सांगवी परिसरात महायुतीची रॅली उत


पिंपरी, (टाईमन्युजलाईन नेटवर्क): - शिवसेना-भाजप-रिपइं-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार, खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ सांगवी परिसरात रॅली काढण्यात आली. महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या रॅलीत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
रॅलीमध्ये भाजपचे शहराध्यक्ष  आमदार लक्ष्मण जगताप, ज्येष्ठ नगरसेविका माई ढोरे, शारदा सोनवणे, हर्षल ढोरे, संतोष कांबळे, सीमा चौगुले, माधवी राजापुरे, राजेंद्र राजापुरे, अंबरनाथ कांबळे, अमित निंबाळकर, चेतन शिंदे, अमित सुवासे, दीपक ढोरे, विजय साने, अविनाश कवडे, मंगला भोकरे, ज्योती गायकवाड, नेहा गायकवाड, स्वरूपा खापेकर, प्रकाश घोरपडे, सुरेश शिंदे, महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
शितोळेनगर येथून रॅलीला सुरुवात झाली. नृसिंह हायस्कूल, ढोरे नगर चौक, पवार नगर, शिंदे नगर, जयमाला नगर, नॅशनल स्कूल, एस टी कॉलनी या मार्गावरून ही रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये महिलांनी देखील मोठ्या संख्येने सहभाग घेतला. दरम्यान, महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी नगरसेविका माधवी राजापुरे, भाऊसाहेब शिरोळे, दत्तात्रय जाधव, नगरसेवक महेश जगताप, शशिकांत कदम, दीपक लोखंडे, प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या निवासस्थानी, सोसायट्यांमध्ये जाऊन भेटी घेतल्या
Labels:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget