चाकण (टाईमन्युजलाईन नेटवर्क) : एका लष्करी अधिकाऱ्याने 30 ते 40 जवनांसह पुण्यातील खालूब्रे गावात दहशत पसरवल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी खेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा ही दाखल झाला. 22 जूनला ही घटना घडली. केदार गायकवाड असं लष्करी अधिकाऱ्यांचे नाव आहे. अशी माहिती पुणे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली. मोनिका गाडे यांनी केदार गायकवाड यांच्यासह 30 ते 40 जवनांविरोधात फिर्याद दिलेली आहे. मोनिका आणि केदार यांच्या भावात गुळानी येथील गट क्रमांक 244 या जमिनीच्या मालकी हक्कावरून वाद सुरुयेत. सातबारा उताराचे मालकी नुसार यातील फिर्यादीचे नातेवाईक सुनील भरणे यांनी वरील जमिनीत सोयाबीन ची पेरणी केली होती. त्यामुळे सदर जमिनीतून केदार गायकवाड यांनी फिर्यादी मोनिका यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. तसेच मालकी हक्क दाखविणे करता सदर जमीनीत लष्कराच्या चार गाडया मधून 30 ते 40 गनवेशातील जवान शस्त्रासह बेकायदेशीर आल्याचा ही आरोप मोनिका यांनी केलाय. तसेच सोयाबीन पिकामध्ये टॅक्टर ने नांगरनी करून नुकसान ही केले. त्यापुढे जात गावात लष्करी गणवेशात असलेले जवान रायफल सह फिरवून फिर्यादी आणि नातेवाईक यांचे मनात भीती निर्माण करून दहशत पसरवली असल्याचं पोलीस अधीक्षक पाटील यांनी सांगितलें.
खालूब्रे गावात दहशत पसरवल्याचा प्रयन्त

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.