लोणावळा (टाईमन्युजलाईन नेटवर्क ) संत तुकाराम महाराजांनी पालखी च्या माळशिरस मुक्कामी मारूती मंदिरात किर्तन केले होते.तेथे राञी नऊ वाजता सुरू झालेले किर्तन पहाटे दोन पर्यत चालले. सर्व श्रोते निघून गेल्यानंतर स्वतः मारूती रायाने डोळे उघडून तुकोबांना सांगितले ,तुम्ही तिथे झोपा मी इथे झोपतो.तेव्हा पासून मंदिरात झोपलेला मारूती आहे,असे किर्तनकार ह.भ.प बाळासाहेब मालपुटे
यांनी किर्तनामध्ये सांगितले .
औंढोली येथे राजे शिवछञपती कृषी व क्रीडा विकास मंडळाच्या वतीने आयोजित किर्तनमहोत्सवामध्ये ह.भ.प.मालपुटे महाराज बोलत होते.
पहिल्या दिवशी छञपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला किर्तनकार दिलीप महाराज खेंगरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर ह.भ.प.रूपाली ताई नाणेकर यांचे प्रवचन झाले.तसेच त्यांनी प्रवचनात धर्मवीर संभाजी महाराज व छञपती शिवाजी महाराज यांच्या महान पराक्रमाचा परिचय करून दिला.तसेच संत ज्ञानोबा तुकोबांनी दिलेला अभंगातील उपदेश आचरणात आणा.विठ्ठल नाम सदैव मुखी घ्या ,संसार सुखी झाल्याविना राहणार नाही ,असे सांगितले . यानंतर हरिपाठ झाला.
शिवराज्यभिषेक दिनाचे दिवशी ह.भ.प. बाळासाहेब मालपुटे यांचे किर्तन झाले व शेटेवाडी येथील ह.भ.प.नंदकुमार शेटे व संत ज्ञानेश्वर भजनी मंडळाचा संगीत भजनाचा कार्यक्रम झाला.
या कार्यक्रमाला मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मच्छिंद्र मांडेकर , मानद अध्यक्ष शिवराम मांडेकर , मार्गदर्शक जेष्ट वारकरी सूर्यकांत केदारी ,तसेच वारकरी पांडुरंग बोरेकर, हिरामण मांडेकर , अक्षय मांडेकर , विजय मांडेकर , मार्गदर्शक हनुमंत मांडेकर , गायक माऊली महाराज तिकोणे, मृदूंगमणी किसन महाराज केदारी आणि मृदूंगमणी अमोल महाराज घनवट आणि असंख्य भाविक श्रोते उपस्थित होते..
किर्तन झाल्यानंतर मावळभूषण भजनसम्राट नंदकुमार शेटे व संत ज्ञानेश्वर भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.