पिंपरी, (टाईम
न्युजलाईन नेटवर्क) - लोकशाहीला बळकटी आण्यासाठी, राष्ट्रीय सुरक्षा आणि देशाच्या उज्वल भविष्यासाठी शिवसेना-भाजप-रिपाई-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीला मतदान करावे, अशा प्रतिक्रिया पिंपळे सौदागर आणि रहाटणी परिसरातील आयटी अभियंत्यांनी व्यक्त केली. शिवसेना-भाजप-रिपाई-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी आज (रविवारी) आयटी अभियंत्यांशी संवाद साधला.
यावेळी शहर प्रमुख योगेश बाबर, उर्मिला काळभोर, सरिता साने, अनिता तुतारे, कमल गोडांबे, शर्वरी जवळकर, शिल्पा अल्पन, श्वेता कापसे, अंजना अठन्नी, सोमनाथ गुजर आदी उपस्थित होते.
खासदार बारणे यांनी पिंपळे सौदागर भागात रविवारी प्रचार दौरा केला. रहाटणी येथील धर्मवीर संभाजी महाराज उद्यानात फेरी मारून मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधला. खासदार बारणे यांनी मागील पाच वर्षात पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांसाठी स्वतंत्र पासपोर्ट कार्यालय, पवना धरणातील 1 लाख 25 हजार घन मीटर गाळ काढून धरणात पाणीसाठा वाढवला, यांसारखी सक्रिय कामे केली आहेत. पुढील काळातही अशाच प्रकारचे काम करण्यासाठी तसेच संसदेत पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांचे सरकार आणण्यासाठी महायुतीचे उमेदवार बारणे यांना विजयी करण्याचे ठरवले आहे, अशा भावना उपस्थित आयटी अभियंत्यांनी व्यक्त केल्या.
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.