बेकायदेशीररित्या गॅस रिफिलिंग करत असताना दोन सिलेंडरचा स्फोट

पिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):बेकायदेशीररित्या गॅस रिफिलिंग करत असताना दोन सिलेंडरचा स्फोट झाल्याने आग लागली. मंगळवारी  सायंकाळी सातच्या सुमारास वाकडमधील म्हातोबानगर परिसरात ही घटना घडली. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड म्हातोबानगर परिसरात बालाजी गॅस एजन्सी आहे. मंगळवारी सायंकाळी एजन्सीमध्ये छोट्या घरगुती गॅस सिलेंडरमध्ये बेकायदा रिफिलिंग करण्याचे काम सुरु होते. दरम्यान, अचानक सिलेंडरचा स्फोट झाला. कामगार आणि दुकानदाराने प्रसंगावधान राखत दुकानाबाहेर पळ काढला. त्यानंतर आणखी एका सिलेंडरचा स्फोट झाल्याने दुकानात तसेच बाजूच्या दोन झोपड्यांना आग लागली.
या घटनेची माहिती मिळताच वाकड पोलिसांसह पिंपरी आणि रहाटणी अग्निशामक दलाचे चार बंब घटनास्थळी दाखल झाले. यामध्ये जीवितहानी झाली नसली तरी दुकान आणि झोपड्यांचे नुकसान झाले.
Labels:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget