पिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क): - शिवसेनेचे पिंपरी विभाग प्रमुख अनिल पारचा यांनी आज, सोमवारी पहाटे पाच वाजल्यापासून गजबजणा-या पिंपरीत शिवसेनेच्या प्रचारात वासुदेवाला आणून रंगत आणली.
मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना, भाजपा, महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध मार्ग अवलंबिले जात आहेत. महाराष्ट्राच्या लोकजीवनाची व ग्रामीण संस्कृतीची बीजे वासुदेव, पिंगळा या लोकशिक्षण देणा-या मंडळींनी जिवंत ठेवली आहे.
आज पहाटेच्या सुमारास वासुदेवांनी शिवसेनेचे उपरणे गळयात वेढलेल्या वेषात पिंपरी कॅम्प परिसर पिंजून काढला. व्यापारी, दुकानदार, भाजी विक्रेते, फूल व्यापारी यांना प्रचार पत्रक वाटत पहाटेची गीते गात अनोख्या पध्दतीने प्रचार केला. विभाग प्रमुख अनिल पारचा यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम पार पडली.
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.