दिशा सोशल फाउंडेशनचा वर्धापन दिन उत्साहात: दिग्गजांची हजेरी



पिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर  स्थापन झालेल्या दिशा सोशल फाउंडेशनचा 13 वा वर्धापन दिन रामकृष्ण मोरे नाट्यगृह चिंचवड येथे संपन्न झाला. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, सहकार अशा विविध क्षेत्रातील उपक्रमांची मेजवानी गेल्या तेरा वर्षांत फाउंडेशन च्या माध्यमातून प्रेक्षकांना अनुभवता आली. सांस्कृतिक आणि सामाजिक जडणघडण होण्यासाठी दिशा सातत्याने काम करीत आहे. समाजाच्या प्रत्येक घटकाला काहीतरी नवीन देण्याचा सतत संकल्प करणारी ही संस्था वैविध्यपूर्ण व सातत्यपूर्ण
कार्यक्रम आयोजित करते हे दिशाचे खास वैशिष्ट्य
आहे, असे मत राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांनी यावेळी व्यक्त केले. विद्यार्थी,युवक, महिला, व समाजातील सर्वच घटकांना प्रेरणादायी ठरेल अशा नेटक्या कार्यक्रमांचे करणारी संस्था म्हणून  दिशा फाऊंडेशनची ओळख आहे, असे ते म्हणाले. या वर्धापन दिनास महापौर राहुल जाधव, खासदार श्रीरंग बारणे, खासदार अमर साबळे, आमदार व भाजपाचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप, आमदार गौतम चाबुकस्वार, माजी आमदार अण्णा बनसोडे, सिनेअभिनेते भरत जाधव, दीपस्तंभ जळगाव फाऊंडेशनचे संस्थापक  यजुर्वेंद्र महाजन, शिक्षणाधिकारी अनिल गुंजाळ, डी सी पी नम्रता पाटील,
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, भाऊसाहेब भोईर, शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे, मावळ शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे,माजी महापौर अपर्णा डोके, नगरसेवक अमित गावडे, शत्रुघ्न काटे, मोरेश्वर शेडगे,  तुषार हिंगे, समीर मासुळकर,प्रमोद कुटे,सहकार क्षेत्रातील कांतीलाल गुजर, धनाजी विनोदे, एस बी चांडक,  बाळासाहेब गव्हाणे, माजी नगरसेवक बळीराम जाधव, धनंजय काळभोर, राजाभाऊ गोलांडे, जितेंद्र ननावरे, किरण मोटे, निवृत्ती शिंदे, विष्णुपंत नेवाळे, श्रीधर वाल्हेकर, चेतन भुजबळ,  दत्ता  पवळे, संजय काटे, उल्हास शेट्टी, जगदीश शेट्टी, अकील मुजावर, बाळासाहेब मोरे,साहित्य  क्षेत्रातील राज अहिरराव, शिवाजी चाळक, श्रीकांत चौगुले, अविनाश वाळुंज आदी मान्यवर उपस्थित होते.
विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर, दिशावर प्रेम करणारा रसिक प्रेक्षक,   यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिशाचे अध्यक्ष गोरख भालेकर यांनी केले. सूत्रसंचालन नाना शिवले यांनी केले व कार्याध्यक्ष सचिन साठे यांनी आभार मानले.
Labels:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget