माथाडी कामगार संघटनेच्या अध्यक्षाने केला एकावर जीवघेणा हल्ला



पिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):
माथाडी कामगार संघटनेच्या अध्यक्षाने घरात घुसून एकावर जीवघेणा हल्ला केला आहे.
 श्रीकांत सुर्वे यात गंभीर जखमी झालेत. तर बबलू जोगदंड ने हा हल्ला केला असल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ,सोमवारी रात्री साडे आठची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली. बबलू हा भाजप संलग्न माथाडी कामगार सेनेचा अध्यक्ष असल्याची माहिती पोलिसांनी दिली. बबलूला श्रीकांत यांचं राहतं घर आणि लगतची जागा कमी किमतीत हवी होती. यास श्रीकांतने नकार दिल्याने बबलू  कोयता घेऊन आला. सोबत आई, बहीण आणि एक साथीदार लाठी-काठी घेऊन आले होते. तेंव्हा अंगणात असणाऱ्या श्रीकांत यांच्या पत्नी बबलू ने खेचले, मग समोर  दिसताच हल्ला केला. पहिला वार चुकवत श्रीकांत घरात धावले पण बबलू ने घरात घुसून डोक्यात आणि पायावर सपासप वार केले. यात श्रीकांत गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वाकड पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे.
Labels:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget