पुणे (टाईम न्युजलाईन नेटवर्क):
तरुणीशी लग्नाचे नाटक करून पिस्तुलाच्या धाकाने तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार हडपसर परिसरात समोर आला आहे. या प्रकारानंतर आरोपीने तरुणीचे अश्लील व्हिडिओ तयार करून ते इतरांना पाठविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, एकाला अटक करण्यात आली आहे.
प्रसाद ज्ञानेश्वर तुपे (वय २७, रा. अॅमोनोरा पार्क, हडपसर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. सुरेखा तुपे, सिद्धार्थ तुपे, संभाजी दगडू भंडारे, शंभूराजे तावरे (वय २७, रा. बारामती) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत २५ वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी प्रसाद यांची ओळख झाली. ओळखीनंतर आरोपीने पीडित तरुणीला लग्नाचे आश्वासन दिले. एका मंदिरात घेऊन जात लग्न केल्याचे नाटक केले. त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जात तरुणीवर अत्याचार केला. तरुणीने विरोध केला असता आरोपीने तिला पिस्तुलाचा धाक दाखवला, तसेच अश्लील फोटो व व्हिडिओ तयार करून आरोपी तावरे याला पाठविले. त्याने ते व्हिडिओ इतरांना पाठवले. पीडित तरुणी नांदण्यासाठी आरोपीच्या घरी गेल्यानंतर तिला सुरेखा हिने मारहाण केली, तसेच विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही दमदाटी करून पिस्तुलाचा धाक दाखवून धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी हडपसर पोलिस अधिक तपास करत आहेत.
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.