श्रीरंग बारणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

पिंपरी, (टाईम न्युजलाईन नेटवर्क): - मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी  हजारोंच्या उपस्थितीत रॅली काढत आज (मंगळवारी) दुपारी एक वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत अर्ज दाखल केला आहे.

शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे मंगळवारी दुपारी एक वाजता निगडी येथील पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या सातव्या मजल्यावरील निवडणूक कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याअगोदर महायुतीचे कार्यकर्त्यांनी आकुर्डीतील खंडोबा मंदिर चौक ते प्राधिकरण कार्यालयापर्यंत रॅली काढली.

बारणे यांचा अर्ज दाखल करताना युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई , पालकमंत्री गिरीश बापट, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे,  शिवसेना उपनेत्या नीलम गोऱ्हे, भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, माजी खासदार रामशेठ ठाकूर उपस्थित होते. जुन्नरचे आमदार शरद सोनवणे, उरणचे शिवसेना आमदार मनोहर भोईर, पिंपरीचे आमदार गौतम चाबुकस्वार, मावळचे भाजप आमदार तथा पुणे जिल्हाध्यक्ष बाळा भेगडे, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे माजी आमदार दिगंबर भेगडे, आरपीआयएच्या नेत्या चंद्रकांता सोनकांबळे, प्राधिकरण अध्यक्ष सदाशिव खाडे, भाजप नेत्या उमा खापरे, अमित गोरखे आदी महायुतीचे नेते व कार्यकर्ते  उपस्थित होते.

खासदार बारणे यांनी रॅलीला सुरुवात करण्यापूर्वी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे दर्शन घेतले. त्यानंतर आकुर्डी येथील श्री खंडोबारायाचे दर्शन घेतल्यानंतर रॅली सुरू झाली. ढोल- ताशांच्या दणदणाटात महायुतीचा विजय असो', 'श्रीरंग बारणे आगे बढो हम तुम्हारे साथ है' या घोषणांच्या गर्जनेत खंडोबा माळ ते निगडी प्राधिकरण कार्यालय या मार्गावरून पदयात्रा काढण्यात आली. पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्याचा ध्यास घेऊन महायुतीने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. भगवे फेटे व झेंडे यामुळे रॅलीचा पूर्ण मार्ग भगवा झाला होता. हजारो कार्यकर्ते व पाठीराखे यांनी यावेळी प्रचंड गर्दी केली. चिंचवडचे आमदार आणि भाजप शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांचे आणि उमेदवार व विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांचे मनोमिलन झाल्याने महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य आले आहे. हे नवचैतन्य आजच्या शक्तीप्रदर्शनात पाहायला मिळाले.
Labels:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget