June 2019           आळंदी (टाईम न्युजलाईन नेटवर्क): पंढरपूर येथे आषाढी वारीसाठी राज्यभरातून पालख्या पंढरपूरकडे प्रस्थान करत आहेत, या वारीत सहभागी वारकरी बांधवांना आवश्यक त्या साईसुविधा पुरविण्यासाठी शासन कटिबध्द असल्याचे प्रतिपादन महसूल, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी आज येथे केले.

            संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थानाचा शुभारंभ महसूल, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या उपस्थितीत आज श्री क्षेत्र आळंदी येथे झाला. यावेळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीचे प्रमुख विश्वस्त ॲड. विकास ढगे पाटील, विश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख योगेश देसाई,  विश्वस्त  डॉ.अजित कुलकर्णी,  अभय टिळक आदी उपस्थित होते.

            पालकमंत्री पाटील म्हणाले, आषाढी वारी मार्गावर राष्ट्रीय सेवा योजनेचे 35 हजारावर विद्यार्थी वृक्षारोपन करणार आहेत, वारकरी बांधवांना जेवणासाठी 50 लाखावर पत्रावळयांचे नियोजन करण्यात आले आहे. यासोबतच वारी मार्गावर एक हजार आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, या शिबिराच्या माध्यमातून आवश्यक त्या आरोग्य सुविधा पुरविण्यात येणार आहेत. रेनकोट, स्वच्छतागृहासोबतच आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्यावर शासनाचा भर असल्याचे त्यांनी सांगितले.

        आध्यात्मिक ठिकाणाच्या माध्यमातून आध्यात्मिक समाधान मिळते, ही समाधानाची बाब असल्याचे सांगून या आध्यात्मिक ठिकाणाच्या माध्यमातून मदतीचेही कार्य विस्तारले जावे, शेगाव संस्थानच्या धर्तीवर काम उभे राहावे, अशी अपेक्षा पालकमंत्री श्री. पाटील यांनी व्यक्त केली.

संस्थानच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पाच लाख रूपयांचा धनादेश पालकमंत्री श्री. पाटील यांच्याकडे यावेळी देण्यात आला.

     पालखी प्रस्थानानंतर, श्री क्षेत्र आळंदी येथील गांधी वाडयात पालखीचा मुक्काम राहणार असून त्यानंतर पुढील प्रवासासाठी पालखी मार्गस्थ होणार असल्याची माहिती यावेळी विश्वस्तांनी दिली.  या सोहळयास वारकरी, नागरीक, स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी, स्वयंसेवक उपस्थित होते.             दौंड (टाईम न्युजलाईन नेटवर्क): येथील जिल्हा खनिकर्म अधिकारी संजय बामणे आणि त्‍यांच्‍या पथकाने दौंड तालुक्‍यातील मौजे नारायण बेट येथे वाळू उत्‍खनन पात्रामध्ये अनधिकृत वाळू उत्‍खनन आणि वाहतूक करतांना तीन ट्रक एल पी,  एक जेसीबी त्यापैकी एक ट्रक ४ ब्रास वाळूने भरलेला,  दोन ट्रक रिकामे,  एक जेसीबी १५ ब्रास वाळू साठा जप्त करुन दंडात्मक कारवाईसाठी सुपूर्द केले.चाकण (टाईमन्युजलाईन नेटवर्क) : एका लष्करी अधिकाऱ्याने 30 ते 40 जवनांसह पुण्यातील खालूब्रे गावात दहशत पसरवल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी खेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा ही दाखल झाला. 22 जूनला ही घटना घडली. केदार गायकवाड असं लष्करी अधिकाऱ्यांचे नाव आहे. अशी माहिती पुणे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली. मोनिका गाडे यांनी केदार गायकवाड यांच्यासह 30 ते 40 जवनांविरोधात फिर्याद दिलेली आहे. मोनिका आणि केदार यांच्या भावात गुळानी येथील गट क्रमांक 244 या जमिनीच्या मालकी हक्कावरून वाद सुरुयेत. सातबारा उताराचे मालकी नुसार यातील फिर्यादीचे नातेवाईक सुनील भरणे यांनी वरील जमिनीत सोयाबीन ची पेरणी केली होती. त्यामुळे सदर जमिनीतून केदार गायकवाड यांनी फिर्यादी मोनिका यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. तसेच मालकी हक्क दाखविणे करता सदर जमीनीत लष्कराच्या चार गाडया मधून 30 ते 40 गनवेशातील जवान शस्त्रासह बेकायदेशीर आल्याचा ही आरोप मोनिका यांनी केलाय. तसेच सोयाबीन पिकामध्ये टॅक्टर ने नांगरनी करून नुकसान ही केले. त्यापुढे जात गावात लष्करी गणवेशात असलेले जवान रायफल सह फिरवून फिर्यादी आणि नातेवाईक यांचे मनात भीती निर्माण करून दहशत पसरवली असल्याचं पोलीस अधीक्षक पाटील यांनी सांगितलें.पिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):

भोसरी आणि दिघीला जोडणारा सावंतनगर येथील रस्ता गेली पंचवीस वर्षे प्रलंबित होता. मात्र, स्थानिक नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन आमदार महेश लांडगे यांनी अखेर 'सर्जिकल स्ट्राईक' केला. प्रशासन आणि स्थानिकांना विश्वासात घेऊन एका रात्रीत या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले.
याबाबत बोलताना स्थानिक नगरसेवक सागर गवळी म्हणाले की, भूसंपादनाच्या मोबदल्यात महापालिका प्रशासनाकडून मिळणाऱ्या परताव्याबाबत बधित गवळी आणि काटे कुटुंबियांमध्ये नाराजी होती. मात्र, आमदार महेश लांडगे यांनी स्थानिक नागरिकांच्या हिताच्या दृष्टिने सर्वांना सोबत घेवून तोडगा काढला आहे. त्यामुळे गवळी आणि काटे कुटुंबियांच्या सकारात्मक पुढाकार घेतला आणि रस्त्याच्या कामाला चालना मिळाली.
स्थानिक नेते संजय गायकवाड म्हणाले की, दिघी परिसरात सध्या सुमारे ८० ते ९० हजार लोकसंख्या आहे. या भागातील नागरिकांना भोसरी आणि संबंधित परिसरात ये-जा करण्यासाठी सावंतनगर येथील रस्ता अत्यंत सोईचा ठरणार आहे. भोसरी परिसरातील अंतर्गत रस्ते विकसित करण्याची भूमिका आमदार महेश लांडगे यांनी
घेतली. त्यामुळे महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून सुमारे ८४ लाख रुपये खर्च करून हा रस्ता सुसज्ज करण्यात येणार आहे. सध्या सुमारे ९ मीटर रुंदीचा हा रस्ता विकसित केला आहे.


पिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क): पिंपरी चिंचवडमध्ये आणखी एक स्त्री जातीचे अर्भक आढळले. हे अर्भक मोशीतील इंद्रायणी काठी एकाच्या निदर्शनास आले. अर्भकाची तब्येत खालावली. उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. भोसरी एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत.
 दहा दिवसातील तिसरी घटना. पहिले स्त्री जातीचे अर्भक हे प्रति शिर्डी शिरगाव येथे तर दुसरे देहूरोडमध्ये सापडले होते.


लोणावळा (टाईमन्युजलाईन नेटवर्क ) संत तुकाराम महाराजांनी पालखी च्या माळशिरस मुक्कामी  मारूती मंदिरात किर्तन केले होते.तेथे राञी नऊ वाजता सुरू झालेले किर्तन पहाटे दोन पर्यत चालले. सर्व श्रोते निघून गेल्यानंतर स्वतः मारूती रायाने डोळे उघडून तुकोबांना सांगितले ,तुम्ही तिथे झोपा मी इथे झोपतो.तेव्हा पासून मंदिरात  झोपलेला मारूती  आहे,असे किर्तनकार  ह.भ.प बाळासाहेब मालपुटे
यांनी किर्तनामध्ये सांगितले .
औंढोली येथे राजे शिवछञपती कृषी व क्रीडा विकास मंडळाच्या  वतीने आयोजित  किर्तनमहोत्सवामध्ये ह.भ.प.मालपुटे महाराज बोलत होते.
      पहिल्या दिवशी  छञपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांच्या  प्रतिमेला किर्तनकार  दिलीप महाराज खेंगरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर  ह.भ.प.रूपाली ताई नाणेकर यांचे प्रवचन झाले.तसेच त्यांनी प्रवचनात धर्मवीर संभाजी महाराज व  छञपती शिवाजी महाराज यांच्या महान पराक्रमाचा परिचय करून दिला.तसेच संत ज्ञानोबा तुकोबांनी दिलेला अभंगातील उपदेश आचरणात आणा.विठ्ठल नाम सदैव मुखी घ्या ,संसार सुखी झाल्याविना राहणार नाही ,असे सांगितले . यानंतर हरिपाठ  झाला.
       शिवराज्यभिषेक दिनाचे  दिवशी ह.भ.प. बाळासाहेब मालपुटे यांचे किर्तन  झाले व शेटेवाडी येथील  ह.भ.प.नंदकुमार शेटे व संत ज्ञानेश्वर भजनी मंडळाचा संगीत भजनाचा कार्यक्रम झाला.
या कार्यक्रमाला  मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मच्छिंद्र मांडेकर , मानद अध्यक्ष  शिवराम मांडेकर , मार्गदर्शक  जेष्ट वारकरी सूर्यकांत केदारी ,तसेच वारकरी पांडुरंग बोरेकर, हिरामण मांडेकर , अक्षय मांडेकर , विजय मांडेकर , मार्गदर्शक हनुमंत मांडेकर , गायक  माऊली महाराज  तिकोणे, मृदूंगमणी किसन महाराज केदारी आणि मृदूंगमणी  अमोल महाराज घनवट आणि असंख्य  भाविक श्रोते उपस्थित होते..
किर्तन झाल्यानंतर  मावळभूषण भजनसम्राट नंदकुमार शेटे व संत ज्ञानेश्वर भजनी मंडळाचा भजनाचा  कार्यक्रम संपन्न  झाला.


लोणावळा ( टाईमन्युजलाईन नेटवर्क ) जाणाऱ्या येणाऱ्या वाहनचालकांची सध्या ञेधातिरपीट उडत असून खड्डेच खड्डे पडल्याने वाहनचालकांची कसोटी लागणार आहे. हा रस्ता जोरदार पाऊस सुरू होण्याआधी खड्डेमुक्त करावा ,अशी मागणी नागरिक व वाहनचालकांनी केली आहे.
कार्लालेणी व श्रीएकविरा देवी मंदिरात रोज हजारो पर्यटक जा ये करतात . मळवली रेल्वे स्टेशनवर  शेकडो पर्यटक कार्ला व भाजे लेणीसाठी व लोहगड विसापूर किल्यावर रोज शेकडो पर्यटक जातात. या रस्त्यावर  कार्ला प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर तसेच पी.डी.सी.सी ब़ँकेसमोर खड्डेच खड्डे पडले असून त्यात पाणि साचून  वाहनचालकांची ञेधातिरपीट उडत आहे.
या रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या  वाहनचालकांना कसरत करीतच मार्ग काढावा लागतो . त्यामुळे या रस्त्याच्या दुरूस्ती ची मागणी  वाहनचालकांनी केली आह


पिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क)
निगडीतील एका नामांकित शाळेत शिक्षकाने मुलावर अनैसर्गिक कृत्य केल्याचं समोर आले आहे.
अनुराग हिंगे असं या विकृत शिक्षकाचे नाव आहे. हिंगेने 14 वर्षीय मुलासोबत हे अनैसर्गिक चाळे शाळेतच केलेत. एका वर्गात त्याला बोलावून मिठी मारत त्याचा लैंगिक अत्याचार केला. याबद्दल कोणाला सांगितल्यास आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली. धमकीला घाबरल्यानेच जानेवारीमध्ये घडलेली घटना समोर यायला पाच महिने उलटले. पीडित मुलाने हा प्रकार आई-वडिलांच्या कानावर घातल्याने निगडी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून हिंगेला बेड्या ठोकण्यात आल्यात.

मंचर (टाईम
न्युजलाईन नेटवर्क):पुण्याच्या आंबेगाव तालुक्यतील घोडनदीत कपडे धुण्यास गेलेल्या बहिण-भावाचा बुडून मृत्यू झालाय. वडगाव काशिंबेग येथील ढुमा डोहात आज ही दुर्दैवी घटना घडली. 15 वर्षीय बहिणीच काजल विजय पवार असं तर प्रेम विजय पवार असं 10 वर्षीय भावाचं नाव होतं. पुण्याच्या विश्रांतवाडी येथून पोटाची खळगी भरण्यासाठी हे पवार कुटुंब एक महिन्यापुर्वीच येथे आले होते. पोटाचा उदर निर्वाह करण्यासाठी शेतीला आवश्यक असणारी खुरपी आणि इतर अवजारे तयार करण्याचे काम ते करतात. चाकण येथील बाजारात विजय पवार हे पत्नीसह शनिवारी खुरपी विकण्यासाठी गेले. तेंव्हा मुलगी दिव्या, काजल, प्रेम, क्रिश, विजय  आणि अनिल ही मुलं घरीच होती. दुपारी अनिल ला घरी ठेवून पाच ही बहीण-भावंड कपडे धुण्यासाठी घोडनदीवर गेले.  त्यावेळी कपडे धुत असताना काजल आणि प्रेमचा पाय घसरून नदीत पडले. ते बुडत असताना इतर बहीण-भावडांनी आरडाओरडा केला. ग्रामस्थांनी धाव घेत दोघांना बाहेर काढले, पण तो पर्यंत दोघांचा मृत्यू झाला होता.

देहूरोड(टाईमन्युजलाईन नेटवर्क)- देहूरोड छावणी बोर्ड के भाजपा नगरसेवक विशाल उर्फ जिंकी खंडेलवाल पर दो अज्ञात हमलावरों ने फायरिंग की. यह घटना कल शाम 7.30 बजे देहूरोड में घटी. जख्मी हालत में नगरसेवक को हॉस्पिटल में भर्ती कराया गया.
मिली जानकारी के अनुसार देहूरोड के पंडित नेहरु मंगल कार्यालय के सामने खंडेलवाल का कार्यालय है. गुरुवार शाम कामकाज निपटाकर कार्यालय से बाहर निकलते समय दो बंदुकधारी हमलावर उन पर फायरिंग करके फरार हो गए. एक गोली खंडेलवाल के पैर में लगी है. तुरंत उनको नजदीकी हॉस्पिटल में भर्ती कराया गया है. देहूरोड पुलिस आगे की जांच पडताल में जुट गई है.
आपको बताते चलें कि पिंपरी चिंचवड शहर तथा आसपास के परिसर में इन दिनों क्राइम ग्राफ काफी तेजी से बढा है. नया पुलिस आयुक्तालय होने से लोगों को लगा कि क्राइम कंट्रोल होने में मदद होगी मगर अपराध तेजी के साथ बढा है. कल ही मनपा के विरोधी पक्षनेता दत्ता काका साने के नेतृत्व में एक शिष्टमंडल पुलिस कमिशनर से मिलकर अपने कार्यालय में हुई तोडफोड की घटना के मुख्यसूत्रधार को जल्द से जल्द गिरफ्तार करने व उनको तथा उनके परिवार को जान का खतरा होने की बात कही. शहर में कई गैंगवार सक्रिय है. कई तडीपार अपराधी खूलेआम घूम रहे है. लेकिन पुलिस लगाम लगाने पर नाकाम है. 
मुंबई,(टाईम
न्युजलाईन नेटवर्क) : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडल के अध्यक्ष पद पर अमित गणपत गोरखे की  नियुक्ति की गई है। महामंडल का अध्यक्ष पद का पदभार ग्रहण करने के बाद श्री. गोरखे को मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने उनके अगले कार्य के लिए पुष्पगुच्छ देकर शुभकामनाएं दी।
इस अवसर पर श्री. गोरखे ने कहा किअनुसूचित जाति-जनजाति के मातंग समाज व तत्सम 12 उपजाति के लोगों का आर्थिकसामाजिक व शैक्षणिक विकास करने के लिए मुझे नियुक्त करने पर मैं सरकार के प्रति आभार व्यक्त करता हूँ। श्री गोरखे ने विश्वास जताया कि साहित्‍यरत्न अण्णा भाऊ साठे विकास महामंडल की योजना गतिमान पद्धति से लागू करने के लिए वे पूरी लगन और निष्ठा से प्रयास करेंगे।


लोणावळा (टाईम न्युजलाईन नेटवर्क

):
पेट्रोलिंग करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांनी दरड कोसळल्याचा संदेश वेळीच दिल्याने मोठा अनर्थ टळलाय. अन्यथा सह्याद्री एक्सप्रेसचा मोठा अपघात झाला असता. मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर ही घटना गुरुवारच्या रात्री सव्वा आठच्या सुमारास घडली. ठाकूरवाडी ते मंकीहिल दरम्यानच्या बोरघाटात रेल्वे मार्गावर भले मोठे दगड कोसळलेले होते. डाऊन मेन आणि डाऊन मिडल लाईन वरील दरड पाहून पेट्रोलिंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी तातडीनं हा संदेश पोहचवला. तो संदेश मुंबईहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या सह्याद्री एक्सप्रेसच्या चालकापर्यंत पोहचला. रेल्वेने ठाकुरवाडीचे स्टेशन पार केलेले, दरड कोसळलेल्या ठिकाणापासून अगदी दोन किलोमीटर वर रेल्वे पोहचली होती. चालकाने ही प्रसंगावधान दाखवत दरड कोसळलेल्या घटनेपासून एक किलोमीटर अंतरावर रेल्वे रोखण्यात यश मिळवलं अन शेकडो प्रवाश्यांचा जीव वाचला. मग तातडीनं दरड हटवण्यात यंत्रणा गुंतली, डाऊन मिडल लाईनवर कमी प्रमाणात दरड होती. ती हटवून, मार्ग खुला करण्यात दोन तास उलटले. दरम्यान उलट्या दिशेने ठाकूरवाडी रेल्वे स्थानकावर सह्याद्री एक्सप्रेस आणली गेली. मिडल लाईनवरील वाहतूक खुली होताच, साडे दहाच्या सुमारास सह्याद्री एक्सप्रेस पुण्याच्या दिशेने मार्गस्थ झाली. आता डाऊन मेन लाईन वरील भली मोठी दगडं हटवण्यात यंत्रणा गुंतलीये. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच दरड कोसळल्याने रेल्वे प्रवाश्यामध्ये चिंतेचे वातावरण आहे. पुढील चार महिने या मार्गावरून त्यांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागणार आहे.


देहूरोड (टाईम न्युजलाईन नेटवर्क
)
: पिंपरी चिंचवडच्या देहूरोडमध्ये भाजप नगरसेवकावर अज्ञातांनी गोळीबार केल्याची अन प्रत्यक्षदर्शीवर बंदूक रोखल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सायंकाळी साडे सातच्या सुमारास भर बाजार पेठेत हा प्रकार घडला. विशाल खंडेलवाल असं त्यांचं नाव असून ते देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे नगरसेवक आहेत. बाजार पेठेतून निघालेल्या विशाल यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळीबार केला. गोळीबाराचा आवाज ऐकून राजेश खंडेलवाल घटनास्थळी आले, तेंव्हा हल्लेखोरांनी त्यांच्यावर ही बंदूक रोखून धरली. कसेबसे विशाल आणि राजेश त्यांच्या तावडीतून निसटल्याने सुखरूप बचावले. पण धावताना विशाल खाली पडल्याने त्यांच्या पायाला जखम झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलीये. शुक्रवारी पिंपरी चिंचवड महापालिका विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दत्ता साने यांच्या चिखली येथील कार्यालयाची तोडफोड झाली होती. भरदिवसा नंग्या तलवारी आणि कोयते नाचवत ही तोडफोड केली गेली. त्यानंतर आज ही घटना घडली. नगरसेवकांवरच असे हल्ले होऊ लागल्याने पिंपरी चिंचवड पोलिसांवर प्रश्न उपस्थित केले जातायेत.

नेपाळी नोकराने जेवणात गुंगीचे औषध देऊन सोन्याचे दागिने केले लंपास
पिंपरी (टाईमन्युजलाईन नेटवर्क)


नेपाळी नोकर दाम्पत्याने जेवणात गुंगीचे औषध देऊन बंगला मालकासह वृद्ध दाम्पत्याला बेशुद्ध करून लाखो रुपये आणि सात ते आठ तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना संध्याकाळी पाऊने आठ च्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी पिंपरी पोलीस अधिक तपास करत असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.

दीपक नेरकर वय-५०, काशिनाथ नेरकर वय-७७, सुमनबाई नेरकर वय- ६७ अस बेशुद्ध झालेल्या मुलाचे आणि आई वडिलांचे नाव आहेत. त्यांच्यावर यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक नेरकर यांनी पिंपरी मधील महेश नगर येथे कुटुंबासह नुकताच गृहप्रवेश केलेला होता. तर नेपाळी नोकर दाम्पत्य हे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून त्यांच्याकडे काम करत होते. अशी माहिती पोलिसांनी दिली. आज सकाळी पत्नी पुण्यात दोन्ही मुलींकडे गेली होती. घरात नेपाळी नोकर दाम्पत्य आणि मुलगा वृद्ध आई वडील होते. दुपारी नोकर दाम्पत्याने जेवणात गुंगीचे औषध दिले. काही वेळानंतर ते बेशुद्ध झाले, याच संधीचा फायदा घेत त्यांनी घरातील कपाटातील मौल्यवान सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन पाठीमागील दरवाजाने पळ काढला. दुपारी साडेतीन नंतर पत्नी मुलीसह घरात आली. मात्र, सर्व जण झोपले असतील अशी आशा बाळगून त्यांनी त्यांना त्रास देणे टाळले. परंतु, रात्रीचे सात वाजले तरी घरातील व्यक्ती का उठत नाहीत हे पाहण्यासाठी गेल्यानंतर सर्व घटने चा उलगडा झाला. तिघांना जवळच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून पुढील उपचार आहेत. तर पिंपरी पोलीस हे नेपाळी नोकर दाम्पत्याचा शोध घेत आहेत.

पिंपरी (टाईमन्युजलाईन नेटवर्क)
प्रेयसीचे दुसऱ्याच तरुणाशी प्रेमसंबंध असल्याचा संशयावरून चाकूने भोसकून प्रेयसीची हत्या करून प्रियकर फरार झाला. ही घटना चंदननगर परिसरात मंगळवारी (दि. 11) रात्री घडली.

मीना पटेल (वय 22) असे मृत तरुणीचे नाव आहे. किरण अशोक शिंदे (वय 25) असे खून करून फरार झालेल्या प्रियकरचे नाव आहे.

आरोपी किरण शिंदे हा काळेवाडी येथे राहण्यास असून इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला शिक्षण घेतो..तर मृत मुलगी मीना पटेल एका कॉलसेंटरमध्ये कामाला होती. एक वर्षांपासून दोघात प्रेमसंबंध होते. प्रेयसीचे प्रेमसंबंध दुसऱ्याच तरुणाशी जुळले असावे असा संशय शिंदे याला होता. त्यातुन त्यांच्यात अनेकदा वाद झाले.

मंगळवारी रात्री 10 वाजता त्यांच्यात परत वाद झाला. रागाच्या भरात त्याने चाकूने मीना पटले हिच्या पोटावर वार केले..गंभीर जखमी अवस्थेत तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला


लोणावळा (टाईमन्युजलाईननेटवर्क ) लोणावळा व कामशेत भागात पहील्याच  जोरदार पावसाने नागरिक , लग्नाच्या वऱ्हाडी मंडळीची तारांबळ उडाली . शेतकरी वर्ग  पावसाने आनंदित झाला.
       सोमवारी सायंकाळी  साडेसहा दरम्यान  पावसाने विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली.  लोणावळा परिसरातील व कामशेत परिसरातील शुभ विवाह सोहळ्यातील वधूवरांचा पावसाच्या आगमनाची चाहूल  मेघराजाने करून  दिल्याने लग्न वेळेवर लावण्यात आली. शेतीच्या कामासाठी पावसाची प्रतिक्षा करणारे  शेतकरी  यावेळी सुखावले..मनोमन पर्जन्यराजाला धन्यवाद  दिले. पावसामुळे  वाहनचालकांची ञेधातिरपीट उडाली . 


               -- Chief Minister Devendra Fadnavis
Mumbai, (timenewsline network): The Swanath Foundation is working best to rehabilitate the orphans and bring them into mainstream of the society.  Chief Minister Devendra Fadnavis today said that it is necessary to connect the people of sensitive hearts together to make  orphans Swanath. 
This programme was organized as a joint venture  by  Seeing Eyes and Helping Hands Foundation and the Maharashtra State Child Rights Protection Commission.  Mr. Fadnavis was speaking on the occasion.
On this occasion Swanath Mobile App was released at the hands of Chief Minister Mr. Fadnavis.  Director of Dreamworth Solutions, Gagan Mahotra gave information about this app.
Chief Minister Mr. Fadnavis said that after the state government declared reservation for orphans in the state, it has been welcomed at every level. The  society and the government should work together to make orphans Swanath. For this it is necessary to work to connect people of sensitive minds.  Humans are a sensitive creature.  The sensation should not remain the sensation, but the strength should be formed  through it.  A movement started through the Swanath Foundation.  Even now, this movement will grow  bigger .  He expressed confidence that the government will take initiative for this.
Vishwa Hindu Parishad's Foreign Department Secretary Prashant Hartalkar  , Trusteee of Swanath Organization Shreya Bharati , Sangh Chalak of Kokan region Satish Mod , Vrishali Deshpande, a member of the State Child Rights Protection Commission were present on the occasion. 

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget