पिंपरी:
मोबाईलच्या अतिवापरामुळे शाळकरी मुलांना नको ते 'नाद' लागलेत. पण याच मोबाईलने एका गतिमंद मुलाला चालना दिली . इतकंच नव्हे तर या माध्यमातून त्याने विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. पृथ्वीराज सतीश इंगळे असं या पंधरा वर्षीय मुलाचे नाव आहे. परिस्थितीने त्याला एक्कलकोंड बनवलं होतं, कुटुंबीय हेच त्याचं विश्व बनलेलं. त्यामुळं घराबाहेर पडायचं झालंच तर तो कुटुंबीयांशिवाय पडतच नसे. काळजीपोटी कुटुंबीयांनी ही त्याला घर सोडू दिलं नाही. अश्यातच मनोरंजनाची साधनं त्याला कमी पडू लागली. रोज नवं काय द्यायचं असा प्रश्न आई-वडिलांसमोर उभा ठाकला होता. पृथ्वीराज दोन वर्षाचा असताना त्यांचं रडू थांबवण्यासाठी मोबाईलच्या रिंग टोनचा आधार घेतला. रिंग टोन ऐकून तो संगीतात रमू लागला. मनोरंजनाचं हा पर्याय कुटुंबियांच्या चांगलाच पथ्यावर पडला. इथूनच संगीताकडे त्याचा प्रवास सुरु झाला आणि सलग चार तास 'गायन' करत त्याने विश्वविक्रमावर नाव कोरलं.
पृथ्वीराज दोन वर्षाचा झाल्यानंतर तो त्रास देत असे त्याची आई दया हिने पृथ्वीराजच्या कानाशी मोबाईल लावत होत्या. तो त्या गाण्याची धुन ऐकल्यानंतर गप्प बसत होता. दिवसा झोपायचा अन् रात्री जागायचा हे नित्याचे झाले होते. मोबाईल कानाला लावला की रात्रीचा तेच गाणे गुणगुणत होता. शास्त्रीय गायणाचा त्याला आवड लागल्याचे आईला समजताच त्याची दखल घेऊन शास्त्रीय गायक दराडे यांच्याकडे क्लास सुरु केला.शास्त्रीय संगितातील त्याला राग समजू लागले. सहा वर्षाचा झाल्यानंतर तो भजनातील राग गायला लागला. साडेतीन वर्ष क्लासीकल संगिताचा मारा झाल्यामुळे तो गाणी ही गुणगुणू लागला.
पृथ्वीराजला गाण्यास स्टे्ज मिळाले तर तो गाणे गाऊ शकतो असा आत्मविश्वास पिंपरी-चिंचवड महापालिकेत कार्यकारी अभियंता पदावर असलेले सतीश इंगळे यांना आला. पृथ्वीराजबरोबर तेही गात असे. पिंपळे गुरव येथील गार्डणमध्ये ऑर्केस्टाचा सुरु होता. त्या ऑर्केस्टामध्ये पृथ्वीराजने गाणे गायले गेले. आणि गाणे गाण्याची सुरुवात त्याची तेथून झाली. तो पृथ्वीराजच्या आयुष्यातील टर्निग पाईंट ठरला. साऊंडगायकांच्या ओळखी झाल्या. त्या ओळखीमुळे इंगळे पितापुत्र स्टेजवर गाणे गावू लागले. त्यांना प्रतिसाद मिळत गेला.
मिरज येथील गाधर्व महाविद्यालयात शास्त्रीय संगिताची परिक्षा दिली. दोन्ही ही परिक्षेत प्रथम श्रेणीमध्ये पास झाला. गाणे व धुन ऐकून पृथ्वीराज गाणे गावू लागला होता. मतीमंद असल्यामुळे त्याला लिहीता वाचता येत नाही. त्यामुळे पुढील परिक्षा देता येत नसल्याची खंत वडील सतीश इंगळे यांनी बोलून दाखविली.
पृथ्वीराज आता १५ वर्षाचा झाला आहे. परंतु, त्याने गाणे गाण्यात इतकी प्रगती केली की, वैशाली सावंतसह अनेक मराठी गायकांबरोबर गाणी गायली. बप्पी लाहरी, कल्याणजी आनंदजी यासह अनेक संगितकारांची साथ घेऊन चार आल्बम तयार केले आहे. व्हाय मी, सांगणा आई मला मी असा कसा, मस्त मोला असी गिते गायली आहे.
पुणे येथील स्नेहसदन मतीमंद मुलांच्या शाळेत तो शिक्षण घेत आहे. शारिरिक शिक्षण विषयाचे शिक्षक अशोक जाधव यांनी पृथ्वीराजची अनेक गाणी ऐकली होती. त्यांनी इंगळे परिवाला हा सलग गाऊ शकतो. याचे रेकॉर्ड होऊ शकते असा सल्ला ही दिला. त्यावेळी इंगळे परिवाराने पृथ्वीराजवर मेहनत करण्यास सुरुवात केली.सकाळी त्याला मोबाईलवर डाऊनलोड करून गाणे व धुन ऐकवली जात असे. दिवसभर तो त्या धुनचे अकलन करीत होता. त्यानंतर त्या गाण्यातील शब्द अडखळत असेल तर पृथ्वीराजची आई दया या त्या शब्दाचा उच्चार करून घेतात. पुणे येथे सलग चार तास गाणे गाईली. दोन तास शास्त्रीय संगितातील गितले, एकतास भक्ती गिते, १ तास निवडक चित्रपटांची गिते गाऊन वल्ड रेकॉर्ड केले. वल्ड रेकॉर्ड ऑफ इंडिया या कंपनीने पृथ्वीराजला सलग चार तास गावून विक्रम केल्याबद्धल प्रमाणपत्र प्रधान केले.याच कंपनीने यावर्षातील टॉपटेनमधील १० रेकार्ड धारकांना जिनियस ऑफ वल्ड रेकॉर्डमध्ये नामांकण मिळाले आहे. त्यात पृथ्वीराज इंगळे या गायकाचा समावेश आहे. मार्च महिन्यात हा कार्यक्रम अहमदाबाद येथे होणार असल्याचे पृथ्वीराजचे वडिल सतीश इंगळे यांनी सांगितले.
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.