बारामतीहून पाठवलेले हे पार्सल परत बारामतीला पाठवा-मुख्यमंत्री

पिंपरी(टाईम न्युजलाईन नेटवर्क)ज्या उमेदवाराचे मतदान मावळ लोकसभा मतदार संघात नाही, असा उमेदवार मावळच्या जनतेवर लादण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बारामतीहून पाठवलेले हे पार्सल मावळ लोकसभा मतदारसंघातील मावळा परत बारामतीला पाठवणार आहे; असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. तसेच मावळची जनता मतदान श्रीरंग बारणे यांना करेल, पण त्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांना ताकद मिळेल. ही निवडणूक भारताच्या अस्मितेची, राष्ट्रीय सुरक्षेची, विकासाची निवडणूक आहे, असेही फडणवीस म्हणाले.
भाजपा, शिवसेना, रिपाइं (ए), राष्ट्रीय समाज पार्टी, शिवसंग्राम, रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार, खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ पनवेल मधील कामोठे येथे जाहीर सभा झाली. या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले, खासदार श्रीरंग बारणे, महापौर डॉ. कविता चौटमल, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार मनोहर भोईर, कोकण म्हाडाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील, माजी खासदार रामशेठ ठाकूर, माजी आमदार देवेंद्र साटम, जिल्हा प्रमुख शिरीष घरत, संपर्क प्रमुख दत्ता दळवी, जगदीश गायकवाड, उपमहापौर विक्रांत पाटील, बबनदादा पाटील, अरुण भगत, दिलीप पाटील, सुशील शर्मा, महेश बालदी आदी उपस्थित होते.“माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून मीच ओपनिंग करणार, असे शरद पवार म्हणाले होते. संपूर्ण तयारी करून ते लोकसभेच्या मैदानात उतरले. पण नरेंद्र मोदी यांनी गुगली टाकतात त्यांनी मैदानातून माघार घेत आपण बारावा खेळाडू असल्याचे जाहीर केले. जिथे स्वतःला कॅप्टन म्हणून घेणारे शरद पवार यांचे काही चालले नाही; तिथे इतरांचे काय काम” असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.
“नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने घरे, गॅस, वीज, आरोग्य, विमा, लघु उद्योगास चालना, शेतकऱ्यांना मदत अशा सर्व क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम केले आहे. यातून सर्वसामान्य माणसाच्या जीवनात बदल झाला आहे. त्याचबरोबर विरोधी राष्ट्रांना जशास तसे उत्तर देण्याची धमक केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये आहे. हा नवीन भारत आहे. हा ऐकणारा भारत नाही, तर ठोकणारा भारत आहे”, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी भारतीय सैन्य दलाचे कौतुक केले.रामदास आठवले म्हणाले, “महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत तयार झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी स्वतः त्यांच्यासोबत आहोत. असा कसलेला पैलवान महायुतीकडून मावळच्या रणांगणात उतरवला आहे. समोरच्या उमेदवाराचा महायुतीपुढे निभाव लागणार नाही. मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीचा विजय निश्चित आहे. नरेंद्र मोदी पूर्ण भारताला एकत्र आणत आहेत. त्यांचे हात बळकट करण्यासाठी महायुतीचा उमेदवार लोकसभेत जायला हवा.
रामदास आठवले यांनी त्यांच्या कवितेच्या खास शैलीत शरद पवार यांना पार्थ पवार यांच्या उमेदवारीबद्दल टोला दिला. आठवले म्हणाले, ‘शरद पवारांचा निर्णय झाला व्‍यर्थ, का पाठवला त्यांनी पार्थ’. राजकारण करत असताना राजकारणाचा त्याचबरोबर समाजकारणाचा अनुभव असणं महत्त्वाचं आहे. समाजाशी आपली बांधिलकी असणे गरजेचे आहे. अगदी नवख्या उमेदवाराला देशाच्या लोकसभेत पाठवणं संयुक्तिक नाही, असेही आठवले म्हणाले.
Labels:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget