लोणावळा, (टाईम न्युजलाईन नेटवर्क): 'महायुतीचा विजय असो', 'खासदार श्रीरंग बारणे यांचा विजय असो' च्या जयघोषात शिवसेना-भाजप-रिपाई-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांची लोणावळा शहरातून रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये रॅलीमध्ये महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी सहभाग घेतला. ढोलताशांच्या गजरात आणि घोषणांच्या जयघोषात बारणे यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी आमदार बाळा भेगडे, नगराध्यक्षा सुरेखा जाधव, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, विरोधी पक्षनेत्या शारण चौधरी, नगरसेवक माणिक मराठे, माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके, तालुका अध्यक्ष राजू खांडभोर, शहर प्रमुख सुनील इंगुळकर, बाळासाहेब पाठक, प्रकाश पगारे, दीपाली भिलारे, रामविलास खंडेलवाल, आशिष बुटाला, प्रवीण काळे, आदी उपस्थित होते.
दरम्यान, महायुतीच्या लोणावळा येथील प्रचार कार्यालयास भेट दिली. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. लोणावळा येथील शिवाजी चौकापासून रॅलीला सुरुवात झाली. लोकमान्य टिळक रोडमार्गे काढण्यात आलेल्या रॅलीचा समारोप डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून झाला.
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.