगार संघटना यांच्या समन्वयातून कामगारांच्या हिताचा निर्णय घेण्यात येईल. कोणत्याही परिस्थितीत 1200 कामगारांवर उपासमारीची वेळ येऊ देणार नाही. कामगार कायद्यानुसार कोणावरही अन्याय होऊ देणार नसल्याची ग्वाहीही त्यांनी कामगारांना दिली.
यावेळी कामगार संघटनांच्या शिष्टमंडळांनी आपल्या व्यथा मंत्री महोदयांसमोर मांडल्या. बैठकीला कामगार विभागाचे संबंधित अधिकारीकामगार संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र जोशीदत्तात्रय बुजरेबंडोपंत मोरेसतीश भोसले आदी उपस्थित होते.


नवी दिल्ली,(टाईम न्युजलाईन नेटवर्क) : केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने औरंगाबाद जिल्ह्यातील जगप्रसिध्द अंजिठा-वेरुळ लेण्या प्रतिष्ठित पर्यटन स्थळ म्हणून विकसीत करण्यात येत आहेत. 
            केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने देशातील 12 क्लस्टरमधील  एकूण 17 पर्यटनस्थळ प्रतिष्ठित पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याची योजना आखली आहे. यात महाराष्ट्रातील अंजिठा-वेरुळ लेण्यांसह उत्तर प्रदेशातील ताजमहल व फतेहपूर शिक्रीदिल्लीतील  हुमायु मकबरालाल किल्ला आणि कुतुब मिनार आदी 17 पर्यटन स्थळांचा समावेश आहे.
            केंद्र शासनाचे विविध विभागराज्य शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या समन्वयातून प्रतिष्ठित पर्यटन स्थळांचा विकास करण्यात येणार आहे. या अंतर्गत पर्यटन स्थळांना रस्ते व हवाई मार्गांनी जोडून उत्तम  संपर्क व्यवस्था निर्माण करणेपर्यटनस्थळांच्या ठिकाणी पर्यटकांना  उत्तम सुविधा उपलब्ध करुण देणेकौशल्य विकासस्थानिक लोकांचा सहभाग वाढविणेपर्यटन स्थळांची ब्रँडींग करुन खाजगी गुंतवणूक आकर्षित करण्यात येणार आहे. केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रल्हादसिंह पटेल यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली.        


            मुंबई, (टाईम न्युजलाईन नेटवर्क): आदिवासी विकास विभागांतर्गत शासकीय आश्रमशाळा व वसतीगृहांना रस्तेवीजपाणीशौचालय व अन्य सोयी-सुविधा उपलब्ध करुन देणार असून याबाबतची पाहणी राज्यस्तरीय पथकामार्फत लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ.अशोक उईके यांनी दिली.
            जिल्हाधिकारी व प्रकल्प अधिकारी यांच्याशी आदिवासी उपाययोजनेंतर्गत विविध योजनांचे नियोजन व अंमलबजावणीबाबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित आढावा बैठकीत डॉ.उईके बोलत होते. या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगला अनुसूचित क्षेत्रातील 16 आदिवासी जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी व प्रकल्प अधिकारी उपस्थित होते. 
            डॉ.उईके म्हणालेशासकीय आश्रमशाळा व वसतीगृह दुरुस्तीच्या कामांना 31 जुलै पर्यंत मान्यता देऊन ती कामे 15 दिवसात सुरु करावी. सुवर्ण महोत्सवी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्तीचा लाभ विद्यार्थ्यांना मिळाला नाही, त्यांना 15 दिवसांच्या आत शिष्यवृत्ती देण्यात यावी व त्याचा अहवाल त्वरित सादर करावा. सर्व शासकीयअनुदानित व नामांकित शाळांची तपासणी जिल्ह्यातील महिला अधिकाऱ्यांमार्फत त्वरित करण्यात यावी.


दोघांचे होत आहे कौतुक
पिंपरी(टाइम न्युजलाईन नेटवर्क):
दिपाली महाजन रा.संतोषनगर(भाम)यांचा मोबाईल बसमध्ये सापडला असता तो परत केला.  पीएमपीएलच्या वाहक व चालक यांनी प्रामाणिकपणा  आणि माणुसकीचा परिचय करून दिला.
  मिळालेली माहितीनुसार,भोसरी डेपो बस क्रमांक 1447 मार्ग क्रमांक 358-12  राजगुरुनगर ते भोसरी ही गाडी नेहमीप्रमाणे प्रवाशांनी  भरलेली होती.या गाडीमध्ये दिपाली महाजन प्रवास करित असताना भोसरी मध्ये गाडी पोहचली तेव्हा त्या उत्तरुण गेल्या तो मोबाईल वाहक किशोर शिंदे यांना भेटला व चालक   
 सखाराम भोईर यांनी राजगुरुनगर वाहतुक  नियंतत्रक  प्रकाश माळुंजे यांना पुर्व कल्पना दिल्या व त्या महिला दिपाली महाजन यांना परत दिला.पिंपरी, (टाईम न्युजलाईन नेटवर्क) -  पिंपरी-चिंचवड शहरातील  1001 पुढील अवैध बांधकामांचा शास्तीकर माफीचा जोपर्यंत निर्णय होत नाही. तोपर्यंत निवासी, वाणिज्य, औद्योगिक अवैध बांधकामांचा शास्तीकर वगळून मूळ मिळकत कर स्वीकारण्यात यावा. जेणेकरुन नागरिकांकडे थकबाकी राहणार नाही. तसेच महापालिकेच्या महसूलात देखील वाढ होईल. त्यासाठी 'सॉफ्टवेअर'मध्ये बदल करण्यात यावा, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी महापालिकेकडे केली. तसेच नागरिकांना पाठविलेल्या नोटीसा मागे घेण्यात याव्यात. त्याची कारवाई थांबवावी. 1001 पुढील अवैध बांधकामांचा शास्तीकर माफ करण्याबाबत महासभेत ठराव करुन  आपल्या भावना राज्य सरकारला कळवाव्यात, अशी सूचनाही लांडगे यांनी केली.

आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेतली. यावेळी सरसकट शास्तीकर माफ करण्याची मागणी करण्यात आली. महापौर राहुल जाधव, पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, माजी अध्यक्ष सुरेश म्हेत्रे, शहर सुधारणा समितीचे सभापती राजेंद्र लांडगे,  नगरसेवक विकास डोळस, लक्ष्मण उंडे, कुंदन गायकवाड, पांडा साने, माजी नगरसेवक शांताराम भालेकर, प्रमोद राणे, नवनाथ वायाळ यांच्यासह बाधित नागरिक उपस्थित होते.

 महेश लांडगे म्हणाले, पूर्वीप्रमाणे महापालिकेने 'सॉफ्टवेअर'मध्ये बदल करावा. शास्तीकर वगळून मूळ मिळकत कर स्वीकारण्यात यावा. थकित कर मालमत्ता धारकांकडून भरुन घेण्यात यावा. नागरिकांवर मूळ कराचा बोजा पडून देऊ नका. मूळ कराचा भरणा करुन घेतल्यास नागरिक नियमितपणे कर भरतील. परिणामी, महापालिकेचा महसूल वाढेल. नागरिकांवरील बोजा कमी होईल.

लघुउद्योजकांकडून देखील मूळ मिळकत कर स्वीकारण्यात यावा. लघुउद्योजकांकडून महापालिकेला सर्वाधिक महसूल मिळत आहे. त्यांच्याकडून मूळ मिळकत कर भरल्यास त्याची नोंद शास्तीकरामध्ये होत आहे. त्यामुळे  'सॉफ्टवेअर'मध्ये बदल करुन मूळ कर स्वीकारावा. नोटीसा देण्याची कारवाई तातडीने थांबविण्यात यावी. नोटीसा आल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शास्तीकर लागू असलेले मालमत्ता धारक अतिशय गरीब आहेत. गरिब नागरिकांना नाहक त्रास देता कामा नये. हा राजकारण करण्याचा विषय नाही. सर्वसामान्य नागरिकांच्या जिव्हाळ्याचा हा विषय आहे. त्यांच्यावर अन्याय होता कामा नये.  महापालिकेतील गटनेत्यांची एक बैठक घेऊन सरसकट शास्तीकर माफीचा ठरावा करा. राज्य सरकारने 1000 चौरस फुटाच्या अवैध बांधकामांचा शास्तीकर माफ केला आहे. 1001 पुढील अवैध बांधकामांचा सरसकट शास्तीकर माफ करण्याचा ठराव महासभेत मंजूर करण्यात यावा. महापालिकेने ठरावाद्वारे आपल्या भावना राज्य सरकारला कळवाव्यात. राज्य सरकारकडून मार्गदर्शन घ्यावे, असेही लांडगे म्हणाले.


लोणावळा  (टाईमन्युजलाईन नेटवृर्क) लोणावळा नगरपरिषदेच्या सभेत फेरीवाला धोरण २००९ ला सर्वानुमते चर्चेनंतर मंजूर करण्यात आले. यावेळी तीन विषय तहकूब ठेवून  छत्तीस विषय पावणेतीन तासांत मंजुर करण्यात आले.
        एन.यु.एल.एम अंतर्गत फेरीवाला धोरण २००९ च्या अंमलबजावणीस मान्यता देण्यात आली, तसेच नगरपरिषदेच्या मालकीचा माहीमतुरा पोहण्याचा तलाव दुरूस्ती करून नुतनीकरणासाठी एजन्सी नेमण्याचाही महत्वाचा विषय मंजूर झाला.
         सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव होत्या.यावेळी उपनगराध्यक्ष श्रीधर ,  मुख्याधिकारी सचिन पवार ,  विरोधी पक्षनेत्या शादान ,  शिक्षण  व क्रीडा समिती सभापती भरत हारपुडे, भाजपचे गटनेते व पाणीपुरवठा समिती सभापती देविदास कडू , बांधकाम समिती सभापती  संजय घोणे, तसेच नगरसेवक  नगरसेविका आणि विविध विभागात काम करणारे अभियंते ,कर्मचारी उपस्थित होते. एकोणचाळीस विषयापैकी तीन विषाय सर्वानुमते तहकूब ठेवण्यात आले.
छत्तीस विषय फारशी चर्चा न करता मंजुर झाले. फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी कशी करावयाची याबाबतीत  नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव, नगरसेवक नितीन आगरवाल ,भरत हारपुडे व मुख्याधिकारी सचिन पवार यांनी चर्चेत भाग घेतला .श्री पवार यांनी विस्तृत माहिती सभागृहात सांगून  सर्वांचे समाधान केले.

फेरिवाला धोरण २००९ अंतर्गत  लोणावळा शहरातील फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करणे , पथारीवाले (पथविक्रेते ) यांना ओळखपञ देणे  व विक्री प्रमाणपत्र देणे , लोणावळा  शहरातील फेरीवाल्यांचे  सर्वेक्षण करणे, पथविक्रेता क्षेत्र तयार करणे, शहर पथविक्रेता आराखडा तयार करणे , त्यासाठी पायाभूत सुविधा देणे फेरीवाल्यांना विविध शुल्क व कालावधी निश्चित करणे, फेरीवाल्यांना कौशल्य प्रशिक्षण देणे , त्यांचे आर्थिक व सामाजिक समावेशन करणे आदी कामांकरीता एजन्सी नेमण्याचा ठराव मंजुर करण्यात आला.


            पुणे (टाईम न्युजलाईन नेटवर्क)-पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील सर्व गोठेधारकांना कळविणेत येते कीं, महाराष्ट्र शासन, गुरे नियंत्रण कायदा-1976 च्या कलम 13 अन्वये महानगरपालीका हद्दीतील गुरे पाळणे व त्याची ने आण करणे करिता लायसन्स/परवाना घेणे व त्याचे दरवर्षि नुतनीकरण करणे बंधनकारक असुन विना परवाना गुरे पाळणे व त्याचे ने आण करणे हा कायद्याने गुन्हा आहे, अशी ‍ माहिती जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधीकारी प्रविण परब यांनी दिली आहे.

            कायदा पुणे व पिंपरी-चिचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील गोठेधारकांसाठी सन-2004 पासून लागू करणेत आलेला आहे. याबाबत वारंवार नोटीसा तसेच वृत्तपत्रातून निवेदन देवून त्याचप्रमाणे आकाशवाणी,पुणे यांचेमार्फत वारंवार आवाहन करुन लायसन्स घेणेबाबत कळविणेत आलेले आहे.

            जे गोठेधारक परवाना घेणार नाहीत, तसेच घेतलेल्या परवान्याचे नुतनीकरण करणार नाहीत अशा गोठेधारकांवर महाराष्ट्र गुरे नियंत्रण कायदा-1976 मधील कलम क्र. (3) व (7) नुसार पोलीस कारवाई केली जात आहे.

            ज्या गोठेधारकांनी अद्याप परवाना घेतलेला नाही त्यांनी जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी,पुणे यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा. दुरध्वनी क्र. 020-25812890 असा आहे.

            नविन अनुज्ञाप्तीसाठी खालील प्रमाणे कागदपत्रे सोबत आणावीत.

        गोठेधारकांचा फोटो, रेशनकार्डाची झेरॉक्स प्रत,कोर्ट फी स्टॅप रु.5 तसेच ज्यांनी यापूर्वी अनुज्ञाप्ती घेतलेली आहे त्यांनी सन 2019-20 पर्यंत अनुज्ञाप्ती नुतनीकरणाकरिता संपर्क साधावा. अन्यथा वरील कलमांन्वये कारवाई केली जाईल, याची नोंद घ्यावी. तसेच या परवान्याचे नुतनीकरण करणार नाहीत अशा गोठेधारकांवर शासनाची थकबाकी म्हणून घोषित करण्यांत येणार आहे, असेही श्री.परब यांनी पत्रकान्वये कळविले आहे.                                                                   
 बारामती (टाईम न्युजलाईन नेटवर्क):-  शासनाच्या वैद्यकीय सहायता योजनांचा लाभ  सर्वसामान्य नागरीकांपर्यत पोहचविण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील ‍ प्रत्येकाने प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन महसूल, सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री चंद्रकांत(दादा) पाटील यांनी केले.
             बारामती  हॉस्पिटलला आज पालकमंत्री पाटील यांनी भेट दिली. रुग्णालयाच्या  विविध कक्षांची त्यांनी पाहणी केली. यावेळी  उपविभागीय  अधिकारी हेमंत निकम, तहसिलदार  विजय पाटील, बारामती हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. दिलीप लोंढे, उपाध्यक्ष डॉ. जे.जे.शहा, संचालक डॉ.संजय पुरंदरे, संचालक डॉ.गोकुळ काळे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री पाटील म्हणाले, हॉस्पिटलमध्ये दाखल होणा-या रुग्णांना वेळीच आवश्यक ते उपचार ‍ मिळाले पाहिजेत. उपचारासोबतच सर्वसामान्य रुग्णांना त्यांच्यासाठी  असणाऱ्या शासनाच्या  महात्मा फुले जनआरोग्य योजना, मुख्यमंत्री सहायता निधी आदी योजंनाबाबत रुग्णालयाच्या व्यवस्थापनाकडून रुग्णांचे समुपदेशन होणे गरजेचे आहे. सर्वसामान्य रुग्णांपर्यंत मदत पोहचण्याकरीता प्रयत्न करावेत. या मदतीमुळे सर्वसामान्य कुटुंबावरील उपचाराचा आर्थिक ताण कमी होण्यास मदत होईल.
यावेळी रुग्णालयाच्या व्यवस्थापनाकडून रुग्णांना दिल्या जाणा-या वैद्यकीय सुविधांचा आढावा पालकमंत्री पाटील यांनी घेतला. तसेच शासनाच्या विविध वैद्यकीय योजना व सुविधाचा लाभ सर्वसामान्य रुग्णांना देण्याकरीता  विशेष प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले.
                                 


मुंबई,(टाईम न्युजलाईन नेटवर्क) : रायगड जिल्ह्यातील पातळ गंगा नदीची उपनदी असलेल्या धावरी नदीवर खानापूर तालुक्यातील मोरबे धरण तयार करण्यात आले आहे. या प्रकल्पग्रस्तांना मोबदला दिला नाही त्यांना नियमानुसार जी मदत करायला पाहिजे ती मदत तत्काळ  करण्यात यावी असे आदेश मदत व पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख यांनी आज येथे दिले.
 मोरबे धरण प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांसंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला मदत व पुनर्वसन सचिव किशोर राजे निंबाळकर,राज्य पुर्नवसन प्राधिकरणाचे उपाध्यक्ष माधव भंडारी तसेच सिडकोचे अधिकारीनवी मुंबई महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी आदी उपस्थित होते.
या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या अडचणी काय आहेत यासंदर्भात सिडको आणि नवी मुंबई महानगरपालिका यांनी गावकऱ्यांसोबत संयुक्त बैठक घ्यावी आणि या शेतकऱ्यांना तत्काळ मदत करावीतसेच सिडकोच्या नियमाप्रमाणे जी  साडेबारा टक्के मोबदला म्हणून जमीन देता येथे याचा ही विचार करावा यासाठी  धरणाच्या अति धोक्याच्या पातळीच्या पुढे जर अतिरिक्त जमीन उपलब्ध असेल तर ती जमीन शेतकऱ्यांना परत देता येते का याचाही अभ्यास करावा आणि या शेतकऱ्यांचे पुनर्वसन करण्यासाठी सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना मदत करावीअसेही श्री.देशमुख यांनी यावेळी सांगितले.


पुणे(टाईम न्युजलाईन नेटवर्क):
 मुंबई-पुणे लोहमार्गावर खंडाळा घाटातील मंकी हिलजवळ सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास मोठी दरड पडल्याने मिडल आणि डाऊन लेन बंद झाल्याने पुण्याकडे येणार्‍या सर्व रेल्वे गाड्या थांबविण्यात आल्या आहेत.

 मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरु आहे.

लोणावळा आणि खंडाळा परिसरात आज दुपारपासून जोराचा पाऊस सुरु आहे. पावसामुळे दुपारी दोनच्या सुमारास मंकी हिलजवळ लहान स्वरुपाची दरड कोसळली. माती आणि दगड बाजूला करुन दोन गाड्या सोडल्यानंतर दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोठ्या प्रमाणात दरड मिडल लाईनवर कोसळली.

यावेळी काही दगड डाऊन लाईनवर गेल्याने या दोन्ही लेन वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आल्या आहेत. मार्गावर आलेले दगड मोठे असल्याने ते ब्लास्ट करुन फोडण्याचे काम सुरु असून तदनंतर रेल्वे सेवा सुरु होणार आहे. दरम्यान, पुण्याकडे सर्व रेल्वे थांबविण्यात आल्या आहेत.

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget